Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Smita Patil Death Anniversy : बोलके डोळे आणि सावळा रंग, स्मिता पाटील यांची आजही इतकी लोकप्रियता का ?

जैत रे जैत मधील चिंगी असो किंवा उंबरठा मधील सुलभा हे दोन्ही चित्रपट आणि स्मिता पाटील हे एक समीकरणचं तयाऱ झालेलं आहे. स्मिता पाटील यांचा अभिनय तर उत्तम होताच पण त्यातबरोबर त्या वृत्तनिवेदिका देखील होत्या.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Dec 13, 2025 | 02:41 PM
Smita Patil Death Anniversy : बोलके डोळे आणि सावळा रंग, स्मिता पाटील यांची आजही इतकी लोकप्रियता का ?
Follow Us
Close
Follow Us:
  • बोलके डोळे आणि सावळा रंग,
  • चिरतरुण स्मिता पाटील,
  • प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी गुणी अभिनेत्री
अभिनय क्षेत्र म्हटलं की दिसायला छान गोरी पान, उंच आणि सडपातळ बांधा असा एकंदरीतच अलिखित नियम सर्वासाधारण पाहायला मिळतो ते अगदी आजही. मात्र ज्या काळात महिलांनी घराबाहेर पाऊल ठेवणं देखील चुकीचं मानलं जातं होतं त्याचकाळात एका गुणी आणि संवेदनशील अभिनेत्रीने या क्षेत्रातील हे अलिखित नियम खोडून काढले. आजही तिच्या अभिनयाचं कौतुक तर होतंच पण तिच्या त्या सावळ्या रंगातील सौंदर्य देखील तितकंच भारावतं ती हरहुन्नरी अभिनेत्री म्हणजे स्मिता पाटील. जैत रे जैत मधील चिंगी असो किंवा उंबरठा मधील सुलभा हे दोन्ही चित्रपट आणि स्मिता पाटील हे एक समीकरणचं तयाऱ झालेलं आहे. स्मिता पाटील यांचा अभिनय तर उत्तम होताच पण त्यातबरोबर त्या वृत्तनिवेदिका देखील होत्या.

कोकणच्या सौंदर्यातून उलगडणारा भावनिक आणि सिनेमॅटिक अनुभव!‘कैरी’च्या दिमाखदार प्रीमियरला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद

असं म्हणतात की बाळाचे पाय पाळण्यात दिसत अगदी तसंच स्मिता पाटील यांच्या देखील लागू झालं. लहानपणासूनच त्यांना नृत्य, नाटक, लेखन याची आवड होती. शिक्षण पूर्ण करत त्या त्यांची आवज देखील जोपासायच्या. पुढे दुरदर्शनवर वृत्तनिवेदिका म्हणून त्यांनी करियरा सुरुवात केली. कॅमेऱ्यासमोर आत्मविश्वासाने बातम्या देणं आणि निर्भिड व्यक्तिमत्व त्यांच्या बातम्या देण्य़ाची शैली हीच त्यांच्या आयुष्याला कलाटणी देण्याचं कारण ठरली. जेष्ठ दिग्दर्शक श्याम बेनेकरांनी स्मिता पाटील .यांच्या कॅमेरासमोरचा वावार पाहिला आणि त्यांनी स्मिता यांचा सिनेमात काम करण्याची ऑफर दिली. तो स्मिता यांचा पहिला वहिला सिनेमा म्हणजे ‘चरणदास चोर’.या सिनेमाच्या माध्यमातून स्मिता पाटील यांनी अभिनयाच्या कारकीर्दीला सुरुवात केली.

तो एका काळ असा होता जेव्हा अभिनेत्री ही दिसायला सुंदर आणि गोऱ्या वर्णाची असणं अपेक्षित असायचं. मात्र स्मिता पाटील यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर सगळ्यांची मनं जिंकून घेतली. या एकमेव अभिनेत्री अशा होत्या ज्या मेकअपपासून लांब असायच्या. त्या जशा आहेत तशाच त्या कॅमेऱ्यासमोर यायच्या. रंग सावळा असला म्हणून काय झालं आपल्या टॅलेंट हवं आणि त्याच्याच जोरावर आपण पुढे जातो हा आत्मविश्वास येणाऱ्या अनेक पिढ्यांना देणारी अशी ही अभिनेत्री होती.

