(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
‘पारु’ ही प्रसिद्ध झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आहे. ही मालिका सुरु होऊन आता 1 वर्ष पूर्ण झाले आहे. या मालिकेत अभिनेत्री शरयू सोनावणेने पारुची तर प्रसाद जवादेने आदित्यची भूमिका साकारली आहे. या मालिकेतल्या प्रत्येक पात्रावर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केले आहे. या मालिकेचा टीआरपीसुद्धा उत्तम आहे. सध्या या मालिकेत अनुष्का आणि दिशाच्या कटकारस्थानांमधून किर्लोस्करांना वाचवण्याचा प्रयत्न पारू करत आहे. आता या मालिकेला एक वर्ष पूर्ण झाले असता. या मालिकेमधून एक अभिनेत्री एक्झिट घेणार आहे. या बातमीने चाहत्यांना चांगलाच धक्का बसला आहे.
काय सुरु आहे मालिकेमध्ये?
अनुष्का आणि दिशा या दोघी बहिणी किर्लोस्करांना त्रास देण्यासाठी वेगवेगळे प्लॅन तयार करत आहेत. पण या दोघींचा डाव हाणून पाडण्यासाठी पारु सज्ज आहे. पारु अनुष्काचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे मालिकेत अनेक ट्विस्ट बघायला प्रेक्षकांना मिळत आहे. पारुमुळे अहिल्यादेवी किर्लोस्करांना सत्य समजणार आहे. अनुष्का ही दिशाची सख्खी मोठी बहीण आहे. आदित्यसोबत लग्न करण्यामागे तिचा वेगळा हेतू आहे. हे कोणालाही माहिती नसते. पण पारुला ही गोष्ट समजते. आदित्यच्या जीवाचं रक्षण करण्याचा मार्ग पारू शोधत आहे. अहिल्यासमोर जेव्हा अनुष्काचा खरा चेहरा येईल तेव्हा अनुष्का या पात्राची मालिकेतून एक्झिट होणार आहे. मालिकेत अनुष्काचं पात्र साकारणाऱ्या श्वेता खरातने पोस्ट शेअर केली आहे. आणि चाहत्यांसह ही बातमी सांगितली आहे.
Sonali Bendre: आये हाय! पन्नाशीतही सुंदर आहेत या अभिनेत्रीच्या अदा, एकदा फोटो पहाच!
पारू मालिकेतील हे पात्र करणार एक्झिट
अभिनेत्री श्वेता खरातने पारु मालिकेच्या एका सीनच्या स्क्रिप्टचा फोटो शेअर केला आहे. ‘One Last Time’ असं कॅप्शन देत तिने हा फोटो शेअर केला आहे. या स्क्रिप्टवर ‘Have a Great Last Day ! अनुष्का’ असं वर लिहिण्यात आलं आहे. स्क्रिप्टमध्ये जे डायलॉग दिसतायत त्यावरुन अहिल्याला दिशा आणि अनुष्काचं सगळं सत्य समजणार असल्याचा अंदाज नेटकऱ्यांनी लावला आहे. त्यामुळे अनुष्का या पात्राची मालिकेतून एक्झिट होणार आहे. श्वेताने इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केलेल्या फोटोची खूप चर्चा सुरु आहे. ‘पारु’ मालिकेत पुढे काय होणार, हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. तसेच अनुष्का या पात्राची एक्झिट झाल्यानंतर दुसरं कोणतं पात्र मालिकेत प्रवेश घेणार हे पाहणे प्रेक्षकांसाठी उत्सुकतेचे ठरणार आहे.