
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
अजित पवार यांचे पुतणे आणि शरद पवार यांचे नातू युगेंद्र पवार यांनी नुकतेच त्यांची दीर्घकालीन मैत्रीण तनिष्का कुलकर्णीशी लग्न केले आहे. ज्याचे फोटो त्यांनी स्वतः सोशल मीडियावर शेअर करून लोकांना चकीत केले आहे. दोघेही लग्नाच्या फोटोमध्ये खूप सुंदर आणि आनंदी दिसत आहेत. तनिष्का कुलकर्णीने तिच्या लग्न समारंभात लाल रंगाचा नक्षीदार लेहंगा परिधान केला आहे. तर, युगेंद्रने ऑफ वाईट रंगाचा कुर्ता पायजमा घातला आहे. दोघांचंही लग्न सभारंभातले फोटो आता चर्चेत आहेत. आता चाहत्यांसह अनेक सेलिब्रेटी आणि राजकारणी नेते त्यांचे अभिनंदन करत आहेत.
याआधीही त्यांनी साखरपुड्याची फोटो शेअर करून चाहत्यांना चकित केले. लोकांनी त्यांचे फोटो पाहून अभिनंदनाचा वर्षाव केला. सुप्रिया सुळे यांनी सर्वांना साखरपुड्याची माहिती दिली होती. एक छोटासा समारंभ आयोजित करण्यात आला होता आणि त्याचे काही फोटो समोर आले आहेत. फोटोंमध्ये तनिष्का तिच्या साखरपुड्याची अंगठी दाखवताना दिसत आहे. त्यानंतर इन्स्टाग्रामवर, त्यांनी फोटो शेअर करून लिहिले की, “सर्वात आनंदाची बातमी शेअर करताना खूप आनंद होत आहे – माझा पुतण्या युगेनने सुंदर तनिष्काशी साखरपुडा केले आहे.’
युगेंद्र आणि तनिष्कालाच्या नात्याबद्दल बोलायचं झालं तर, तनिष्का ही युगेंद्रची दीर्घकालीन मैत्रीण आहे. नात्याच्या सुरवातीला युगेंद्रने तनिष्काला प्रपोज केले होते. आणि ती हा म्हणाल्या नंतर यांच्या नात्याला खरी सुरुवात झाली. आता हे नातं पती – पत्नीच्या रूपात झाले असून, त्यांनी त्याच्या आयुष्यात नवी सुरुवात केली आहे.
तनिष्का प्रभू कोण आहे?
तानिष्का कुलकर्णी ही मुंबईतील प्रभादेवी परिसरात राहते. तिचे वडील एक मोठे उद्योगपती आहेत. तीने लंडनमधील कॅस बिझनेस स्कूलमधून फायनान्समध्ये स्वतःचे शिक्षण पूर्ण केले आहे. तसेच तानिष्का आणि युगेंद्र हे आता एकमेकांचे जोडीदार झाले असून, त्यांच्या आयुष्यात नवीन अध्याय सुरु झाला आहे. तसेच युगेंद्र पवार हा शरद पवार यांचा नातू आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे बंधू श्रीनिवास पवार यांचा मुलगा आहेत. मुंबई, पुण्यात स्वतःचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर, युगेंद्रने बोस्टनमधील नॉर्थईस्टर्न विद्यापीठातून वित्त आणि विमा विषयात शिक्षण घेतले आहे. तसेच तो अनेक वेळा राजकारण, व्यवसाय आणि सामाजिक कार्यात सक्रिय आहे.