(फोटो सौजय -इन्स्टाग्राम)
ज्येष्ठ कॉमेडियन अभिनेते जॉनी लिव्हर यांची मुलगी जेमी लिव्हर नुकतीच चर्चेत आली आहे. ती नेहमीच सोशल मीडियावर तिच्या विनोदाने चाहत्यांचे खूप मनोरंजन करताना दिसत असते. तिला चित्रपटांमध्येही नशीब कमवायचे आहे. जेमी देखील ऑडिशन्स देत राहते. पण एकदा ऑडिशन्समध्ये दिग्दर्शकाने तिच्याकडून एक घाणेरडी मागणी केली. यानंतर जेमी खूप घाबरली. जेमीने स्वतः याबद्दल आता खुलासा केला आहे. ती नक्की काय म्हणाली आहे जाणून घेऊयात.
जेमीने व्हिडिओ कॉलवर दिला ऑडिशन
झूमशी बोलताना जेमी म्हणाली की, ‘एक ऑडिशन करताना त्यांनी मला सांगितले की ते स्क्रिप्ट शेअर करणार नाही कारण त्यांना ऑडिशन्समध्ये इम्प्रोव्हायझेशन हवे आहे.’ त्यानंतर थोड्याच वेळात एक मीटिंग लिंक आली. जेमीने त्या मीटिंग लिंकवर क्लिक केले. जेमीचा व्हिडिओ चालू झाला. पण समोरच्या व्यक्तीने व्हिडिओ चालू केला नाही. यांनतर जेमीने जे सांगितले ते खूप धक्कादायक होते.
‘पुष्पा २’ आणि ‘अॅनिमल’ला दिली टक्कर? ‘Saiyaara’ ने रचला इतिहास, बनवला नव्या रेकॉर्ड
जेमी पुढे म्हणाली की, ‘तो माणूस स्वतःला दिग्दर्शक म्हणवत होता आणि म्हणाला होता की तो प्रवासात आहे म्हणून तो त्याचा व्हिडिओ चालू करू शकत नाही. हा एक आंतरराष्ट्रीय चित्रपट आहे ज्यासाठी आम्ही तुला कास्ट करत आहोत. तू योग्य आहेस. पण काही गोष्टी आहेत ज्या आम्हाला तपासायच्या आहेत.’ असे म्हणून त्याने जेमीकडे घाणेरडी मागणी केली.
जेमीला तिचे कपडे काढण्यास सांगितले
जेमी पुढे म्हणाली, ‘त्याने मला कल्पना करायला सांगितले की एक ५० वर्षांचा माणूस तुझ्यासोबत आहे आणि तू त्याला फसवण्याचा प्रयत्न करत आहेस. आणि त्यानंतर एक इंटिमेट सीन असेल. यानंतर मी म्हणाले की मला इंटिमेट सीन्स आवडत नाहीत. जेव्हा स्क्रिप्ट असेल तेव्हा मी ते फॉलो करेन. असे म्हणाल्या नंतर तो तो म्हणाला की कोणतीही स्क्रिप्ट नाही. ते इम्प्रूव्हाइज्ड केले जाईल तुम्हाला तुमचे कपडे काढायला सांगतील, किंवा काही बोलायचे असेल किंवा दुसरे काही करायचे असेल तर तुम्ही ते करू शकता.’
जेमी पुढे म्हणाली की, ‘मला याबद्दल कोणीही सांगितले नाही. मला ते आवडत नाही. म्हणून त्यांनी सांगितले की हा एक खूप मोठा प्रकल्प आहे आणि आम्ही तुम्हाला त्यासाठी निवडू इच्छितो. तुमच्यासाठी ही एक मोठी संधी आहे. म्हणून मी त्यांना सांगितले की साहेब तुम्ही मला व्हिडिओ कॉलवर माझे कपडे काढण्यास सांगत आहात. मला हे आवडत नाही. आणि मला त्याबद्दल सांगितलेही नाही. मग मी म्हणाले की मला आता तुमच्याशी बोलणेही आवडत नाही आहे यानंतर मी कॉल डिस्कनेक्ट केला.’