Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Exclusive: ‘चौकटीबाहेरचं काम, ‘देवबाई’ म्हणून मिळाली ओळख,’ लालीची भूमिका फळली

देवमाणूस ही झी मराठीवरील मालिका तुफान गाजतेय. याआधी दोन अध्याय या मालिकेचे येऊन गेले आहेत. दरम्यान यातील लालीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री सोनम म्हसवेकरने नवराष्ट्रशी खास गप्पा मारल्या आहेत.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Feb 16, 2026 | 11:15 AM
लालीची भूमिका साकारताना कामाचं समाधान मिळतंय - सोनम म्हसवेकर

लालीची भूमिका साकारताना कामाचं समाधान मिळतंय - सोनम म्हसवेकर

Follow Us
Close
Follow Us:

‘देवमाणूस’ ही मराठी मालिका घराघरात पाहिली जाते आणि याचे दोन अध्याय प्रचंड गाजले होते. तर आता सध्या देवमाणूस मधला अध्याय सुरू आहे. या मालिकेत गोपाळची बायको जी आधी अतिशय शांत दाखविण्यात आली होती ती म्हणजे ‘लाली’. ही भूमिका सध्या प्रचंड गाजत आहे आणि ती भूमिका साकरतेय अभिनेत्री सोनम म्हसवेकर. सोनमने ही भूमिका अक्षरशः जगली आहे आणि ही भूमिका साकारताना नक्की काय काय करावं लागतं आणि कोणत्या मानसिकतेतून जावं लागतं, कोणते खास कष्ट घ्यावे लागतात याबाबत प्रेक्षकांना नक्कीच उत्सुकता असते. 

याबाबतच नवराष्ट्रने खास ‘लाली’शी गप्पा मारल्या आहेत आणि सोनमने लालीची ही भूमिका साकारताना तिला किती समाधान मिळतंय आणि कशा पद्धतीने काम करावं लागत आहे याबाबत अगदी दिलखुलासपणे सांगितलं आहे. जाणून घेऊया सोनमकडून 

‘देवमाणूस – मधला अध्याय’मध्ये आजवरचा सर्वात मोठा ट्विस्ट; लालीने ओलांडल्या सर्व मर्यादा, खळबळजनक कट उघड

मालिकेतील लाली या वेगळ्या भूमिकेची निवड कशी केलीस आणि भूमिका करताना काही दडपण आलंय का?

सोनमने उत्साहाने उत्तर देत म्हटलं, ‘खरंतर त्याच त्याच भूमिका मला नको होत्या आणि काहीतरी वेगळं करण्याच्या विचारानेच ही भूमिका जेव्हा माझ्याकडे आली तेव्हा मी होकार दिला होता. सुरूवातीला लाली अगदी शांत आणि संयमी होती पण अचानक जेव्हा तिचा नकारात्मक चेहरा समोर आला तेव्हा अगदी मलाही हादरायला झालं होतं की प्रेक्षक कसे स्वीकारतील. लाली खून करणार हेच आधी पचत नव्हतं. पण हा अगदी काही सासूसुनांचा असा नियमित शो नाही. यामध्ये खूपच चढउतार आहेत आणि वेगवेगळ्या गोष्टींनी ही मालिका प्रेक्षकांसमोर येत आहे. त्यामुळे आधी दडपण होतं पण आता प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहिल्यावर काम करायला खूपच मजा येत आहे’

आऊटडोअर शूट कसं मॅनेज करतेस?

‘खरं सांगू का? हे माझं पहिलंच आऊटडोअर शूट आहे’, अगदी सहजपणाने सोनम म्हणाली, पुढे तिने सांगितलं की, ‘या मालिकेत काम करताना खूपच मजा येत आहे. आऊटडोअर शूट करताना अगदी डिसेंबर-जानेवारीच्या थंडीत कुडकुडायला होतंय. अनेक सीन्स मला या थंडीत करावे लागले आहेत. अगदी पोलीस स्टेशन जाळतानाचा सीन असो वा नदीतला सीन असो प्रचंड थंड पाण्यात मी काम केलंय. रोज काहीतरी नवा टास्क असतो आणि तोचतोचपणा नसल्याने काम करायला खूपच मजा येते आहे आणि याशिवाय कामाचं समाधानही मिळतंय. त्यामुळे मॅनेज करणं सोपं होतंय. आव्हानंही खूप आहेत पण मला ते खूपच आवडतंय’

या भूमिकेने तुझ्या आयुष्यात काय बदल घडले?

