
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
‘बिग बॉस मराठी सिझन ६’ च्या घरात दररोज नवनवीन वाद आणि रणनीती पाहायला मिळत असली, तरी काही वेळा सदस्यांमधील जिव्हाळ्याचे नातेही प्रेक्षकांचे मन जिंकून घेते. नुकत्याच समोर आलेल्या एका व्हिडिओमध्ये, घरातील दोन महत्त्वाचे सदस्य रोशन आणि प्रभू आपल्या गावच्या आठवणीत रमलेले पाहायला मिळाले.
गावचं वातावरण आणि मोकळी हवा
रोशन आणि प्रभू यांच्यातील संवाद खूपच भावनिक होता. रोशनने घराबाहेरील वातावरणाबद्दल बोलताना सांगितले की, “इथं वातावरणात खूप फरक आहे, आपण गावची माणसं आहोत. आपल्याला मोकळ्या वातावरणात राहण्याची सवय आहे.” यावर प्रभूनेही दुजोरा दिला. घराच्या बंदिस्त भिंतींमध्ये त्यांना आपल्या गावची आणि तिथल्या मोकळेपणाची ओढ लागल्याचे दिसून आले. रोशनचे म्हणणे आहे माणुसकी महत्वाची आहे.
“माणुसकी टिकवून ठेवा” : मोलाचा सल्ला
प्रभूने रोशनला सल्ला दिला की, “कॅप्टन व्हायचं असेल तर कुटुंबाला सोबत घेऊन चालता आलं पाहिजे. आई आपल्या लेकराला कसं सांभाळते, त्याच्या पोटापाण्याचं कसं बघते, तसंच आपल्याला घरातील सदस्यांचं बघायला हवं.” रोशननेही यावर आपले मत व्यक्त करताना म्हटले की, कष्टाने मिळवलेल्या गोष्टीची मजा काही वेगळीच असते, शॉर्टकट कधीच कामाला येत नाही.
ChatGPT वरून लिहिला गेला Stranger Things चा शेवटचा सीझन? वेब सीरिजमध्ये चाहत्यांना ‘हे’ काय दिसले?
शहरातील माणसं आणि विश्वास
गप्पांच्या ओघात रोशनने प्रभूला सावधही केले.तो म्हणाला, “इथे लवकर विश्वास ठेवू नकोस. कोण कधी लाथ मारेल सांगता येत नाही. शहरातील माणसांचे कामचं हे आहे दुसऱ्याच्या पोटावर लाथ देऊन पुढे जाणं हेच इथलं काम आहे.” त्यांच्या या चर्चेत रुचिता देखील सहभागी झाली होती. तिनेही रोशनच्या मताशी सहमती दर्शवली की, मानगुटीवर पाय देऊन पुढे जाणे. पुढे यांच्यात कसा संवाद रंगला, पुढे काय झालं जाणून घेण्यासाठी पहा आजचा भाग.