Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बिनधास्त श्वास घे साला, जगाची काळजी कशाला ! ‘परिणती – बदल स्वतःसाठी’ चित्रपटातील ‘राणी’ हे पाहिलं गाणं प्रदर्शित

पहिल्यांदाच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि अमृता सुभाष याची केमिस्ट्री असणारा 'परिणती - बदल स्वतःसाठी’ चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. नुकतेच या चित्रपटातील 'राणी' हे गाणं प्रदर्शित झालं आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Jul 26, 2025 | 06:36 PM
'परिणती - बदल स्वतःसाठी’ चित्रपटातील 'राणी' हे पाहिलं गाणं प्रदर्शित

'परिणती - बदल स्वतःसाठी’ चित्रपटातील 'राणी' हे पाहिलं गाणं प्रदर्शित

Follow Us
Close
Follow Us:

दोन सशक्त आणि आत्मनिर्भर स्त्रियांच्या आयुष्याचा आणि त्यांच्या मैत्रीचा भावनिक प्रवास मांडणाऱ्या ‘परिणती – बदल स्वतःसाठी’ या चित्रपटातील पहिले गाणं ‘राणी’ नुकतंच रसिकांच्या भेटीला आलं असून, ते प्रेक्षकांच्या मनाला भिडताना दिसतंय. हे गाणं केवळ मैत्रीचं नसून स्त्रियांच्या स्वशोधाचा सुरेल आविष्कार आहे. सोनाली कुलकर्णी आणि अमृता सुभाष यांच्या जबरदस्त अभिनयामुळे आणि सशक्त स्क्रीन प्रेझेन्समुळे या गाण्याला एक वेगळीच ऊर्जा लाभली आहे.

संगीतकार समीर साप्तीस्कर यांनी दिलेल्या जबरदस्त चालीवर समीर सामंत यांचे अर्थपूर्ण आणि प्रेरणादायी बोल सजले आहेत. वैशाली माडे आणि प्राजक्ता शुक्रे यांच्या दमदार गायकीने हे गाणं अजूनच उठावदार झालं आहे. ‘राणी’ हे गाणं एक पेपी ट्रॅक असलं तरी त्यामागे स्वतःसाठी जगण्याची आणि स्वत्व टिकवण्याची प्रेरणा देणारा एक सखोल भावनिक थर आहे.

‘हेरा फेरी ३’ सिनेमा कधी येणार? अक्षय कुमारने दिली महत्वाची अपडेट!

या गाण्याबद्दल लेखक व दिग्दर्शक अक्षय बाळसराफ म्हणतात, ” ‘राणी’ हे गाणं म्हणजे दोन स्त्रियांच्या नात्याचं आणि त्यांच्या आत्मशक्तीच्या जागृतीचं प्रतीक आहे. एका सुंदर प्रवासाची सुरुवात आहे, ज्यात स्त्रिया स्वतःसाठी उभ्या राहतात, स्वतःचं अस्तित्व शोधतात आणि त्याचा अभिमान बाळगतात. सोनाली आणि अमृतासारख्या ताकदवान अभिनेत्रींच्या माध्यमातून ही भावना जिवंत झाली आहे. आम्ही हे गाणं केवळ ऐकावं असं नाही, तर अनुभवावं अशी रचना केली आहे. कारण ही प्रत्येक स्त्रीच्या अंतःकरणातून उमटणारी ओळख आहे.”

न्यायाची लढाई आता वेळ निकालाची; ‘ठरलं तर मग’ मालिकेतील विलास खून प्रकरण उलगणार फक्त 4 दिवसांत

पीएच फिल्म्स, फिनिक्स फिल्म्स आणि इनसिंक मोशन पिक्चर्स यांच्या संयुक्त विद्यमाने निर्मित या चित्रपटाचे निर्माते पराग मेहता आणि हर्ष नरूला असून, अमित डोगरा, मोना नरूला, आशिष त्रिवेदी, शारदा नरूला, मनोज जैन, मोहित लालवानी, कांचन शाह आणि शांता जैन हे सहनिर्माते म्हणून सहभागी आहेत. अक्षय बाळसराफ यांनी लेखन व दिग्दर्शन केलेल्या या चित्रपटात अमृता सुभाष, सोनाली कुलकर्णी आणि अक्षर कोठारी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. येत्या १ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणारा ‘परिणती – बदल स्वतःसाठी’ हा चित्रपट एक भावनिक आणि प्रेरणादायी प्रवास उलगडणार आहे.

Web Title: Sonalee kulkarni amruta subash new marathi movie parinati first song released

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 26, 2025 | 06:26 PM

Topics:  

  • marathi movie
  • sonalee kulkarni

संबंधित बातम्या

‘Jabrat’मध्ये पाहायला मिळणार महाराष्ट्राची खास लावणी, हिंदवी पाटील –  सुरेखा कुडची गाजवणार लावणीचा फड
1

‘Jabrat’मध्ये पाहायला मिळणार महाराष्ट्राची खास लावणी, हिंदवी पाटील – सुरेखा कुडची गाजवणार लावणीचा फड

मुखवट्याच्या मागची रहस्यं, 4 खून, शून्य पुरावे…”; ‘केस नं. ७३’ चित्रपटाचे मोशन पोस्टर चर्चेत
2

मुखवट्याच्या मागची रहस्यं, 4 खून, शून्य पुरावे…”; ‘केस नं. ७३’ चित्रपटाचे मोशन पोस्टर चर्चेत

‘तुझ्यासारखी नको… तूच पाहिजे’,  ‘रुबाब’ची स्टायलिश प्रेमकहाणी प्रेक्षकांसमोर; चित्रपटाचा टीझर प्रदर्शित
3

‘तुझ्यासारखी नको… तूच पाहिजे’, ‘रुबाब’ची स्टायलिश प्रेमकहाणी प्रेक्षकांसमोर; चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

मराठी शाळा आणि मातृभाषा जपण्यासाठीच्या लढ्याची हाक! ‘क्रांतीज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ ‘हाकामारी’ गाणं प्रदर्शित
4

मराठी शाळा आणि मातृभाषा जपण्यासाठीच्या लढ्याची हाक! ‘क्रांतीज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ ‘हाकामारी’ गाणं प्रदर्शित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.