‘अगदी ३६० डिग्री बदल घडलाय माझ्या आयुष्यात’ सोनमने स्पष्टपणे सांगितलं, ‘आता कसं ते पण सांगते. लालीच्या भूमिकेनंतर मला माझ्या सोशल मीडियावर प्रेक्षकांचे भरभरून मेसेज येत आहेत. अगदी DM येत आहेत. अक्षरशः कमेंट्सचा पाऊस पडतोय आणि मला हे फारच भारी वाटतंय. अनेकजण तर असाही मेसेज करत आहेत की लाली फायर है,  सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता मला लोक ‘देवबाई’ म्हणून ओळखायला लागले आहेत. कामाची पोचपावती खूपच चांगल्या पद्धतीने मिळत आहे आणि त्यामुळे काम करायला अधिक जोर आलाय’

देवमाणूस- मधला अध्यायमध्ये नवा ट्विस्ट, साकेतचा खून, शामल साक्षीदार; लालीच्या जाळ्यात अडकणार का अजित?

यापुढे कशी भूमिका निवडायला आवडेल?

‘लालीची भूमिका इतकी गाजली आहे की, यापुढेदेखील भूमिका निवडताना कामाचं समाधान मिळायला हवं हाच विचार कायम असेल’ असं सोनमने सांगितलं. ‘सर्वात महत्त्वाचं म्हणजे झी ने माझ्यावर विश्वास दाखवला आणि मला लालीची भूमिका दिली. ही एक मोठी जबाबदारी आहे आणि ती पार पाडण्यासाठी मी मेहनत करते आहे, त्यामुळे खूपच छान वाटतंय आणि असंच काम पुढेही करत राहीन इतकंच सांगू शकते’ 

सध्या ‘देवमाणूस’मधील सोनमची लाली ही भूमिका प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरली आहे आणि पुढे लाली काय करणार? गोपाळ आणि लालीचं काय होणार? पोलिसांच्या तावडीतून सुटणार की, फास आवळला जाणार हे पाहणं प्रेक्षकांसाठी नक्कीच औत्सुक्याचं ठरणार आहे. 

Web Title: Devmanus fame laali aka actress sonam mhasvekar shared her gratitude about work in serial exclusive

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 16, 2026 | 11:15 AM

Topics:  

  • marathi serial news
  • marathi serial update

संबंधित बातम्या

स्वामींच्या कृपेने ‘सनई चौघडे’चा पहिल्याच आठवड्यात दबदबा; टॉप 10 मध्ये मालिकेने मिळवले स्थान
1

स्वामींच्या कृपेने ‘सनई चौघडे’चा पहिल्याच आठवड्यात दबदबा; टॉप 10 मध्ये मालिकेने मिळवले स्थान

‘आनंदी’मध्ये मोठा ट्विस्ट! सई रानडेची मालिकेमध्ये दमदार एन्ट्री; युगंधरशी रंगणार जबरदस्त संघर्ष
2

‘आनंदी’मध्ये मोठा ट्विस्ट! सई रानडेची मालिकेमध्ये दमदार एन्ट्री; युगंधरशी रंगणार जबरदस्त संघर्ष

गोमतीच्या आयुष्यात नवी सुरुवात; ‘जय जय स्वामी समर्थ’मध्ये स्वामींच्या कृपेने पुनर्विवाहाचे संकेत
3

गोमतीच्या आयुष्यात नवी सुरुवात; ‘जय जय स्वामी समर्थ’मध्ये स्वामींच्या कृपेने पुनर्विवाहाचे संकेत

‘आनंदी’नंतर आता आणखी एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला, ‘बाई तुझा आशीर्वाद’मध्ये मुख्य भूमिकेत झळकणार ‘ही’ अभिनेत्री
4

‘आनंदी’नंतर आता आणखी एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला, ‘बाई तुझा आशीर्वाद’मध्ये मुख्य भूमिकेत झळकणार ‘ही’ अभिनेत्री

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.