
27 ऑक्टोबर रोजी प्रसारित झालेली ही मालिका सुरुवातीला 10 .30 च्या स्लॉटला सुरु होती मात्र त्यानंतर तिची वेळी 11 वाजता करण्यात आली. एवढं सगळं करुनही जेव्हा मालिका TRP मध्ये येत नव्हती त्यावेळी स्टारप्रवाह वाहिनीने मालिका संपवण्याचा निर्णय घेतला आहे. मालिकेच्या अंतिम भागाचा प्रोमो सोशल मीडीयावर शेअर करण्य़ात आला. अखेर कनकदत्ता आणि पर्णिकेचा अंत होणार असं कॅप्शन देण्यात आलं आहे. यावर नेटकऱ्यांचा संमिश्र प्रतिक्रिया पहायला मिळत आहे. हा मालिकेचा अंतिम भाग असल्याचं कळताच नेटकरी कमेंट करत म्हणाले की, आताच कुठे आम्ही ही मालिका पाहायला लागलो होतो आणि लगेच बंद पण झाली. काहींनी यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले की, .यातील कलाकार बिग बॉसमध्ये दिसणार आहेत म्हणून मालिका बंद केली का? अशा प्रतिक्रिया मिळत आहेत.
रहस्यमय आणि भयपट असलेल्या या मालिकेत अक्षय केळकर, वैष्णवी कल्याणकर आणि रुची जाईल हे मुख्य भूमिकेत होते. मालिकेतील चेटकीण पर्णिका हिची व्यक्तिरेखा अभिनेत्री रुची जाईल हीने साकारली. तिच्या या भुमिकेला प्रेक्षकांनी चांगलीच पंसती देखील दिली होती.
19 तारखेपासून स्टार प्रवाहवर नवी मालिका सुरु होणार आहे. तुझ्या सोबतीने नव्या मालिकेत एतशा झंझगिरी आणि अभिनेता अजिंक्य ननावरे यांची जोडी प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. ही मालिका रात्री 9 वाजताच्या स्लॉट सुरु होणार आहे. त्यामुळे नशिबवान या मालिकेची नवी वेळ बदलण्यात येणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. मात्र नशिबवान मालिकेच्या नव्य़ा वेळेची सविस्तर माहिती स्टार प्रवाह वाहिनीने अजूनतरी शेअर केलेली नाही.