(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
सलमान खानच्या ‘बिग बॉस १९’ या रिॲलिटी शोपूर्वी आणखी एक शो सुरू झाला आहे. या शोचे नाव मल्याळम रिॲलिटी शो ‘बिग बॉस सीझन ७’ आहे. हा सीझन प्रसारित झाल्यानंतर, सर्वांच्या नजरा या शोच्या दोन स्पर्धकांवर आहेत. याचे कारण म्हणजे शोमध्ये आलेले लेस्बियन जोडपे आदिला आणि फातिमा. या दोघीनींही या शो मध्ये एन्ट्री केली आहे. तसेच सोशल मीडियावर या दोघींचीच चर्चा रंगली आहे.
‘क्योंकि सास भी कभी बहू थी’चे पुनरागमन! 1.6 बिलियन मिनिटांचा ऐतिहासिक विक्रम
मोहनलालच्या ‘बिग बॉस मल्याळम सीझन ७’ मध्ये दिसलेले हे लेस्बियन जोडपे सौदी अरेबियाचे आहे. दोघेही १२ वीत शिकत असताना सौदी अरेबियात पहिल्यांदा भेटले. त्यानंतर त्यांची मैत्री झाली आणि नंतर त्यांची मैत्री प्रेमात बदलली. विशेष म्हणजे आदिला आणि फातिमाचे कुटुंबही एकमेकांच्या जवळ होते. काही काळानंतर दोघांनीही त्यांच्या कुटुंबियांना त्यांच्या प्रेमाबद्दल सांगण्याचा निर्णय घेतला.
फातिमा आणि आदिला कोण आहेत?
जेव्हा दोघीनींही त्यांच्या कुटुंबाला याबद्दल सांगितले तेव्हा त्यांच्या कुटुंबियांचा विरोध होता. दोघींवरही दबाव आणला गेला. त्यानंतर दोघांनीही घर सोडण्याचा निर्णय घेतला. दोघीनींही त्यांच्या कुटुंबियांना वेगळे केले. परंतु, अंतर देखील त्यांचे प्रेम संपवू शकले नाही. आदिलाने फातिमासोबतचे तिचे प्रेम उघडपणे न्यायालयात नेण्याचा निर्णय घेतला. केरळ उच्च न्यायालयात हेबियस कॉर्पस याचिका दाखल करण्यात आली. ज्या अंतर्गत असा आरोप करण्यात आला की फातिमाला तिच्या इच्छेविरुद्ध नेण्यात आले. तिच्यावर धर्मांतर थेरपी करण्यात आली. न्यायालयाने दोघांशीही खाजगीत बोलून त्यांच्या बाजूने निकाल दिला. LGBTQ समुदाय देखील या दोघांच्या समर्थनार्थ आला.
शोमध्ये 19 कलाकार झाले सामील
मोहनलालचा ‘बिग बॉस’ जिओ हॉटस्टारवर पाहता येणार आहे. या शोमध्ये 19 स्टार्सनी एन्ट्री केली आहे. आदिला आणि फातिमा व्यतिरिक्त अप्पानी सरथ, सारिका, रेणू सुधी, शैथ्या, नवीन, शानवास शानू, गिझेल ठकराल, मुन्शी रणजीत, रेना फातिमा, अभिलाष, बिन्नी नोबिन, आरजे बिन्सी, ओनिल साबू, अकबर खान, कलाभवन सारिगा, आर्यन कथुरिया आणि इतर अनेक स्पर्धकांचा समावेश आहे. हे सगळे स्पर्धक प्रेक्षकांचं मनोरंजन करताना आणि या खेळाला नवी रंगत आणणार आहे.