
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
बॉलीवूडच्या जुन्या चित्रपटांमधील सदाबहार गाणी आजही रसिकांच्या मनात तितकंच स्थान टिकवून आहेत. “निगाहें मिलाने को जी चाहता है” हे गाणं . १९६३ साली प्रदर्शित झालेल्या ‘दिल ही तो है’ या चित्रपटातील हे गीत दिग्गज पार्श्वगायिका आशा भोसले यांच्या आवाजात असून आजही प्रत्येक कार्यक्रमात प्रेक्षकांकडून या गाण्याची मागणी होताना दिसते.
आता ह्याच सुपरहिट गाण्याला एक नवा तडका मिळाला आहे. मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री रिंकू राजगुरूने “निगाहें मिलाने को…” या गाण्यावर थिरकत एक खास व्हिडिओ शेअर केला आहे. प्रेक्षकांच्या लाडक्या रिंकूने हा डान्स प्रसिद्ध कोरिओग्राफर लावणी किंग आशीष पाटीलसोबत सादर केला असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.या व्हिडिओमध्ये डान्स करताना दोघांचे एक्स्प्रेशन्स कमाल होते. तसेच या दोघांच्या लूकने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे.
हा व्हिडिओ शूट करण्यासाठी रिंकूने सुंदर ऑफ व्हाइट रंगाचा लेहंगा परिधान केला होता. तर आशीष पाटीलने त्याच रंगाचा कुर्ता परिधान केला होता. यात त्यांनी ट्विनिंग केल्याचे पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओ रिंकू राजगुरूने पोस्ट केला असून कॅप्शन मध्ये लिहिले, “ही माझी एक वेगळी बाजू आहे…आशीष तुझे खूप खूप आभार… फक्त २ तास रिहर्सल करून इतकं सुंदर सादरीकरण आपण केलं.” यावर आशीष म्हणतो, “रिंकू तुझं डेडिकेशन आणि पेशन्स यामुळे हे शक्य झालं”असे कॅप्शन लिहित अभिनेत्रीने हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
रिंकू राजगुरूच्या नवीन डान्स व्हिडिओवर तिच्या कॅप्शनसोबतच अनेक कलाकारांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अमृता खानविलकरनेही या व्हिडिओवर खास कमेंट करत लिहिले, “क्या बात है… माझा आशू तर आहेच गुणी”. यासह श्रेय्या बुगडे आणि शंतनू महेश्वरी यांनीही रिंकूच्या नृत्यशैलीचे कौतुक केले आहे.