
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
पोलिसांची वर्दी सांभाळणं हे अर्थात अभिमानास्पद काम आहे. आणि हा अभिमान अभिनेता सुबोध भावेलाही जपावा असं नेहमी वाटायचं. बऱ्याच मुलाखतींमध्ये पोलीस व्हायचं स्वप्न होतं असे अभिनेता अनेक वेळा म्हणाला आहे. आणि आता अभिनेत्याने स्वतःच हे स्वप्न ते अभिनय क्षेत्रात अभिनयाच्या वाटेवर पूर्ण केल्याचे दिसत आहे. अभिनेत्याने आगामी ‘कैरी’ या मराठी चित्रपटात पोलिसांची भूमिका साकारलेली दिसत आहे. पोलिसांच्या भूमिकेत काम करायचं स्वप्न ते या चित्रपटाद्वारे पूर्ण करत आहेत. फॉरेन पोलिसांच्या भूमिकेत हा अभिनेता दिसणार आहे, याची झलक ट्रेलरमध्ये पाहायला मिळाली आहे. ट्रेलरमधील अभिनेत्याची ही करारी भूमिका पाहून चाहत्यांची चित्रपट पाहण्याची उत्सुकता आणखी वाढली आहे.
राज्य शासनाने केला तेजश्री प्रधानचा सन्मान; सांस्कृतिक युवा पुरस्कार मिळवल्यानंतर अभिनेत्री भावुक
‘कैरी’ सिनेमातील भूमिकेबाबत बोलताना सुबोध भावे म्हणाला, “यंदा हिवाळ्यातच आपणा सर्वांना कैरी चाखायला मिळणार आहे. आणि ही कैरी आंबट-गोड वा नेमकी कशी असणार हे मात्र १२ नोव्हेंबरला कळेल. कारण माझा ‘कैरी’ हा आगामी सिनेमा भेटीस येतोय. मी या चित्रपटामध्ये फॉरेन पोलिसांच्या भूमिकेत असणार आहे.” असे अभिनेता म्हणाला आहे.
हा मराठी मल्टीस्टारर सिनेमा येत्या १२ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. पोस्टरच्या उत्सुकतेनंतर यांत आता भर घालत ‘कैरी’ चित्रपटाचा ट्रेलर देखील समोर आला आहे. आणि अनेक टर्न ट्विस्ट असलेला हा ट्रेलर चित्रपटाची उत्सुकता वाढवत आहे. नॅशनल अवॉर्ड विनिंग दिग्दर्शक शंतनू गणेश रोडे यांचा रोमँटिक थ्रिलर चित्रपटातून प्रेक्षकांना नवा अनुभव देणार आहे. चित्रपटात कोकणातील नयनरम्य, हिरव्यागार वातावरण हे सगळं दाखवण्यात आले आहे.
शिवाय ‘कैरी’ हा सिनेमा इन असोसिएशन विथ ‘अमेय विनोद खोपकर एंटरटेंमेंट’चा आहे. तर ‘कैरी’ चित्रपटाची निर्मिती नवीन चंद्रा, नंदिता राव कर्नाड, स्वाती खोपकर, निनाद नंदकुमार बत्तीन यांनी केली आहे. तसेच तबरेझ पटेल हे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. ‘कैरी’चे लेखन स्वरा मोकाशी यांनी केले आहे. या चित्रपटाला निषाद गोलांबरे आणि पंकज पडघन यांनी संगीत दिलं आहे. तर पार्श्वसंगीताची जबाबदारी साई पियूष यांनी सांभाळली. तर चित्रपटाचे छायांकन प्रदीप खानविलकर यांचे आहे. आणि चित्रपटाच्या संकलनाची जबाबदारी मनीष शिर्के यांनी सांभाळली आहे. येत्या १२ डिसेंबरला हा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.