Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

लोकप्रिय ‘नटरंग’ नंतर तब्बल पंधरा वर्षांनी नवा तमाशापट, रवी जाधव यांचा ‘फुलवरा’ प्रेक्षकांच्या भेटीस

नटरंग या चित्रपटानंतर आता तब्बल पंधरा वर्षांनी नवा तमाशापट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. दिग्दर्शक रवी जाधव 'फुलवरा' हा तमाशापट लावरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. जो पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

  • By सायली ससाणे
Updated On: Oct 21, 2025 | 01:17 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • ‘नटरंग’ नंतर तब्बल पंधरा वर्षांनी नवा तमाशापट
  • रवी जाधव यांचा ‘फुलवरा’ प्रेक्षकांच्या भेटीस
  • चित्रपट कधी होणार प्रदर्शित ?

पंधरा वर्षांपूर्वी म्हणजेच २०१० साली आलेल्या ‘नटरंग’ या चित्रपटाने त्या काळात अमाप लोकप्रियता मिळवत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं होतं. या चित्रपटाचं दिग्दर्शन रवी जाधव यांनी केलेहोते. तर झी टॉकीजची आणि आताची झी स्टुडिओज ही त्यांची पहिलीच निर्मिती होती. मराठी चित्रपटसृष्टीत इतिहास घडविणाऱ्या या चित्रपटाची निर्मिती करणारे झी स्टुडिओज, अथांश कम्युनिकेशन आणि दिग्दर्शक रवी जाधव पुन्हा एकदा एकत्र आले आहेत. एक नवा कोरा तमाशापट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे, ज्याचं नाव आहे ‘फुलवरा’. दिवाळी सणाच्या शुभमुहूर्तावर समाजमाध्यमावरून या चित्रपटाची अधिकृत घोषणा करण्यात आली असून चित्रपटाबद्दल चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे.

Asarani : असरानी यांचे शेवटचं स्वप्नं राहिले अपुरे, जाणून चाहत्यांनाही होईल पश्चाताप

फुलवराबद्दल बोलताना दिग्दर्शक रवी जाधव म्हणाले की, “तमाशा हा माझा आवडता लोककलाप्रकार आहे. तमाशाच्या फडावरती हे कलावंत आपली कला सादर करुन प्रेक्षकांचं मनोरंजन करतात तेवढंच रंजक फडाच्या मागचं त्यांचं आयुष्य असतं आणि हेच आयुष्य मला कायम अस्वस्थ करतं. यावरच आधारीत एक विषय माझ्या डोक्यात होता. याचदरम्यान मी ‘द फोक आख्यान’ हा एक अनोखा लोककलाविष्कार बघितला आणि त्या सादरीकरणाने मी भारावून गेलो. सध्याची ही तरुण पिढी ज्या आत्मियतेने आणि तळमळीने आपली लोककला, परंपरा प्रेक्षकांपर्यंत पोहचविण्याचं काम करत आहेत ते वाखणण्याजोगं आहे.’

 

पुढे म्हणाले, ‘या कलाकारांचा हा ध्यास बघूनच त्यांच्या सोबतीने लोककलेचा एक नवा अध्याय प्रेक्षकांसमोर चित्रपटाच्या माध्यमातून मांडावा असा विचार मनात आला आणि त्यातूनच फुलवरा चित्रपटाची गोष्ट तयार झाली. ‘द फोक आख्यान’ ज्याच्या लेखन आणि निवेदनातून सजलं आहे त्या ईश्वर अंधारेचा या विषयावरचा अभ्यास थक्क करणारा आहे आणि हर्ष – विजय या तरुण जोडगोळीला असलेली लोकसंगीताची जाण ही कौतुकास्पद आहे. या तरुणांची लोककलेवरची श्रद्धा, माझं या कलेप्रती असलेलं प्रेम आणि गाठीशी असलेला अनुभव एकत्र आणला आणि फुलवराची गोष्ट तयार झाली.’ असे ते म्हणाले.

ऐन दिवाळीत नोरा फतेहीचा हळदीसोहळा? कोरियन अभिनेत्यासोबतचे फोटो पाहून चाहते थक्क, Photo व्हायरल

‘फुलवरा’ चित्रपटाची संकल्पना आणि दिग्दर्शन रवी जाधव यांचे असून कथा-पटकथा-संवाद आणि गीते ईश्वर ताराबाई अंधारे यांचे आहेत. संगीत हर्ष-विजय यांचं असून निर्मिती उमेशकुमार बन्सल, बवेश जानवलेकर (झी स्टु़डिओज) आणि मेघना जाधव (अथांश कम्युनिकेशन) यांची आहे. चित्रपटात प्रमुख भूमिकेत कोणते कलाकार असतील हे अद्याप गुलदस्त्यात असून याबद्दलची उत्सुकता प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाली आहे. पुढच्या वर्षीच्या दिवाळीत हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

Web Title: Ravi jadhav announces new movie phulwara tamashapat after 15 years of natarang

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 21, 2025 | 01:15 PM

Topics:  

  • entertainment
  • marathi film
  • marathi movie

संबंधित बातम्या

Asarani : असरानी यांचे शेवटचं स्वप्नं राहिले अपुरे, जाणून चाहत्यांनाही होईल पश्चाताप
1

Asarani : असरानी यांचे शेवटचं स्वप्नं राहिले अपुरे, जाणून चाहत्यांनाही होईल पश्चाताप

Bigg Boss 19 : या आठवड्यात या स्पर्धकांवर नाॅमिनेशनची टांगती तलवार! कोणाचा होणार पत्ता कट, नावे जाणून तुम्हाला बसेल धक्का
2

Bigg Boss 19 : या आठवड्यात या स्पर्धकांवर नाॅमिनेशनची टांगती तलवार! कोणाचा होणार पत्ता कट, नावे जाणून तुम्हाला बसेल धक्का

‘काही दिवसांआधीच मी भेटलो, माझ्याकडे शब्द नाहीत…’, असरानी यांच्या निधनाने अक्षय कुमार दुःखी; म्हणाला…
3

‘काही दिवसांआधीच मी भेटलो, माझ्याकडे शब्द नाहीत…’, असरानी यांच्या निधनाने अक्षय कुमार दुःखी; म्हणाला…

Bigg Boss : सलमानच्या घरात नवा राडा! गौरव खन्ना घरातील सदस्यांविरुद्ध संतापला, चाहते झाले आनंदित
4

Bigg Boss : सलमानच्या घरात नवा राडा! गौरव खन्ना घरातील सदस्यांविरुद्ध संतापला, चाहते झाले आनंदित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.