भूमिका, मथंन, अर्ध्य सत्य अशा अनेक बॉलिवूड सिनेमात स्मिता पाटील झळकल्या. इतकं सगळं असलं तरी, मराठी प्रेक्षकांच्या मनात स्मिता पाटील यांच्याबद्दल अगदी आजच्या प्रेक्षकवर्गात देखील प्रेम जिव्हाळा आणि आदर पाहायला मिळतो. याचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे, जैत रे जैत मधील चिंगी आणि उंबरठा मधली सुलभा. या दोन्ही व्यक्तिरेखा आजही तितक्याच प्रभावशाली वाटतात. एखादं गाणं म्हटलं की आपल्य़ाला त्याचा गीतकार, गायक आणि संगीतकार आठवतो. मात्र सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या हे गाणं असो किंवा मग मी रात टाकली गाण्यातील चिंगीचा बंडखोरपणा असो यातल सर्वार्थाने पहिले आठवतात त्या म्हणजे अभिनेत्री स्मिता पाटील. आज त्यांना जाऊन 39 वर्ष झाली. मात्र आजही स्मिता पाटील हे नावं प्रत्येकाच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे.

Ashish Chanchlani च्या ‘Ekaki ‘ या वेब सिरीजने SS Rajamouli झाले प्रभावित, सांगितली ‘ही’ मोठी गोष्ट

💡

Frequently Asked Questions

  • Que: स्मिता पाटील यांना अभिनय क्षेत्रात वेगळं काय ठरवतं?

    Ans: स्मिता पाटील यांनी सौंदर्याच्या रूढ कल्पनांना छेद देत अभिनयाच्या ताकदीवर स्वतःची ओळख निर्माण केली. सावळा रंग, साधेपणा आणि नैसर्गिक अभिनय यामुळे त्या इतर अभिनेत्रींपेक्षा वेगळ्या ठरल्या.

  • Que: स्मिता पाटील यांनी आपल्या करिअरची सुरुवात कशी केली?

    Ans: स्मिता पाटील यांनी करिअरची सुरुवात दूरदर्शनवर वृत्तनिवेदिका म्हणून केली. त्यांच्या आत्मविश्वासपूर्ण आणि निर्भीड सादरीकरणामुळे दिग्दर्शक श्याम बेनेगल यांचे लक्ष वेधले गेले आणि त्यातूनच त्यांना पहिला चित्रपट मिळाला.

  • Que: : मराठी प्रेक्षकांच्या मनात स्मिता पाटील यांचे विशेष स्थान का आहे?

    Ans: ‘जैत रे जैत’ मधील चिंगी आणि ‘उंबरठा’ मधील सुलभा या भूमिका आजही मराठी प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. या व्यक्तिरेखांमधील स्त्रीस्वातंत्र्य, संवेदनशीलता आणि बंडखोरी आजही तितकीच प्रभावी वाटते.

Web Title: Smita patil death anniversary speaking eyes and dark complexion why is smita patil still so popular today

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 13, 2025 | 01:53 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • marathi actress

संबंधित बातम्या

गोंधळलेलं, अपूर्ण पण सुंदर प्रेम,  ‘दो दीवाने सहर में’ चित्रपटातील पहिलं गाण रिलीज, ‘आसमा’मधून मिळणार प्रेमाचा नवा अनुभव
1

गोंधळलेलं, अपूर्ण पण सुंदर प्रेम, ‘दो दीवाने सहर में’ चित्रपटातील पहिलं गाण रिलीज, ‘आसमा’मधून मिळणार प्रेमाचा नवा अनुभव

अनुपम खेर यांच्या मुलाने वडिलांच्याच मारली कानशिलात, म्हणाला ‘काय करणार आहेस?’ अभिनेता थक्क; पाहा VIDEO
2

अनुपम खेर यांच्या मुलाने वडिलांच्याच मारली कानशिलात, म्हणाला ‘काय करणार आहेस?’ अभिनेता थक्क; पाहा VIDEO

लग्नघटिका समीप आली! ‘मुरांबा’ फेम अभिनेता लवकरच अडकणार विवाहबंधनात, थाटात पार पडला मेहंदी सोहळा, फोटो पाहा
3

लग्नघटिका समीप आली! ‘मुरांबा’ फेम अभिनेता लवकरच अडकणार विवाहबंधनात, थाटात पार पडला मेहंदी सोहळा, फोटो पाहा

सद्यस्थितीवर भाष्य, नात्यातली गुंतागुंत, थोडं हास्य, पनवेलमध्ये रंगणार “एक नातं असंही” नाटकाचा रौप्य महोत्सवी प्रयोग
4

सद्यस्थितीवर भाष्य, नात्यातली गुंतागुंत, थोडं हास्य, पनवेलमध्ये रंगणार “एक नातं असंही” नाटकाचा रौप्य महोत्सवी प्रयोग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.