Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अंगावर शाल अन् भित्रा लूक… पुष्कर श्रोत्रीचा नवा अंदाज चर्चेत; म्हणतो, “श्श… घाबरायचं नाही”

मराठी अभिनेता पुष्कर श्रोत्री लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस काहीतरी खास घेऊन येत आहे. अभिनेत्याने अंगावर शाल अन् भित्रा लूक सोशल मीडियावर शेअर करून प्रेक्षकांचं लक्ष वेधले आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Jul 24, 2025 | 05:28 PM
(फोटो सौजय -इन्स्टाग्राम)

(फोटो सौजय -इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

मराठी रंगभूमीचे प्रेक्षक हे केवळ मनोरंजनासाठी नाटक बघत नाही, तर ते नेहमीच वेगळं, काहीतरी आशयघन अनुभवण्यासाठी नाटक बघण्यासाठी येतात. अभिनेता पुष्कर श्रोत्री आपल्या आगामी नाटकाबद्दल आता माहिती देताना दिसला आहे. ‘श्श… घाबरायचं नाही’ या नाट्यपूर्ण सादरीकरणात तो एक वेगळ्या शैलीतील, वेगळ्या स्वरुपातील अभिनय करताना दिसणार आहे. त्याला पाहण्यासाठी चाहते आता उत्सुक आहेत. तसेच चित्रपटानंतर आता अनेक दिवसांनी अभिनेता रंगभूमीवर प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसणार आहे.

“मी काय वेगळं करू शकतो?” या विचारातून या सादरीकरणाची कल्पना जन्माला आली आहे असे पुष्कर श्रोत्री याचे म्हणणे आहे. “माझ्या करिअरमध्ये मी अनेक प्रकारची नाटकं केली, पण मतकरींच्या गूढशैलीतील संहितेला रंगमंचावर बोलकं करणं ही एक वेगळीच जबाबदारी आहे,” असे अभिनेत्याचे म्हणणे आहे.

‘कपडे काढ अन् …’ जॉनी लिव्हरची मुलगी जेमीने व्हिडिओ कॉलवर दिली होती ऑडिशन, केला धक्कादायक खुलासा

बदाम राजा प्रॉडक्शन आणि दिग्दर्शक विजय केंकरे यांच्यासोबत यापूर्वी ‘अ परफेक्ट मर्डर’ सारखं सस्पेन्स नाटक साकारताना पुष्करला जाणवलं की विनोदी नाटकांच्या गर्दीत प्रेक्षक काही तरी वेगळं शोधत असतो. आणि म्हणून मतकरींच्या गूढ कथांना नाट्यरूप देण्याचा विचार केला गेला आहे. रत्नाकर मतकरी हे मराठी साहित्यातलं असं नाव आहे, जे मराठी सृजनविश्वात कायमस्वरूपी कोरले गेलेलं आहे. त्यांनी गूढ कथांच्या माध्यमातून मराठी साहित्यात एक स्वतंत्र आणि प्रभावी वाट निर्माण केली. त्यांच्या कथा भयाच्या पलीकडची, माणसाच्या अंतर्मनाशी बोलणाऱ्या आहेत आणि त्याच लेखनशैलीला नव्या स्वरुपात उलगडण्याचा ध्यास घेऊन हा नाट्यप्रयोग साकारला आहे.

‘श्श… घाबरायचं नाही’ ही दोन गूढ कथांची नाट्यात्मक मांडणी असून, वाचनपुरती मर्यादित न ठेवता, ती प्रेक्षकांसमोर प्रकाशयोजना, आवाज, अभिनय आणि दृश्य माध्यमांद्वारे एक सजीव अनुभव म्हणून उभी राहते. पुष्कर म्हणाला की, “जगभरात सस्पेन्स, मिस्ट्री, थ्रिलर या जॉनरला तरुण प्रेक्षक आकर्षित होतोच. मग मराठी रंगभूमी याला अपवाद का ठरावी? मतकरींची भाषा बोलायला मिळणं ही माझ्यासाठी मोठी संधी आहे. ती भाषा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणं हे माझं कर्तव्यच आहे.”

अमिताभ बच्चन आणि आमिर खानला RTO चा मोठा दणका, ठोठावला लाखोंचा दंड; जाणून घ्या प्रकरण

या संकल्पनेची निर्मिती ‘बदाम राजा प्रॉडक्शन’ने केली असून, नावीन्य आणि परंपरेचा मेळ साधणाऱ्या या संस्थेने अनेक धाडसी प्रयोग साकारले आहेत. ही कलाकृती केवळ सादरीकरण नाही, तर एक संवेदनशील सांस्कृतिक दुवा आहे जो मतकरींच्या लेखनातून प्रेक्षकांच्या मनात थेट भिडतो. ‘श्श… घाबरायचं नाही’ हे सादरीकरण रत्नाकर मतकरी यांच्या साहित्याचा, शैलीचा आणि प्रभावाचा नवा आविष्कार आहे. प्रेक्षकांसाठी ती एक साक्षात जिवंत आठवण ठरणार आहे आणि नव्या पिढीसाठी नवा अनुभव ठरणार आहे. ‘श्श… घाबरायचं नाही’चा शुभारंभाचा प्रयोग बुधवार, ३१ जुलै २०२५ रोजी संध्याकाळी ७ वाजता, मुंबईतील ओपेरा हाऊस येथे सादर होणार आहे.

Web Title: Pushkar shrotris shhh ghabraycha nahi brings ratnakar matkaris mysterious stories alive on stage

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 24, 2025 | 05:28 PM

Topics:  

  • entertainment
  • Marathi News
  • Marathi Theatre

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: मुख्यमंत्री फडणवीसांचे मराठी भाषेबाबत महत्वाचे विधान; म्हणाले, “… हा आपल्या सर्वांचा सन्मान”
1

Devendra Fadnavis: मुख्यमंत्री फडणवीसांचे मराठी भाषेबाबत महत्वाचे विधान; म्हणाले, “… हा आपल्या सर्वांचा सन्मान”

भिवंडी हादरली, न्यायालयातून पसार आरोपीने पुन्हा चिमुरडीवर अत्याचार करून केली हत्या
2

भिवंडी हादरली, न्यायालयातून पसार आरोपीने पुन्हा चिमुरडीवर अत्याचार करून केली हत्या

ऑनलाइन गेम खेळताना मागितले प्रायव्हेट फोटो, अक्षय कुमारच्या लेकीसोबत घडलं भयंकर; अभिनेत्याचा खुलासा
3

ऑनलाइन गेम खेळताना मागितले प्रायव्हेट फोटो, अक्षय कुमारच्या लेकीसोबत घडलं भयंकर; अभिनेत्याचा खुलासा

‘कोकण हार्टेड गर्ल’चा नवा प्रवास, अंकिता आणि कुणालचं प्रोडक्शन हाऊस सुरु
4

‘कोकण हार्टेड गर्ल’चा नवा प्रवास, अंकिता आणि कुणालचं प्रोडक्शन हाऊस सुरु

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.