Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

धीरेंद्र शास्त्रीच्या मुद्द्यावर तापला Riteish Deshmukh! शेअर केली पोस्ट; म्हणाला “असले चौकटीत अडकवण्याचे फोल प्रयत्न…”

संजय गायकवाड यांच्या वादानंतर धीरेंद्र शास्त्री यांच्या वक्तव्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत नवा वाद निर्माण झाला आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Apr 26, 2026 | 06:11 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाच्या शीर्षकावर आक्षेप घेतला तसेच प्रकाशकाला धमकीही दिली. या वादानंतर राज्यात आणखीन एका वादाची पालवी फुटली आहे. धीरेंद्र शास्त्रीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्य वक्तव्य केले आहे, ज्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे.

‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मालिकेत मोठा ट्विस्ट? ही लोकप्रिय अभिनेत्री घेणार एक्झिट; हे आहे कारण

नागपूरमधील जामठा परिसरात आयोजित कार्यक्रमात बोलताना धीरेंद्र शास्त्री यांनी एका मोहिमेनंतर शिवाजी महाराज समर्थ रामदास स्वामींकडे जाऊन राज्यकारभार सांभाळण्याची विनंती केल्याचे विधान केले. या वक्तव्यामुळे विविध क्षेत्रातून अनेक प्रतिक्रिया उमटू लागल्या. मोठ्या प्रमाणात विरोध होऊ लागला. मुळात, अभिनेता रितेश देशमुख सध्या ‘राजा शिवाजी’ सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्थ आहे, तसेच दरम्यान त्याने भिवंडी येथे स्थित असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज मंदिर शक्तीपीठ येथे जाऊन महाराजांचे दर्शन घेतले. यादरम्यान, त्याला धीरेंद्र शास्त्रींच्या त्या विधानाबाबत विचारले गेले असता त्याने “महाराजांच्या बाबतीत केले गेलेले आक्षेपार्य विधाने खपवून घेतले जाणार नाहीत” असे विधान केले. तसेच त्याला या प्रकाराबद्दल काही माहिती नसल्याचेही सांगितले.

या वादात आता अभिनेता रितेश देशमुख यांनीही उडी घेतली आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत अप्रत्यक्षपणे धीरेंद्र शास्त्री यांना फटकारले. “ कोणीतरी येतो आणि आपल्या आराध्य दैवताबद्दल काहीतरी विकृत बरळतो, एक शिवप्रेमी-शिवभक्त म्हणून हे अमान्य आणि संतापजनक आहे. असले चौकटीत अडकवण्याचे फोल प्रयत्न काळाच्या उदरात गडप होतील. पण सह्याद्रीच्या पर्वतरांगा जशा लाखो वर्ष आधी होत्या तसंच ‘ते’ एकच नाव करोडो वर्ष भविष्यातही राहील. आणि ते नाव म्हणजे. प्रौढप्रतापपुरंदर… क्षत्रियकुलावतंस. सिंहासनाधिश्वर महाराजाधिराज… श्रीमंत राजाशिवछत्रपती महाराज.,” असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

रितेश देशमुखच्या या प्रतिक्रियेनंतर सोशल मीडियावर चर्चेला आणखी उधाण आले असून, अनेक शिवप्रेमींनी त्यांना पाठिंबा दर्शवला आहे. दरम्यान, धीरेंद्र शास्त्री यांच्या वक्तव्यावर राजकीय आणि सामाजिक पातळीवरही प्रतिक्रिया उमटत आहेत. या प्रकरणामुळे इतिहास, श्रद्धा आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य यावर नव्याने चर्चा सुरू झाली आहे.

Michael Movie : ‘King of Pop ची जादू!’ सिनेमाचा जगभरात क्रेझ; लिमिटेड स्क्रीन्स पण धमक्यावर धमाका

दरम्यान, रितेश देशमुख सध्या त्याच्या आगामी राजा शिवाजी या चित्रपटामुळे चर्चेत आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर आणि गाणे प्रदर्शित झाले असून प्रेक्षकांकडून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटात संजय दत्त, अभिषेक बच्चन, विद्या बालन, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, बोमन इराणी, भाग्यश्री, फरदीन खान, जितेंद्र जोशी, अमोल गुप्ते आणि जिनिलिया देशमुख यांसारखे कलाकार झळकणार आहेत.

विशेष म्हणजे, या चित्रपटात रितेश देशमुख स्वतः छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारत असून दिग्दर्शनाची धुरा देखील त्यांनी सांभाळली आहे. येत्या १ मे रोजी हा बहुचर्चित चित्रपट प्रदर्शित होणार असून, प्रेक्षकांमध्ये त्याबाबत मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे.

Web Title: Riteish deshmukh slams dhirendra shastri on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 26, 2026 | 06:11 PM

Topics:  

  • Riteish Deshmukh

संबंधित बातम्या

Dhamaal 4 : आणखीन एका मराठमोळा पठ्ठ्याचे हिंदीत पदार्पण! रंगभूमी गाजवणारे ‘गुजले’, आहेत तरी कोण?
1

Dhamaal 4 : आणखीन एका मराठमोळा पठ्ठ्याचे हिंदीत पदार्पण! रंगभूमी गाजवणारे ‘गुजले’, आहेत तरी कोण?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.