
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
सध्या सिनेमाविश्वात प्रत्येक कलाकार त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलताना दिसत आहे. अनेक कलाकार लग्नबंधनात अडकले आहेत. अशातच अभिनेता संतोष जुवेकर देखील त्याच्या लग्नाविषयी बोलताना दिसला आहे. संतोषने स्वतः त्याच्या लग्नाविषयी चाहत्यांना आता मोठी हिंट दिली आहे. वयाच्या चाळीशीत संतोष लग्न करतोय हे ऐकून चाहत्यांना देखील आनंद व्यक्त केला आहे. तसेच आता अभिनेता नक्की काय म्हणाला आहे हे आपण जाणून घेणार आहोत.
Tere Ishk Mein: कृती सेनन-धनुषच्या केमिस्ट्रीसाठी चाहते उत्सुक, ॲडव्हान्स बुकिंगमध्ये केली एवढी कमाई
संतोष जुवेकर शेवटचा ‘छावा’ या हिंदी चित्रपटामध्ये दिसला होता. अभिनेता विकी कौशलबरोबर स्क्रीन शेअर करून आणखी प्रसिद्धी मिळवली आहे. त्यानंतर त्याचा नवा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. ‘स्मॉर्ट सूनबाई’ असे या चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटामध्ये संतोष जुवेकर महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. खास या चित्रपटाच्या प्रमोशननिमित्तानं संतोषने त्याच्या लग्नाविषयी चर्चा केली आहे. जे जाणून चाहते आनंदित झाले आहेत.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना संतोषला त्याच्या लग्नाविषयी प्रश्न विचारण्यात आले आहेत. तुझा प्रेमावर, लग्नावर विश्वास आहे का असं विचारल्यानंतर संतोष म्हणाला, “माझा प्रेमावर खूप विश्वास आहे. मी अजून लग्न केलं नाही त्यामुळे मला ते माहिती नाही.” तुझ्या घरी सूनबाई कधी येणार आहे? असं विचारल्यानंतर संतोष म्हणाला, “माहिती नाही, मे बी कमिंग सून. मस्त मिळाली नाहीये.” संतोष म्हणाला, मी प्रेमात पडलोय. शाळेपासून सुरुवात झाली आहे, प्रत्येकाची असतेच. नाही नाही कधीच प्रेमात पडलो नाही असं सांगण्यासारखं काही वाईट नाहीये. प्रेमात पडलो आहे अनेक वेळेला.”
सोनम बाजवा अडचणीत! मशिदीत शूटिंग करणं पडलं महागात, FIR दाखल करण्याची मागणी
संतोषने लग्नाविषयी स्वतःचे मत व्यक्त करत पुढे म्हणाला, “लग्न करताना बऱ्याचदा ती मला समजून घेणारी हवी, ती म्हणते मला समजून घेणारा हवा. एकमेकांना ॲडजस्ट करायला हवं. मला वाटतं की जिकडे प्रेम आहे तिथे ॲडजस्टमेंट नसते. जिथे ॲडजस्टमेंट आहे तिथे प्रेम नसतं. कारण एकदा प्रेम जडलं की ‘टेढा हैं पर मेरा’ असं म्हटलं जातं.” “एखाद्यावर प्रेम बसलं की तो त्याच्या चांगल्या वाईट सगळ्या गुणदोषांसकट आपण त्याला ॲक्सेप्ट केलेलं असतं. जेव्हा, चल ठीक आहे, तो असा आहे मी करते ॲडजस्ट असं म्हटलं जातं… ॲडजस्ट केलं जातं तिथे प्रेम नसतं असं मला वाटतं”, असेही संतोष म्हणाला आहे.