Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • TCS Nashik Case |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अभिनेता गोविंदाने केला मोठा खुलासा! नीलमवर जडलं होतं प्रेम; 36 वर्षांपूर्वी साखरपुडा मोडल्याची दिली कबुली

गोविंदाने आता अखेर नीलम कोठारीसोबतच्या त्याच्या नात्याबद्दल मोठा खुलासा केला आहे. अभिनेत्याने तिचे कौतुक देखील केले, आणि आता त्यांच्या नात्याबद्दल एक विधान व्हायरल होत आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Mar 05, 2026 | 03:23 PM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Close
Follow Us:
  • अभिनेता गोविंदाने केला मोठा खुलासा
  • नीलमसोबतच्या नात्यावर स्पष्टचं सांगितले
  • 36 वर्षांपूर्वी साखरपुडा मोडल्याची दिली कबुली
बॉलीवूडमधील ‘हिरो नंबर 1’ म्हणून ओळखले जाणारे गोविंदा आणि त्यांच्या खासगी आयुष्यातील किस्से नेहमीच चर्चेत असतात. नव्वदच्या दशकात पडद्यावर धुमाकूळ घालणारे गोविंदा गेल्या काही वर्षांत बॉक्स ऑफिसवर फारसे यशस्वी ठरले नसले, तरी अलीकडच्या काळात ते आणि त्यांची पत्नी सुनीता सतत चर्चेत आहेत. सुनीताने एका मुलाखतीत गोविंदाचे अफेअर सुरू असल्याचा आरोप केला होता, मात्र अभिनेत्याने हे आरोप फेटाळून लावले.

दरम्यान, 1980–90 च्या दशकात अभिनेत्री नीलम कोठारीसोबतच्या त्यांच्या नात्याच्या चर्चेचेलाही उधाण आले आहे. गोविंदा आणि नीलम यांचे नाव यापूर्वीही अनेकदा एकत्र जोडले गेले होते. मात्र नीलमने अलीकडेच स्पष्ट शब्दांत सांगितले की ते दोघे फक्त सहकलाकार म्हणून काम करत आहेत. आता सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या एका नव्या मुलाखतीत गोविंदाने नीलमला बाहुलीसारखी’ म्हटले आहे. तसेच एका काळात ते दोघे खूप जवळ होते आणि तिच्याबद्दल त्यांना आकर्षण वाटत होते, अशी कबुलीही अभिनेत्याने आता दिली आहे.

‘सुट्टा रोल’ गाण्याने वाढवली Super Duper चित्रपटाची क्रेझ; ललित प्रभाकर–विदुला चौघुलेचा ग्लॅमरस अंदाज चर्चेत

अभिनेत्री बाहुलीसारखी दिसायची

सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत नीलमसोबतच्या अफेअरच्या अफवांबद्दल विचारले असता गोविंदाने सांगितले की त्यांच्या दोघांमध्ये एक वेगळ्याच प्रकारचे आकर्षण होते. अभिनेता म्हणाला, “पाहा, आमच्यासारख्या गावाकडच्या मुलांना गोऱ्या मुली खूप आवडतात. विरुद्ध स्वभावातील आकर्षण असणे हे अगदी नैसर्गिक आहे. नीलम खूप वेगळी आणि अतिशय चांगली मुलगी होती. तिला पाहिल्यावर जणू एखादी बाहुलीच आहे असे वाटायचे.”

नीलमच्या व्यक्तिमत्त्वाने अभिनेता प्रभावित

गोविंदाने सांगितले की नीलमची बाहुलीसारखी व्यक्तिमत्त्व त्यांना खूपच भावली होती. त्या आठवणी सांगताना अभिनेता म्हणाला, पूर्वी ते तिचे चित्रपट पाहायचे आणि तिला पाहून शिट्ट्या देखील मारायचे. त्या काळात कधीतरी नीलमसोबत काम करण्याची संधी मिळेल, असे त्यांनी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता. पण नंतर जेव्हा नीलम त्यांची सहकलाकार झाली, तेव्हा त्यांना त्यावर विश्वासच बसत नव्हता. असे अभिनेत्याने म्हटले आहे.

