(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
एव्हरेस्ट एंटरटेनमेंट प्रस्तुत ‘प्रेमाची गोष्ट २’ या चर्चेत असलेल्या चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता आणि त्याला प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला. एका लव्हस्टोरीच्या अरेंज मॅरेजभोवती फिरणाऱ्या या चित्रपटाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. आणि आता या चित्रपटातील पहिलं गोड, रोमँटिक गाणं ‘ये ना पुन्हा’ प्रदर्शित झालं आहे. या गाण्याला देखील प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळत आहे.
रोहित राऊतच्या युथफुल आणि फ्रेश आवाजात सादर झालेलं हे गाणं श्रोत्यांना प्रेमाच्या नव्या भावविश्वात घेऊन जाणारं आहे. अविनाश–विश्वजीत यांनी दिलेलं आकर्षक आणि मॉडर्न टच असलेलं संगीत, तसेच विश्वजीत जोशी यांनी लिहिलेले आजच्या पिढीच्या मनाला भिडणारे शब्द यामुळे हे गाणं तरुणाईला निश्चितच पसंत पडणार आहे. हे गाणं ऐकताच कोणालाही प्रेमात हरवल्यासारखं, आठवणींमध्ये रममाण झाल्याचं वाटेल. हे गाणं नक्कीच प्रेक्षकांना वेड करेल असं आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सतीश राजवाडे यांनी केलं आहे.
माधुरी दीक्षितने सीन नाकारला, दिग्दर्शक म्हणाले; “सीन कर नाहीतर चित्रपट सोड”
दिग्दर्शक सतीश राजवाडे या चित्रपटाबद्दल आणि गाण्याबद्दल म्हणाले, “प्रेमाच्या प्रवासातील काही क्षण आयुष्यभर लक्षात राहातात. ‘ये ना पुन्हा’ हे गाणं त्या क्षणांची जादू प्रामाणिकपणे पकडतं. पडद्यावर ही भावना आणताना आम्ही प्रत्येक फ्रेममध्ये युथच्या नजरेतून बघण्याचा प्रयत्न केला आहे.” तसेच निर्माते संजय छाब्रिया म्हणाले, “हे गाणं ऐकल्यावर मनात पुन्हा प्रेम फुलल्यासारखं वाटतं. शब्द, संगीत आणि रोहितचा आवाज – या तिन्ही गोष्टी एकत्र येऊन हे गाणं आजच्या तरुणाईला आणि संगीतप्रेमींना नक्की भावेल.”
गाण्याचा गायक रोहित म्हणाला, “या गाण्याचा प्रत्येक सुर आणि शब्द खूप खास आहे. गाताना मला जबरदस्त मजा आली आणि खात्री आहे की, हे गाणं ऐकताना प्रत्येकजण आपल्या लव्हस्टोरीशी रिलेट करेल.” संगीतकार अविनाश–विश्वजीत म्हणाला, “हे गाणं तयार करताना आमचं एकच ध्येय होतं ते म्हणजे आजच्या युथला एक शुद्ध, रोमँटिक आणि जादुई अनुभव देणे. आम्हाला विश्वास आहे की, हे गाणं सर्व संगीतप्रेमींच्या प्लेलिस्टमध्ये आवर्जून जागा मिळवेल.”
सिंगापूरमध्ये पाण्यात बुडून झाला गायक जुबिन गर्गचा मृत्यू; पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून समोर आले कारण
एव्हरेस्ट एंटरटेनमेंट प्रस्तुत ‘प्रेमाची गोष्ट २’ या चित्रपटाचे दिग्दर्शन सतीश राजवाडे यांनी केले असून निर्माते संजय छाब्रिया तर सह-निर्माते अमित भानुशाली आहेत. २१ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणाऱ्या या नव्या प्रेमकथेत ललित प्रभाकर, ऋचा वैद्य, रिधिमा पंडित, स्वप्नील जोशी आणि भाऊ कदम हे कलाकार झळकणार आहेत. प्रेम आणि नशिबाचा हा सुंदर प्रवास प्रेक्षकांना एक नवा, ताजातवाना अनुभव देणार आहे. हा चित्रपट आता प्रेक्षकांना आवडतोय का नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.