
फोटो सौजन्य - Social Media
अभिनेत्री Sharmila Shinde आणि अभिनेत्री Harshada Khanvilkar 15 वर्षांनी पुन्हा एकत्र झळकणार आहेत. दोघांना पुन्हा एकत्र काम करताना पाहण्यासाठी दोघांची चाहतेमंडळी खासकरून पुढचं पाऊल या मालिकेची चाहते मंडळी आतुर आहे. दोघांना एकत्र काम करताना पाहून ‘पुढचं पाऊल’ मालिकेच्या आठवणी ताज्या होतील. मुळात, ‘आमच्या पिढीची गोष्टच वेगळी’ हे नाटक असून यामध्ये हर्षदा खानविलकर, शर्मिला शिंदे, सुनील बर्वे आणि अक्षर कोठारी झळकणार आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे या नाटकात शर्मिला पुन्हा हर्षदाच्या सूनेचेच पात्र साकारणार आहे म्हणून पुढचं पाऊलची चाहतेमंडळी नाटक पाहण्यासाठी आतुर आहेत.
शर्मिलाने भावुक होऊन एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये शर्मिला शिंदे आणि हर्षदा खानविलकर Rehearsal करत आहेत. तसेच कॅप्शनमध्ये तिने लिहले आहे की, “हा फोटो आपल्या नवीन नाटकाच्या तालमीच्या अगदी सुरुवातीच्या दिवसातला आहे. माँ, तू खूप वर्षांनी रंगभूमीवर परत पाऊल टाकत आहेस. आपण २०११ साली स्टार प्रवाह वरील ‘पुढचं पाऊल’ ह्या मालिकेमध्ये सासू सून म्हणून एकत्र पाऊल टाकलं होत. आता पुन्हा एकदा सासू सून म्हणुन आपल्या आगामी ‘आमच्या पिढीची गोष्टच वेगळी’ ह्या नाटकात एकत्र येतोय. तू बऱ्याच वर्षांनी रंगभूमीवर परत येतियेस म्हणूनच हे नाटक तुझ्यासाठी किती खास आहे ह्याची मला कल्पना आहे. गेले महिनाभर आपण आपल्या ह्या नाटकाची तालीम करतोय आणि येत्या ९ मे रोजी आपण आपलं नाटक प्रेक्षकांना सुपूर्त करणार. माँ, @harshadakhanvilkar” तुला ह्या नाटकासाठी खूप खूप शुभेच्छा. हे नाटक तुला खूप खूप आनंद देवो ह्याच सदिच्छा. तुझा आशीर्वाद माझ्या पाठीशी घेऊन आपल्या नव्या पर्वाची सुरुवात करायला मी सुद्धा उत्सुक आहे. I lubbu!! सर्वांना आग्रहाचं आमंत्रण. आमच्या मम्माच्या नाटकाला यायचं हां”
या पोस्टखाली कमेंट्समध्ये दोघांच्या चाहत्यांनी दोघांना त्यांच्या आगामी प्रोजेक्टसाठी आभाळभर शुभेच्छा दिल्या आहेत.