बॉलीवूड किंवा साउथ सिनेमा असो या नावाजलेल्या सेलिब्रिटींचा स्वत:चा देखील काही ना काही छोटे मोठे व्यवसाय असतात. याला मराठी सिनेसृष्टी देखील अपवाद नाही. प्राजक्ता माळी, अभिज्ञा भावे, तेजस्विनी पंडित या आणि अशा अनेक मराठी अभिनेत्रींचे छोटे मोठे व्यवसाय आहेत. यात आता आणखी एका प्रसिद्ध अभिनेत्रीची भर पडली आहे. ही दुसरी तिसरी कोणी नसून या अभिनेत्रीचं नाव आहे ऋतुजा बागवे.
मराठी मालिका आणि सिनेविश्वातील गुणी अभिनेत्री अशी स्वत:ची छाप ऋतूजाने पाडली आहे. अभिनयाव्यतिरिक्त ऋतूजाने आता हॉटेल व्यवसायात पदार्पण केलं आहे. मुंबईतल्या हाय क्लास परिसरात ऋतूजाने हॉटेल सुरु केलं आहे. तिच्या या नव्या व्यवसायाबाबत तिने इन्स्टाग्रामवरुन माहिती दिली आहे. नुकंतच तिने तिच्या नव्या हॉटेलचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केला आहे.
‘असं’ आहे ऋतुजाच्या रेस्टॉरंटचं युनिक नाव
अंधेरीतील मरोळ परिसरात ऋतूजाने रेस्टॉरंट सुरु केलं आहे. या ठिकाणी खवय्यांना शाकाहारी आणि मांसाहार अशा दोन्हीची मेजवानी अनुभवायला मिळणार आहे. आयुष्यात पुढे जात असताना पुढचं पाऊल काय हे फार महत्वाचं असतं. या अर्थ सांगतं तिने आपल्या रेस्टॉरंटचं नाव ‘फूडचं पाऊल’ असं ठेवलं आहे. तिच्या नव्या रेस्टॉरंच्या शुभारंभाला सिनेसृष्टीतील दिग्गज कलाकारांनी देखील उपस्थिती लावली. ‘फूडचं पाऊल’ या ऋतुजाच्या रेस्टॉरंटचं उद्घाटनाला अभिनेता सुबोध भावे आणि त्याची पत्नी देखील हजर होते.
चाहत्यांनी केला कौतुकाचा वर्षाव
सोशल मीडियावर ऋतुजाने पोस्ट केलेल्या या व्हिडीओवर चाहत्यांनी कमेंटचा पाऊस पाडला आहे. तिच्या या नव्या व्यवयासाठी अनेकांनी अभिनंदन करत तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
ऋतुजातच्या कारकिर्दीबाबत सांगायचं झालंच तर दोन वर्षांपूर्वीच तिने ठाण्यातील येऊर परिसरात स्वत:चं घर घेतलं. या तिच्या घराला वर्षपूर्ती झालेली तेव्हा तिने घराबरोरचे खास क्षण रिल्सच्या माध्यमातून पोस्ट केले होते. ऋतुजा कॉलेजवयीन असल्यापासून नाटकाकडून अभिनयक्षेत्रात कार्यरत होती. अनंन्या या तिच्या नाटकाने तिला खरी ओळख मिळाली. मराठी मालिका, सिनेमा, वेबसिरीजप्रमाणे तिने हिंदीतील छोट्या पडद्यावर आपली छाप सोडली आहे.माटी से बंधी डोर .या हिंदी मालिकेतील तिची भूमिका लक्षवेधी ठरली. त्याचशिवाय सध्या ZEE-5 वर आलेली नवीकोरी थरारपट असेलेली अंधारमाया या .सिरिजमधील तिच्या भूमिकेने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.