Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

तीन भावांचा निरागस जल्लोष… ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’चं धमाकेदार प्रमोशनल साँग प्रदर्शित!

'साडे माडे तीन' चित्रपटाला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळाल्यानंतर आता 'पुन्हा एकदा साडे माडे तीन’ प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. तसेच या चित्रपटाचे प्रमोशनल साँग प्रदर्शित झालं आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Jan 28, 2026 | 08:29 AM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ प्रेक्षकांच्या भेटीस
  • चित्रपटाचे धमाकेदार प्रमोशनल साँग प्रदर्शित
  • ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ कधी होणार प्रदर्शित
 

कुरळे बंधू केमिस्ट्री म्हणजे नुसती गोष्ट नाही, तर धमाल, टोमणे, खट्याळपणा आणि मनमोकळा आनंद यांचा अखंड उत्सव! हाच उत्सव आता ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ या बहुप्रतीक्षित मराठी चित्रपटाच्या नव्या प्रमोशनल साँगमधून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. टीझर आणि ट्रेलरला मिळालेल्या भरघोस प्रतिसादानंतर हे दमदार, निरागस शब्दांचं आणि जबरदस्त एनर्जीने ओतप्रोत भरलेलं हे प्रमोशनल साँग सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

अवधूत गुप्ते यांच्या खणखणीत आणि उत्स्फूर्त आवाजामुळे गाण्यात वेगळीच चैतन्याची लहर निर्माण झाली आहे. गौरव चाटी आणि आदित्य बेडेकर यांच्या संगीताने गाण्याला धमाल टच दिला असून विक्रांत हिरनाईक यांच्या साध्या, निरागस आणि मनाला भिडणाऱ्या शब्दांतून तीन भावांमधील घट्ट नातं, इनोसंट बॉण्डिंग आणि मस्तीदार केमिस्ट्री सुंदरपणे उलगडते. हे गाणं ऐकताना पाय थिरकतातच, आणि चेहऱ्यावर हसूही नकळत उमटतं, म्हणूनच हा ट्रॅक खऱ्या अर्थाने ‘फील गुड’ ठरतोय.

Arijit Singh Playback: आपल्या गाण्यांनी वेड लावणाऱ्या अरिजितचा प्लेबॅक प्रवास संपला! ‘या’ गाण्याने सुरु केले होते Play Back करिअर

या प्रमोशनल साँग निर्मिती प्रक्रिया देखील तितकीच इंटरेस्टिंग आहे. चित्रपटाच्या कथेत गाण्यासाठी स्वतंत्र सीन नसल्यामुळे प्रमोशनल साँग करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, पहिलं गाणं अजय–अतुल यांचं असल्याने ते प्रेक्षकांच्या मनात खोलवर रुळलं होतं. त्यामुळे त्या गाण्याच्या भावविश्वाशी सुसंगत असं, तरीही वेगळ्या ढंगाचं आणि तितकंच आपलेपण जपणारं गाणं देण्याचा विचार करण्यात आला.

 

याबाबत दिग्दर्शक आणि अभिनेता अंकुश चौधरी म्हणाले, “चित्रपटात गाणं बसवता येईल, असा सीन नव्हता, म्हणून प्रमोशनल गाण्याचा विचार केला. पहिलं गाणं प्रेक्षकांच्या मनात आपली खास जागा निर्माण करून गेलं होतं. त्यामुळे त्याच भावनेला पुढे नेणारं, तरीही वेगळ्या मांडणीचं काहीतरी करायचं होतं. अजय–अतुल यांच्याशी चर्चा झाली, मात्र त्यांच्या इतर कमिटमेंटमुळे ते शक्य झालं नाही. एका सेशनदरम्यान चित्रपटातील एक बॅकग्राऊंड ट्यून आठवली आणि त्याच बेसवर जबरदस्त गाणं तयार करण्याची कल्पना सुचली. यावेळी रोमँटिक झोनऐवजी निरागस, इनोसंट आणि पूर्णपणे तीन भावांभोवती फिरणारं गाणं करायचं ठरवलं.”

Arijit Singh Retirement: आता हृदयाचे घाव भरणार कोण? अरिजीत सिंगचा पार्श्वगायनाला रामराम; धक्कादायक कारण आलं समोर

टीझर, ट्रेलरनंतर आता प्रमोशनल साँगने ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ची उत्सुकता शिखरावर नेली आहे. तीन भावांचा हा धमाकेदार, निरागस आणि मनमोकळा जल्लोष मोठ्या पडद्यावर अनुभवण्यासाठी प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत. ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ येत्या ३० जानेवारीला सर्वत्र प्रदर्शित होत आहे.

या चित्रपटात भरत जाधव, मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव आणि रिंकू राजगुरू यांच्या प्रमुख भूमिका असून संजय नार्वेकर यात पाहुणे कलाकार म्हणून झळकणार आहेत. सुशीलकुमार अग्रवाल आणि अल्ट्रा मीडिया ॲण्ड एंटरटेनमेंट प्रस्तुत, उषा काकडे प्रॉडक्शन्स, ईओडी. मीडिया उदाहरणार्थ निर्मित आणि अमेय विनोद खोपकर पिक्चर्स यांच्या सहकार्याने साकारलेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन अंकुश चौधरी यांनी केलं आहे. उषा काकडे, पुष्कर यावलकर, सुधीर कोलते, स्वाती खोपकर आणि निनाद नंदकुमार बत्तीन हे निर्माते असून मोहसिन खान, यशराज टिळेकर, सौरभ ललवाणी आणि धनविक एंटरटेनमेंट सहनिर्माते आहेत. यापूर्वीही एव्हीके पिक्चर्सने अनेक मनोरंजनात्मक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आणले आहेत. यापुढेही ते असेच जबरदस्त चित्रपट घेऊन येतील.

Web Title: The promotional song for the marathi film punha ekda sade made teen has been released

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 28, 2026 | 08:29 AM

Topics:  

  • entertainment
  • marathi movie
  • Marathi News

संबंधित बातम्या

World News : ८० मीटर उंचीवर थरार! कोणत्याही सेफ्टी हार्नेसशिवाय ४०० मीटर लांब दोरीवरून चालली महिला
1

World News : ८० मीटर उंचीवर थरार! कोणत्याही सेफ्टी हार्नेसशिवाय ४०० मीटर लांब दोरीवरून चालली महिला

Instamart : डिलिव्हरी पार्टनर्ससाठी मोठी सुविधा! Yulu-Yuma Energy सोबत बॅटरी स्वॅपिंगचा करार
2

Instamart : डिलिव्हरी पार्टनर्ससाठी मोठी सुविधा! Yulu-Yuma Energy सोबत बॅटरी स्वॅपिंगचा करार

Trump vs Media : गदारोळ सुरु ; ट्रम्प यांच्यावर प्रसार माध्यमांनी घातली बंदी
3

Trump vs Media : गदारोळ सुरु ; ट्रम्प यांच्यावर प्रसार माध्यमांनी घातली बंदी

Nagpur News :आता चेहरा ओळखताच उघडणार विमानतळाचे गेट
4

Nagpur News :आता चेहरा ओळखताच उघडणार विमानतळाचे गेट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.