Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 4 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Ashadhi Ekadashi |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Salman Khan in Raja Shivaji : “शिवाजी नाही शिवाजी राजं… म्हणायचं” अखेर सिनेमातील सलमानची झलक आली समोर

महाराष्ट्र दिनी Raja Shivaji हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांकडून जोरदार प्रतिसाद मिळत आहे. अभिनेता Salman Khan यांची झलक अखेर चित्रपटात दिसली असून ते वीर जिवाजी महाले यांच्या भूमिकेत आहेत.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: May 01, 2026 | 01:13 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • महाराष्ट्र दिनी सिनेमा ‘राजा शिवाजी’ सर्वत्र प्रदर्शित करण्यात आले आहे
  • हातात तलवार अशा रांगडा मराठमोळा लुक भाईजानने केला आहे
  • ऐतिहासिक चित्रपट राजा शिवाजी १ मे रोजी प्रदर्शित झाला
अभिनेता सलमान खान हे नाव गेल्या अनेक दिवसांपासून अभिनेता आणि दिग्दर्शक रितेश देशमुख यांच्या ‘राजा शिवाजी’ या सिनेमाशी जोडले जात होते. सिनेमाचा टिझर लाँच झाला, त्यामध्येही सलमान दिसून आला नव्हता. काही दिवसांनी ट्रेलर प्रसिद्ध करण्यात आले पण त्यातही सलमान नव्हता. सिनेमाचे दोन गाणी प्रसिद्ध झाले पण त्यातही सिनेमाच्या प्रोडक्शन टीमने सलमानची कोणतीही झलक दाखवली नव्हती. पण सगळीकडे ‘राजा शिवाजी’ आणि ‘सलमान’ अशी चर्चा होती. अखेर, महाराष्ट्र दिनी सिनेमा ‘राजा शिवाजी’ सर्वत्र प्रदर्शित करण्यात आले आहे आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे Actor Salman Khan ची झलक सगळ्यांसमोर आली आहे.

Salman Khan : सलमान खानची यशोगाथा काही अचानक नाही; वडील सलीम खान यांनी आधीच वर्तवली होती भविष्यवाणी

एकंदरीत, जर सलमान खानच्या मराठमोळ्या चाहत्यांना ‘राजा शिवाजी’ चित्रपटातील सलमानची भूमिका अनुभवायची आहे तर त्यांना घरी बसून टीझर, ट्रेलर किंवा गाणे रेंगाळण्यापेक्षा सरळ सिनेमा गृहाची वाट पकडावी लागेल. सलमान खान या चित्रपटात वीर जिवाजी महाले (जीवा महाला) यांच्या भूमिकेत दिसून आला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अंगरक्षक म्हणून जीवा महाला यांची ख्याती आहे, अशा वीर व्यक्तीच्या भूमिकेत बॉलिवूडचा Bhaijaan दिसून येणार असल्यामुळे त्याच्या चाहत्यांनी Box Office वर आधीच गर्दी केली आहे.

कसा आहे भाईजानचा लुक?

डोक्यावर भगवा फेटा, पिळदार मिश्या, हातात तलवार अशा रांगडा मराठमोळा लुक भाईजानने केला आहे. जीवा महाला यांच्या भूमिकेत त्याने वीर मराठा योद्ध्याचे पात्र साकारले आहे. सलमानने सिनेमात बोललेला “शिवाजी नाही शिवाजी राजं… म्हणायचं” हा डायलॉग सिनेमागृहात तुफान गाजतंय.

गोंधळ’नंतर संतोष डावखर यांची नवी ऐतिहासिक कलाकृती! महाराष्ट्र दिनी ‘शहाजीराजे’ची दमदार घोषणा

‘राजा शिवाजी’ प्रदर्शित! काय म्हणतायत प्रेक्षक?

अभिनेता-दिग्दर्शक Riteish Deshmukh यांचा ऐतिहासिक चित्रपट राजा शिवाजी १ मे रोजी प्रदर्शित झाला असून सुरुवातीपासूनच प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळत आहे. विशेषतः X (ट्विटर) वर चित्रपटाबाबत जोरदार चर्चा सुरू असून प्रेक्षकांनी अभिनय, भावनिकता आणि भव्य दृश्य मांडणीचे भरभरून कौतुक केले आहे. Chhatrapati Shivaji Maharaj यांच्या जीवनावर आधारित हा मराठी चित्रपट प्रदर्शित होताच सोशल मीडियावर ट्रेंडिंगमध्ये आला. पहिल्याच दिवशी प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया मोठ्या प्रमाणात समोर येऊ लागल्या आणि अल्पावधीतच हा चित्रपट चर्चेचा विषय ठरला.

दरम्यान, बॉक्स ऑफिसवरही राजा शिवाजीने चांगली सुरुवात केली आहे. सूत्रांनुसार, चित्रपटाने पहिल्याच दिवशी सुमारे १.९० कोटी रुपयांची कमाई केली आहे. मराठी चित्रपटासाठी हा आकडा समाधानकारक मानला जात असून पुढील काही दिवसांत कमाईत वाढ होण्याची शक्यता आहे.

Web Title: Salman khan as a jivaji mahale in movie raja shivaji

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 01, 2026 | 01:12 PM

Topics:  

  • Riteish Deshmukh
  • Salman Khan

संबंधित बातम्या

Salman Khan Viral Statement : रितेश देशमुखची नोकरी धोक्यात? सलमान खानच्या एका वक्तव्याने रंगली चर्चा; नेमकं प्रकरण काय
1

Salman Khan Viral Statement : रितेश देशमुखची नोकरी धोक्यात? सलमान खानच्या एका वक्तव्याने रंगली चर्चा; नेमकं प्रकरण काय

Salman Khan Post: ‘I love you baba!’; संजय दत्तला मिठी मारत सलमान खान झाला भावूक, नेमकं काय घडलं?
2

Salman Khan Post: ‘I love you baba!’; संजय दत्तला मिठी मारत सलमान खान झाला भावूक, नेमकं काय घडलं?

Salman Khan: सलमानने ३.५ कोटींना विकला वांद्रेतील फ्लॅट, आता समुद्रकिनारी उभारणार ६ मजली आलिशान ड्रीम होम
3

Salman Khan: सलमानने ३.५ कोटींना विकला वांद्रेतील फ्लॅट, आता समुद्रकिनारी उभारणार ६ मजली आलिशान ड्रीम होम

Assam Floods: ‘दरवर्षी हे घडतं, तरीही आपण…’; सलमाननंतर आलिया भट्टही आसाम पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावली; केली खास विनंती
4

Assam Floods: ‘दरवर्षी हे घडतं, तरीही आपण…’; सलमाननंतर आलिया भट्टही आसाम पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावली; केली खास विनंती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.