Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“तो साधा दिवस नव्हता, तर…”, श्रीलंकेत पूर आणि विमानतळावर तब्बल २४ तास अडकून राहिला ‘हा’ मराठी अभिनेता

श्रीलंकेत आलेल्या पुरामुळे अनेक लोकांची तारांबळ उडाली आणि खूप लोक विमानतळावर अडकून पडले. याचाच वाईट अनुभव मराठी अभिनेता सुयश टिळकने आता सोशल मीडियावर शेअर केला आहे, चला जाणून घेऊ.

  • By सायली ससाणे
Updated On: Nov 30, 2025 | 02:38 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • सुयश टिळकने श्रीलंकेत आलेल्या पुराचे सांगितला अनुभव
  • सुयश टिळक विमानतळावर अडकला
  • तब्बल २४ तास विमानतळावर अडकला अभिनेता
 

मराठी अभिनेता सुयश टिळकने त्याच्या सोशल मीडियावरुन चाहत्यांना थक्क करणारा विमानतळावरील अनुभव शेअर केला आहे. श्रीलंकेत आलेल्या पुरामुळे सुयश टिळक तब्बल २४ तास एअरपोर्टवर अडकून पडला होता. सुयशने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन फोटो आणि व्हिडीओ शेअर करत तिथली परिस्थिती दाखवत हा अनुभव शेअर केला आहे. तसेच त्याच्यासोबत अनेक लोक देखील तिथे २४ तास अडकून पडले होते. “तो एक साधा दिवस नसून, भयानक अनुभव होता” असे सुयशचे म्हणणे आहे.

‘कांतारा’मधील ‘या’ सीनची नक्कल करून चांगलाच अडकला रणवीर, धार्मिक भावना दुखावल्याबद्दल झाला ट्रोल

मराठी अभिनेता सुयश टिळकने त्याच्या सोशल मीडियावर काय अनुभव शेअर केला आहे हे आपण आता जाणून घेणार आहोत. श्रीलंकेत आलेल्या पुरामुळे सुयश टिळक तब्बल २४ तास एअरपोर्टवर अडकून पडला होता. सुयशने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन फोटो आणि या संपूर्ण प्रसंगाचे व्हिडीओ शेअर करत तिथली परिस्थिती दाखवून हा अनुभव शेअर केला आहे. सुयशने शेअर केलेल्या या पोस्टमध्ये श्रीलंकेच्या विमानतळावर प्रचंड गर्दी आणि गोंधळ दिसून येत आहे. फ्लाइट रद्द झाल्याने प्रवासी त्रस्त असल्याचंही पाहायला मिळत आहे. तसेच अनेक प्रवासी वैतागलेले आणि त्रासलेले दिसत आहेत.

 

अभिनेता सुयशने हा अनुभव शेअर करताना लिहिले, “तो एक साधा दिवस नव्हता आणि हे काही साधे फोटो, व्हिडिओ नाहीत. श्रीलंका जोरदार पाऊस, चक्रीवादळ आणि पुराच्या तडाख्यात सापडली होती आणि आम्हाला भारतात परत उड्डाण करायचं होतं. इमिग्रेशन पूर्ण झाल्यानंतरच आम्हाला उड्डाण विलंब झाल्याची आणि शेवटी रद्द झाल्याची बातमी मिळाली. माझ्यासोबत २१ जणांचा ग्रुप होता. ज्यांची जबाबदारी माझ्यावर आणि माझ्या मित्रांवर/भागीदारांवर होती. एअरलाइन्समध्ये पुरेसा स्टाफ नव्हता. कारण त्यांचा स्वतःचा देश नैसर्गिक आपत्तीने थरथरून गेला होता. स्थानिक लोक कामावर येऊ शकत नव्हते. हवामान उड्डाणासाठी अजिबात अनुकूल नव्हतं.”

Suraj Chavan Wedding: जान्हवीने लाडक्या भावाला दिले ‘हे’खास गिफ्ट, नजर काढत म्हणाली, ”स्पेशल भेटवस्तू…”

तसेच तो पुढे म्हणाला, “काहींना सतत इतरांची मदत लागत होती. काही फक्त मन मोकळं करत होते. काही स्वतःची ताकद दाखवत होते, तर काही खरेखुरे मानवतेने भरलेले, एकमेकांना मदत करणारे. काही जमिनीवरच झोपून परिस्थिती स्वीकारत होते, तर काही त्यांच्या ‘कंफर्ट झोन’पासून बाहेर पडून एका खुर्चीतही बसायला त्रस्त होते. काही स्वतःच्या आजाराशी लढत होते, काहींना अॅलर्जी होत होती; काही पैस खर्च करणारे होते, तर काही अतिशय जपून खर्च करणारे; काही विनाकारण अन्न वाया घालवत होते, तर काही त्यांना मिळालेलं प्रत्येक साधन जपून वापरत होते.!”

या पोस्टमध्ये शेवटच्या व्हिडीओत सुयश आणि इतर प्रवासी विमानातून सुखरुप भारतात परतल्याचं दिसते आहे. सुयशच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत. तसेच श्रीलंकेत आलेल्या पुराबद्दल सांगायचे झाले तर, पूर आणि भूस्खलनामुळे २५ जिल्ह्यांमध्ये तब्बल ८३३,९८५ लोक प्रभावित झाले असून, अंदाजे १५९ लोकांचा मृत्यू झाला आहे, सुमारे २०३ लोक अजून बेपत्ता आहेत.

 

Web Title: Suyash tilak stucks at shrilanka airport more than 24hrs because flight cancel due to flood

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 30, 2025 | 02:38 PM

Topics:  

  • entertainment
  • marathi actor
  • marathi entertainment

संबंधित बातम्या

येड लागलं प्रेमाचं! विशाल निकमने दिली प्रेमाची कबुली, कोण आहे अभिनेत्याची ‘सौंदर्या’?
1

येड लागलं प्रेमाचं! विशाल निकमने दिली प्रेमाची कबुली, कोण आहे अभिनेत्याची ‘सौंदर्या’?

प्रथमेश लघाटे-मुग्धा वैशंपायनने खरेदी केली त्यांची ड्रीम कार! जाणून घ्या किंमत, फीचर्स आणि बरंच काही
2

प्रथमेश लघाटे-मुग्धा वैशंपायनने खरेदी केली त्यांची ड्रीम कार! जाणून घ्या किंमत, फीचर्स आणि बरंच काही

सुनील ग्रोव्हर की आमिर? बसला धक्का…तोतया आमिर ओळखणे झाले कठीण; पाहा Funny Video
3

सुनील ग्रोव्हर की आमिर? बसला धक्का…तोतया आमिर ओळखणे झाले कठीण; पाहा Funny Video

‘आपण कोणत्या जगात राहतोय?,’ अंकिता आणि जयनंतर, आता नदीमच्या पाठिंब्यासाठी पुढे आली अर्पिता खान; म्हणाली…
4

‘आपण कोणत्या जगात राहतोय?,’ अंकिता आणि जयनंतर, आता नदीमच्या पाठिंब्यासाठी पुढे आली अर्पिता खान; म्हणाली…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.