
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
फॅशन, अभिनय आणि तिच्या वेगळ्या कॉन्सेप्ट फोटोशूटमुळे नेहमीच चर्चेत राहणारी मराठी अभिनेत्री संस्कृती बालगुडे पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. दमदार भूमिका आणि उत्तम नृत्यकलेमुळे प्रेक्षकांच्या मनात घर करणारी संस्कृती, सध्या तिच्या ‘श्रीकृष्ण’ अवतारामुळे चर्चेत आहे.
संस्कृती अभिनयाच्या सोबतीने उत्तम भरतनाट्यम नृत्यांगना आहे हे सगळ्यांना माहीत असून सोशल मीडिया वर कायम सक्रिय राहून ती अनेक व्हिडिओ फोटो शेयर करताना दिसते नुकताच तिने सोशल मीडिया वर एक खास व्हिडिओ शेयर केला असून ज्यात ती ” श्री कृष्णाच्या ” रुपात दिसतेय.
संस्कृती ही केवळ उत्तम अभिनेत्रीच नाही, तर एक प्रशिक्षित भरतनाट्यम नृत्यांगनादेखील आहे. सोशल मीडियावर नेहमी सक्रिय राहणारी ही अभिनेत्री नुकतीच एका खास व्हिडिओमुळे चर्चेत आली आहे. त्या व्हिडिओमध्ये ती भगवान श्रीकृष्णाच्या रूपात झळकताना दिसते. पारंपरिक पोशाख, आकर्षक दागदागिने आणि तिच्या भावनांनी सजलेला हा कृष्ण अवतार पाहून प्रेक्षक आणि इंडस्ट्रीतील सहकलाकार मंत्रमुग्ध झाले आहेत.
भगवान श्री कृष्णाच्या रुपात असलेली संस्कृती आणि तिच्या या नव्या लूकच्या चर्चा सोशल मीडिया वर होताना दिसतात. हा खास लूक तिने कुठल्या गाण्यासाठी केला का ? किंवा चित्रपटासाठी केला असावा हे अद्याप गुलदस्त्यात आहे.
तिचं हे रूप बघून इंडस्ट्री मधल्या अनेक कलाकार मंडळीने तिचं कौतुक केलं आहे अनेकांनी काय नवीन प्रोजेक्ट असं देखील विचारल आहे. संस्कृतीचा हा नवा लूक खूप कमाल असून ती नक्की काय नवीन करणार याची उत्सुकता सगळ्यांना आहे.
वैविध्यपूर्ण भूमिका आणि अप्रतिम अभिव्यक्तीमुळे ओळखली जाणारी संस्कृती बालगुडे, या वेळेस ‘कृष्णरूपात’ प्रेक्षकांची मनं जिंकताना दिसतेय. तिच्या या रहस्यमय लूकचं गूढ लवकरच उलगडणार का? हे पाहणं प्रेक्षकांसाठी नक्कीच उत्सुकतेचं ठरणार आहे.