Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 31 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

….म्हणून म्हणतात दीपिकाला होलीक्वीन ‘बलम पिचकारी’ ते ‘बेशरम रंग’ बॉलिवूडची टॉप गाणी ज्यांच्याशिवाय होळी अपूर्णच

दीपिकाच्या होळी सॉन्ग्सचा जलवा कायम: ‘लहू मुंह लग गया’ पासून ‘बेशरम रंग’पर्यंत पाहा संपूर्ण यादी!

  • By अमृता यादव
Updated On: Mar 01, 2026 | 05:46 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदुकोण ही फक्त सुपरहिट चित्रपटांमुळेच नाही, तर तिच्या गाण्यांमुळेही चाहत्यांच्या हृदयात घर करून बसली आहे. तिची बहुआयामी शैली आणि आकर्षक व्यक्तिमत्त्व प्रत्येक भूमिकेत झळकते.

तिच्या अनेक हिट गाण्यांपैकी होळीची गाणी विशेष लोकप्रिय आहेत. वर्षानुवर्षे ही गाणी चाहत्यांच्या प्लेलिस्टवर अधिराज्य गाजवत आहेत आणि होळीच्या सणात वेगळीच रंगत आणतात. ‘बलम पिचकारी’, ‘बेशरम रंग’ आणि ‘लहू मुंह लग गया’ यासारखी गाणी होळीचा मूड सेट करणारी आयकॉनिक ट्रॅक्स ठरली आहेत.

बलम पिचकारी – ये जवानी है दिवानी

या चित्रपटातील ‘बलम पिचकारी’ हे होळीचं अल्टिमेट अँथम मानलं जातं. गाण्याच्या जोशपूर्ण बीट्स, लक्षात राहणारे बोल आणि आयकॉनिक डान्स स्टेप्स यामुळे ते प्रचंड लोकप्रिय झाले. दीपिकाचा एनर्जेटिक परफॉर्मन्स गाण्याला अधिकच आकर्षक बनवतो. त्यामुळे दरवर्षी होळीला हे गाणं रिक्रिएट करणं चाहत्यांसाठी जणू परंपराच बनली आहे.

मोहे रंग दो लाल – बाजीराव मस्तानी

‘मोहे रंग दो लाल’ हे एक अत्यंत सुंदर आणि पारंपरिक होळी गाणं आहे. मधुर धून, भव्य सेट्स आणि दीपिकाचा देखणा, सोज्वळ नृत्याविष्कार यामुळे हे गाणं खास ठरतं. तिचे भावपूर्ण एक्सप्रेशन्स आणि शास्त्रीय नृत्यशैली गाण्याला वेगळ्याच उंचीवर घेऊन जातात. परंपरा आणि सिनेमॅटिक सौंदर्य यांचा अप्रतिम संगम या गाण्यात दिसतो.

लहू मुंह लग गया – गोलियो की रासलीला राम लीला

या चित्रपटातील ‘लहू मुंह लग गया’ हे रोमँस आणि सणाची मस्ती यांचा सुंदर मिलाफ आहे. गाण्यातील रंगांची उधळण आणि दीपिकाची प्रभावी स्क्रीन प्रेझेन्स प्रेक्षकांना भुरळ घालते. तिचं दमदार नृत्य आणि नजाकतीने सादर केलेले भाव यामुळे हे गाणं होळीच्या हिट यादीत कायम आहे.

रिलीज होण्याआधीच सुपरहिट ठरला ‘Haiwan’; Akshay Kumar आणि Saif Ali Khanचा चित्रपट या दिवशी होणार रिलीज

बेशरम रंग – पठाण

‘बेशरम रंग’ हे पारंपरिक होळी गाणं नसले तरी त्यातील रंगांची उधळण, ग्लॅमरस व्हाइब आणि दीपिकाचा बोल्ड अंदाज यामुळे ते होळी पार्टीसाठी खास पसंतीचं गाणं बनलं आहे. तिची स्टाइल, आत्मविश्वास आणि स्क्रीनवरील उपस्थिती गाण्याला वेगळीच ओळख देतात.
होळीच्या रंगांप्रमाणेच दीपिका पदुकोणची ही गाणीही उत्साह, सौंदर्य आणि जल्लोषाने भरलेली आहेत. म्हणूनच ती आजही होळी सॉन्ग्सची खऱ्या अर्थाने “क्वीन” मानली जाते.

रश्मिका आणि विजय देशभरात साजरा करणार लग्नसोहळ्याचा जल्लोष; मंदिरांमध्येही दानधर्म करण्याची घोषणा

Web Title: Why is deepika padukone the queen of holi songs check out the complete list from lahu munh lag gaya to besharam rang

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 01, 2026 | 05:46 PM

Topics:  

  • bollywood movies
  • Deepika Padukone
  • Entertainemnt News

संबंधित बातम्या

Mrunmayee Deshpande: स्पर्धकांच्या आत्मविश्वासासाठी मृण्मयी काय करते? ‘सारेगमप’च्या सूत्रसंचालनामागचा सांगितला खास दृष्टिकोन
1

Mrunmayee Deshpande: स्पर्धकांच्या आत्मविश्वासासाठी मृण्मयी काय करते? ‘सारेगमप’च्या सूत्रसंचालनामागचा सांगितला खास दृष्टिकोन

बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री ४०व्या वर्षी होणार आई! लग्नाच्या २ वर्षांनी घरात हलणार पाळणा; पोस्ट करत दिली गुडन्यूज
2

बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री ४०व्या वर्षी होणार आई! लग्नाच्या २ वर्षांनी घरात हलणार पाळणा; पोस्ट करत दिली गुडन्यूज

Drishyam 3: अजय देवगणने घेतलं तब्बल येवढं कोटी मानधन? ‘दृश्यम ३’मधील कलाकारांची फी ऐकून बसेल धक्का!
3

Drishyam 3: अजय देवगणने घेतलं तब्बल येवढं कोटी मानधन? ‘दृश्यम ३’मधील कलाकारांची फी ऐकून बसेल धक्का!

kiara advani: ‘टॉक्सिक’नंतर कियारा अडवाणीला मिळणार आणखी मोठी संधी? करीना कपूरच्या १० वर्षे जुन्या सिनेमाच्या सीक्वलमध्ये झळकणार?
4

kiara advani: ‘टॉक्सिक’नंतर कियारा अडवाणीला मिळणार आणखी मोठी संधी? करीना कपूरच्या १० वर्षे जुन्या सिनेमाच्या सीक्वलमध्ये झळकणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.