फोटो सौजन्य - JIO Cinema
बिग बॉस मराठी : सध्या टेलिव्हिजनवरचा वादग्रस्त रिॲलिटी शो बिग बॉस मराठी सध्या चांगलाच चर्चेत आहे. यंदा बिग बॉस मराठीचे होस्ट महेश मांजरेकर यांना बदलून बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख यांची निवड करण्यात आली आहे. जेव्हा रितेश देशमुख यांची होस्ट म्हणून जेव्हा निवड करण्यात आली तेव्हा त्याच्यावर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. परंतु मागील चार आठवड्यापासून सुरू असलेल्या बिग बॉस मराठीचा होस्ट रितेश देशमुख हा प्रेक्षकांच्या पसंतीत पडला आहे. शनिवारी भाऊचा धक्का एपिसोड पार पडला. यामध्ये रितेश देशमुखने जान्हवी किल्लेकरला चांगलाच धडा शिकवला. जान्हवी किल्लेकरने पॅडी कांबळे यांना एका आठवड्यामधील भागामध्ये म्हणाली होती की, पॅडी कांबळे हे ओव्हर अक्टिंग करत आला आहे आणि आता बिग बॉसच्या घरामध्ये सुद्धा ओव्हर अक्टिंग करत आहे. या वक्तव्यावरून तिला रितेश देशमुखने तोशेरे ओढले आहेत.
कालच्या शनिवारच्या भागामध्ये भाऊच्या धक्क्यावर चांगलेच सुनावले आहे. रितेश देशमुख जान्हवी किल्लेकरला म्हणाला की, प्रेक्षकांनी तुम्हाला बिग बॉस मराठीच्या इतिहासामधील सर्वात वर्स्ट स्पर्धक म्हणून घोषित केले आहे. फक्त स्पर्धकच नाही तर तुम्ही माणूस म्हणून पण कसे आहेत यावर सुद्धा लोकांना प्रश्न आहे. दुसऱ्यांदाच्या अभिनयाचं प्रमाणपत्र द्यायला तुम्ही कोण आहेत? असा प्रश्न रितेशने जान्हवीला विचारला. कोणत्या गोष्टीमध्ये किती पर्सनल जावं याला सुद्धा लिमिट असते असे रितेशने खडसावलं.
पुढे रितेश म्हणाला की, तुमचा उद्धटपणा ओव्हर, अग्रेशन ओव्हर, अटीट्युड ओव्हर अरोगेन्सला तर तुमच्या लिमिट नाही. या सर्व गोष्टींचा मी आज बंदोबस्त करणार आहे. जो दिसेल त्याचा अपमान करायचा आणि वाटेल ते बोलायचं, धक्के मारायचे. तुम्हाला माहिती आहे ना हा शो फक्त तीन महिन्यापुरता आहे तीन महिन्यानंतर बाहेर पण आयुष्य आहे. या शोमध्ये लोक कॅरियर घडवायला येतात तुम्ही काय संपवायला आला आहेत का?