Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 18 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Exclusive: ‘मायबाप प्रेक्षकांचं प्रेम वृद्धिंगत व्हावं, साथ लाभावी हीच इच्छा’, – मेघना एरंडे

अभिनेत्री मेघना एरंडे अनेक वर्षानी ‘सनई चौघडे’ मालिकेतून प्रेक्षकांंच्या भेटीला येत आहे. ४ मुलींना वाढविणाऱ्या आईच्या भूमिकेतून मेघना कमबॅक करत असून तिचा हा अनुभव कसा आहे याविषयी खास बातचीत

  • By दिपाली नाफडे
Updated On: Mar 03, 2026 | 06:37 PM
मेघना एरंडेचे मराठी मालिकेतून कमबॅक (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

मेघना एरंडेचे मराठी मालिकेतून कमबॅक (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

अभिनेत्री मेघना एरंडेचे अनेक वर्षाने मराठी मालिकेतून पुनरागमन होत आहे. झी मराठीवरील ‘सनई चौघडे’ या मालिकेचा प्रोमो नुकताच प्रदर्शित झालाय आणि तब्बल 4.2 मिलियन व्ह्यू या प्रोमोला मिळाले आहेत. प्रमिला परब ऊर्फ पमा या भूमिकेतून प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री मेघना एरंडे बऱ्याच वर्षांनी भेटीला येत आहे. आतापर्यंत गेली कित्येक वर्ष अभिनयापासून दूर असणारी मेघना डबिंगच्या माध्यमातून मात्र भेटीला येत होती. पण बालकलाकार ते आता मालिकेतून आई म्हणून समोर येण्याचा प्रवास नेमका कसा आहे आणि याबाबत मेघनाला काय वाटत आहे? याबाबत तिने अगदी दिलखुलासपणे ‘नवराष्ट्र’सह गप्पा मारल्या आहेत. 

‘सनई चौघडे’च्या पमा परबची होळी खास! मेघना एरंडे जोशींच्या गोड आठवणी; १६ मार्चपासून नव्या मालिकेची रंगतदार सुरुवात झी मराठीवर

अनेक वर्षांनी मालिकेत काम करताना कसं वाटतंय?

या प्रश्नावर मेघना अगदी उत्स्फूर्तपणे म्हणाली, ‘खूपच छान वाटतंय. २०१० मध्ये लग्न आणि २०१२ मध्ये इराचा जन्म झाल्यानंतर खऱ्या अर्थाने आईची भूमिका निभावत होते आणि आता तिची ती सर्व काही करू शकते असं वाटल्यानंतर घरच्यांची परवानगी घेऊन पुन्हा एकदा मालिकेच्या प्रवासाला सुरूवात करते आहे. खरं सांगायचं तर या नव्या प्रवासाने मोहरून गेले आहे आणि Reel आणि Real दोन्ही आयुष्य मस्त आनंदात जगते आहे’

Women’s Day च्या आसपास ही मालिका सुरू होणार आहे, एक सक्षम स्त्री आणि सक्षम आई म्हणून इतक्या वर्षानंतर मालिका निवडताना नक्की काय विचार केला होतास?

असं विचारल्यावर मेघना म्हणाली, ‘मला जेव्हा या मालिकेविषयी विचारण्यात आलं तेव्हा मी एकदम या कथेशी जोडले गेले. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी खऱ्या आयुष्यात स्वामी भक्त आहे आणि पमा अर्थात माझी भूमिका स्वामीभक्त आहे म्हटल्यावर त्वरीत मला आपलीशी वाटली. आपल्याकडे जे आहे त्यात समाधानी राहणारी आणि कायम सकारात्मक असणारी पमा फारच मला माझ्यासारखी वाटली त्यामुळे मी लगेच या भूमिकेसाठी होकार दिला’

भूमिकेविषयी सांगताना मेघनाने अगदी भरूभरून आणि मनसोक्त पमाविषयी विस्तारित वर्णन केले. ती म्हणाली, ‘प्रमिला परब अर्थात पमाला ४ मुली आहेत. ती घर सांभाळण्यासह कॅटरिंगचा व्यवसाय करते आहे. ती स्वतंत्र आहे आणि आपल्या जबाबदाऱ्या अगदी चोख पार पाडत आहे. याशिवाय नातेवाईकांना जपणं, काम करणं यात तिचा हातखंडा आहे आणि इतकं सगळं करताना तिने आपला प्रामाणिकपणा आणि स्वाभिमान अजिबात सोडलेला नाही.’

