(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
मराठी चित्रपटसृष्टीतील अत्यंत सुंदर आणि गुणी व्यक्तिमत्त्व असलेली अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी जिची नेहमीच सोशल मीडियावर चर्चा रंगात असते. आज अभिनेत्री तिचा ३६ वा वाढदिवस साजरा करत आहे. तसेच तिचा चाहता वर्ग देखील मोठा असून तिचे चाहते तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहे. प्राजक्ता माळीने आजवर अनेक चित्रपटांमध्ये, मालिकांमध्ये विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. इतकंच नव्हे तर तिने स्वत:चा एक काव्यसंग्रह देखील प्रसिद्ध केला आहे. एक कवी, एक अभिनेत्री, एक उत्तम नृत्यांगना असण्यासोबतच एक उत्तम होस्ट देखील आहे. प्राजक्ता एक व्यक्ती म्हणून लोकांना नेहमीच आवडत आली आहे. तिच्या मधुर आवाजावर देखील चाहते फिदा आहेत.
प्राजक्ताचा जन्म 8 ऑगस्ट 1989 साली पंढरपूर येथे झाला. पंढरपूरमध्ये तिचा जन्म झाला असला तरी अभिनेत्रीचे संपूर्ण बालपण हे पुण्यात गेले आहे. तिचे वडील सेंट्रल इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंटमध्ये काम करणारे माजी अधिकारी आहेत. तिच्या आईचे नाव श्वेता माळी आहे. प्राजक्ताला एक लहान भाऊ देखील आहे. त्याचे नाव आहे प्रसाद माळी. अभिनेत्रीचे छोटेच कुटुंब आहे परंतु ते खूप सुखी आणि आनंदी आहेत. प्राजक्ता नेहमी तिच्या कुटुंबासोबत फोटो शेअर करताना दिसत असते.
‘क्योंकि सास भी कभी बहू थी’चे पुनरागमन! 1.6 बिलियन मिनिटांचा ऐतिहासिक विक्रम
अभिनेत्रीचे संपूर्ण शिक्षण
पुण्यातील शिवरामपंत दामले प्रशाला येथून प्राजक्ताने आपले शालेय शिक्षण पूर्ण केले आहे. प्राजक्ताने बॅचलर ऑफ आर्ट्स आणि मास्टर्स ऑफ आर्ट्स ह्या पदव्या भरतनाटय़म या विषयात पूर्ण केलेल्या आहेत. ललित कला केंद्र पुणे युनिव्हर्सिटी येथून तिने आपले पदवी शिक्षण पूर्ण केले. इतकंच नव्हे तर भरतनाट्यममध्ये पदवी संपादन करण्यासाठी तिला राज्य सरकारतर्फे दिली जाणारी शिष्यवृत्ती देखील मिळाली हाेती.
प्राजक्ताला अगदी लहानपणापासून डान्सची आवड होती. म्हणून वयाच्या 6 व्या वर्षी तिने भरतनाट्यम शिकण्यास सुरुवात केली होती. इतकेच नव्हे तर जेव्हा ती 13 किंवा 14 वर्षांची होती तेव्हा स्टार प्लसवरील ‘क्या मस्ती क्या धूम’ या रिॲलिटी शोमध्ये तिने भाग घेतला होता. ही स्पर्धा तिने जिंकली देखील होती. त्यानंतर तिने अनेक नाटकांमध्ये, एकांकिकांमध्ये तसेच डान्स शोमध्ये भाग घेतला होता.
प्राजक्ताचे सिनेमासृष्टीत पदार्पण
प्राजक्ता माळीने 2011 साली स्टार प्रवाहवरील ‘सुवासिनी’ या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते. या मालिकेमध्ये तिने सावित्री हे पात्र निभावले हाेते. या मालिकेनंतर तिने झी मराठी वरील ‘एका पेक्षा एक: अप्सरा आली’ या रिअलिटी शोमध्ये सहभाग घेतला होता. 2013 साली ‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेने तिला प्रसिद्धीच्या झोतात आणले होते. या मालिकेमध्ये ती प्रसिध्द अभिनेता ललित प्रभाकर यांच्यासोबत झळकली होती.
कोण आहे ‘हे’ लेस्बियन कपल? ज्यांनी ‘बिग बॉस’मध्ये प्रवेश करताच सोशल मीडियावर उडाली खळबळ
यानंतर प्राजक्ताला अनेक मराठी चित्रपट, नाटक आणि वेब सिरीजमध्ये काम करण्याची संधी मिळाली. आणि तिने या संधीचे सोने करून मराठी मधील उत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक ठरली. तिच्या नावाची चाहत्यांमध्ये चर्चा सुरु झाली. तसेच यानंतर प्राजक्ता महाराष्ट्राची हास्य जत्रा या कॉमेडी शो मध्ये होस्टिंग करताना दिसली. ती अनेक वर्ष या कार्यक्रमाची होस्ट आहे, तिचा आवाज आणि तिचा होस्टिंगचा अंदाज चाहत्यांना खूप आवडतो.
निर्मिती क्षेत्रात केले पदार्पण
तसेच, प्राजक्ताचा नुकताच गेल्या वर्षी ‘फुलवंती’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाद्वारे अभिनेत्रीने निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवले. ‘फुलवंती’ हा चित्रपट शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या लेखणीतून मोठ्या पडद्यावर सादर करण्यात आला. या चित्रपटामध्ये प्राजक्ता माळी आणि गश्मीर महाजनी या दोघांसह अनेक मराठी कलाकार दिसले. तसेच या चित्रपटाला अनेक पुरस्कार देखील मिळाले, आणि प्राजक्ताने देखील स्वतःच्या नावावर अनेक पुरस्कार मिळवले. प्राजक्ताची ही प्रगती पाहून तिचे चाहते खुश आहेत. तसेच, तिचे अनेक नवनवीन चित्रपट पाहण्यासाठी ते उत्सुक आहेत.