
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
झी मराठी वाहिनीवर शुभ श्रावणी ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज झाली आहे. येत्या 19 जानेवारीपासून ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेची अनोखी पत्रकार परिषद शिक्षणमंत्री मा. विश्वंभर राजेशिर्के यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकतीच पार पडली. यावेळी राजेशिर्के यांनी आपल्या कुटुंबाची ओळख करून दिली, ज्यात त्यांची लाडकी बहीण अलकनंदा आणि तिची मुलगी मोक्षा यांचा सहभाग होता. या सोहळ्याने मालिकेबद्दलची उत्सुकता अधिकच वाढवली आहे.
या प्रसंगी शिक्षणमंत्र्यांच्या मुलीच्या निकालाबाबत पसरलेल्या अफवांवर त्यांचे साहाय्यक आणि उजवा हात मानल्या जाणाऱ्या शुभम यांनी स्पष्टीकरण दिले. शुभम यांनी मीडियाशी बोलताना सांगितले की, “श्रावणी नापास झालेली नाही, तर ती ३५ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाली आहे. सध्या तिचे पेपर फेरतपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. “या खुलाशामुळे शिक्षणमंत्र्यांची मुलगी नापास ह्या गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
यावेळी स्वतः शिक्षणमंत्री विश्वंभर राजेशिर्के यांनी पत्रकार परिषद घेऊन विरोधकांवर कडक शब्दांत प्रहार केला. ते म्हणाले की, “या अफवा केवळ विरोधकांनी पसरवल्या आहेत. शिक्षणमंत्री म्हणून मी विद्यार्थ्यांच्या हितासाठी जे चांगले काम करत आहे, त्यावरून जनतेचे लक्ष भरकटवण्यासाठी हा डाव आखला आहे.” यासोबतच त्यांनी पत्रकारांनी विचारलेल्या अनेक रोखठोक प्रश्नांना अत्यंत संयमाने आणि सडेतोडपणे उत्तर दिली.
कार्यक्रमाच्या शेवटी राजेशिर्के यांनी एक मोठी घोषणा केली. येत्या २६ जानेवारीला ते एक नवीन योजना जाहीर करणार आहेत, त्याची सुरुवात येत्या १९ जानेवारीपासून होणार आहे. ही योजना यापूर्वी कधीही झालेली नाही. ही योजना केवळ जाहीरच होणार नाही, तर तिची प्रत्यक्ष अंमलबजावणीही होताना दिसेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
‘द्वेषात आंधळे झाले आहेत…’, Chhava चित्रपटाच्या वक्तव्यावर कंगना रणौतने ए.आर. रहमानला सुनावले खडेबोल