झी मराठीच्या लोकप्रिय नायिकेचा पुन्हा कमबॅक! ‘शुभ श्रावणी’ नवीन मालिकेत साकारणार मुख्य भूमिका!

बऱ्याच वर्षांनी कामाला सुरूवात केल्याने करिअर आणि घर कसं सांभाळणार?

हा प्रश्न विचारल्यावर मेघना म्हणाली की, ‘मालिकेचे प्लानिंग खरंच चांगलं आहे. आठवड्यातून एक दिवस सुट्टी असणार आहे आणि याशिवाय इतरांच्या कामाच्या वेळी मला माझं डबिंग आणि इराला आणि घराला वेळ देणंही जपता येणार आहे. त्यामुळे फारशी तारेवरची कसरत होईल असं नाही वाटत.’

दरम्यान मेघनाला आई म्हणून खऱ्या आयुष्यात जबाबदारी निभावताना कोणते प्रसंग आले आणि कसे निभावले?

असं विचारलं असता तिने हसतच म्हटले की, ‘जेव्हा इराबाबत काहीही असेल ना मी अगदी हिरकणी होते. इरा माझा स्वाभिमान आणि अभिमान दोन्ही आहे. एक गंमत सांगते इरा खूप लहान होती आणि एका कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत होते. पण अचानक तिला ताप आला आणि मी तो कार्यक्रम तसाच सोडला इतकंच नाही तिला बघायला जाण्यासाठी अगदी भिंतीवरून उडी मारून गेले होते.’ इथेच मेघना थांबली नाही तर तिने अगदी मनापासून इरावरील प्रेमही व्यक्त केले ती म्हणाली, ‘इरा लहान असताना तिला अष्टविनायकाच्या १७२ पायऱ्या चढून नेण्यात आलं होतं. पण मी मात्र खाली होते पण अचानक इरा तिथे रडायला लागली आणि मला फोन आला, मी तसंच सर्व ठेऊन १७२ पायऱ्या चढून गेले होते, अगदी माझ्या नवऱ्यालाही विश्वास बसत नाही. पण आमच्या दोघींमध्ये मुलगी कोण आणि आई कोण कळणार नाही कारण इरा खूपच Good Girl आहे’

खूप वर्षांनी येत असल्यामुळे तुझी प्रेक्षकांकडून काय अपेक्षा आहे मेघना?

यावर ती अगदी मनापासून म्हणाली की, ‘गेले ३७ वर्ष मायबाप प्रेक्षकांनी मला नेहमीच प्रेम दिलं आहे. अगदी बालकलाकार ते आतापर्यंत प्रत्येक कामात मला प्रेम मिळालं आहे आणि या मालिकेतूनही कमबॅक करतानाही तेच प्रेम वृद्धिंगत व्हावं आणि प्रेक्षकांची साथही अशीच लाभावी हीच इच्छा आहे’, मेघनाने सर्व प्रेक्षकांना अगदी मनापासून साद घेतली आहे. 

Web Title: Actress meghna erande comback with sanai chaughade marathi serial exclusive interview with navarashtra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 03, 2026 | 04:55 PM

Topics:  

  • marathi serial news
  • New Marathi Serial
  • zee marathi

संबंधित बातम्या

निलेश साबळे घेऊन येतोय नवीन शो! अभिनेत्याने दिली चाहूल, म्हणाला ‘काहीतरी मॅड येतंय लवकरच…!!!
1

निलेश साबळे घेऊन येतोय नवीन शो! अभिनेत्याने दिली चाहूल, म्हणाला ‘काहीतरी मॅड येतंय लवकरच…!!!

Marathi Serial : झी मराठीच्या ‘कृष्णाईच्या लेकी’मध्ये अनुष्का पिंपुटकरची एन्ट्री; ‘जिगिशा’बद्दल सांगितल्या ‘या’ खास गोष्टी
2

Marathi Serial : झी मराठीच्या ‘कृष्णाईच्या लेकी’मध्ये अनुष्का पिंपुटकरची एन्ट्री; ‘जिगिशा’बद्दल सांगितल्या ‘या’ खास गोष्टी

Kamali : ‘कमळी’ मालिकेत मोठा ट्विस्ट! सरोजचं पात्र संपणार? गोळी लागण्याच्या सीननंतर योगिनी चौकने सांगितली मनातील भीती
3

Kamali : ‘कमळी’ मालिकेत मोठा ट्विस्ट! सरोजचं पात्र संपणार? गोळी लागण्याच्या सीननंतर योगिनी चौकने सांगितली मनातील भीती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.