‘त्या वेळी प्रेम फक्त डोळ्यांतूनच व्हायचे’ – गोविंदा

गोविंदाने पुढे सांगितले की त्या काळात अफेअर्स आजच्या सारखे उघडपणे होत नसत. अभिनेता म्हणाला, “त्या वेळेस अफेअर्स आजच्या सारखे नव्हते. आम्ही फक्त मजा-मस्ती करत असायचो आणि काहीतरी सुरू आहे असे वाटायचे. त्या काळातील रोमांस फक्त नजरेतून व्यक्त व्हायचा. मात्र आम्ही एकत्र खूप चांगले काम केले. आमचे जवळपास प्रत्येक चित्रपट आणि गाणी सुपरहिट ठरली आहेत.” असे अभिनेता म्हणाला आहे.

सोनू सूद पुन्हा बनला ‘रिअल लाइफ हिरो’; दुबईत अडकलेल्या लोकांसाठी पुढे केला मदतीचा हात, पोस्ट करत म्हणाला…

गोविंदा आणि नीलम यांचे नातं

३६ वर्षांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीतही गोविंदाने नीलमसोबतच्या नात्याची कबुली दिली होती. गोविंदा आणि नीलम यांच्या नात्याबद्दलची चर्चा ही काही पहिल्यांदाच होत नाही. नव्वदच्या दशकापासूनच त्यांच्या नात्याबद्दल विविध अफवा आणि दावे समोर येत आहेत. असेही म्हटले जाते की एका काळात गोविंदा आपल्या को-स्टार नीलमवर इतके फिदा झाले होते की त्यांनी तिच्याशी लग्न करण्याचाही विचार केला होता. त्या काळात १९९० साली ‘स्टारडस्ट’ला दिलेल्या मुलाखतीत गोविंदाने नीलमवर प्रेम असल्याची कबुली दिली होती आणि तिच्यासाठी त्यांनी सुनीतासोबतची साखरपुडाही तोडला होता. नंतर मात्र त्यांनी सुनीताशीच विवाह केला.

 

Web Title: Govinda admits being attracted to doll like neelam kothari in 90s also talks about their romance

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 05, 2026 | 03:23 PM

Topics:  

  • Bollywood
  • entertainment
  • Govinda

संबंधित बातम्या

‘सखे गं साजणी’ ठरतोय प्रेक्षकांचा फेव्हरेट; सलग तिसऱ्या आठवड्यातही दमदार प्रदर्शन
1

‘सखे गं साजणी’ ठरतोय प्रेक्षकांचा फेव्हरेट; सलग तिसऱ्या आठवड्यातही दमदार प्रदर्शन

Tamannah सोबत ब्रेकअपनंतर Vijay Varma झाला होता उद्धवस्त! सिनेसृष्टीपासून राहिला लांब; म्हणाला, ‘लोक शिव्या देत…’
2

Tamannah सोबत ब्रेकअपनंतर Vijay Varma झाला होता उद्धवस्त! सिनेसृष्टीपासून राहिला लांब; म्हणाला, ‘लोक शिव्या देत…’

Sushant Singh Rajput’s च्या बहिणीने घेतली नवी प्रॉपर्टी; चावी हातात येताच घडली ‘विचित्र’ गोष्ट
3

Sushant Singh Rajput’s च्या बहिणीने घेतली नवी प्रॉपर्टी; चावी हातात येताच घडली ‘विचित्र’ गोष्ट

Asha Bhosle Death: ‘गातागाता प्राण जावेत’,आशा भोसले यांची अखेरची इच्छा; चाहत्यांचे डोळे पाणावले
4

Asha Bhosle Death: ‘गातागाता प्राण जावेत’,आशा भोसले यांची अखेरची इच्छा; चाहत्यांचे डोळे पाणावले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.