
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
टीव्ही मालिकेत समर-स्वानंदीची रोमँटिक हनीमून यात्रा एका मोठ्या ट्विस्टने भरली आहे. प्रेक्षकांच्या आवडत्या या जोडीत सावट पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मालिकेत येणारा हा ट्विस्ट पुढील भागांमध्ये प्रेक्षकांच्या उत्सुकतेत वाढ करेल.अधिराच्या हट्टामुळे समर आणि स्वानंदी हनिमून ट्रीपसाठी निघाले आहेत. रोहन आणि अधिरा वेगळ्या गाडीत आहेत ,तर समर आणि स्वानंदी वेगळ्या गाडीत असल्याचे पाहायला मिळत आहे. या प्रवासादेखील समर आणि स्वानंदीमध्ये भांडणे होत असल्याचे प्रोमोमध्ये पाहायला मिळाले आहे. ते एकमेकांना अनेक गोष्टींवरून टोमणे मारत असल्याचे दिसते. आता मालिकेत ट्विस्ट आल्याचे दिसत आहे. झी मराठीने वीण दोघांतली ही तुटेना मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. अधिरा समरला म्हणते, ”पिंट्या दादा, तुम्ही आमच्या कारमधून यायचं नाही, तुम्ही दुसऱ्या कारमधून या.” यानंतर ते दोघे ही त्यांच्या प्रवासाला सुरूवात करतात.
हनीमूनदरम्यान काही अचानक घडणाऱ्या घटनांमुळे समर-स्वानंदीला अपघाताचा सामना करावा लागू शकतो. लोकप्रिय जोडीलाच हा अनुभव सहन करावा लागेल की नाही, हा प्रश्न प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाला आहे.प्रवासात स्वानंदीला गाडीच्या मागे एक ट्रक पाठलाग करताना दिसतो. ती त्याबद्दल समरला सांगते. ती त्याला म्हणते, ”तो ट्रकवाला आपल्यामागे येतोय का?” त्यावर समर म्हणतो, ”तो आपला नातेवाईक आहे का? आपण कुठे चाललो आहे, ते पाहण्यासाठी मागे यायला?”
झी मराठीने शेअर केलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे की पुढे, एक ब्रीजवरून गाडी जात असताना पाठीमागून ट्रक येतो आणि समर -स्वानंदीच्या गाडीला धडक मारतो. त्यानंतर त्यांची गाडी ब्रीजवरून खाली पडत असल्याचे दिसत आहे. हा प्रोमो शेअर करत झी मराठी वाहिनीने, ”समर आणि स्वानंदीच्या प्रेम प्रवासात येणार मृत्यचं सावट”, असं कॅप्शन देखील दिले आहे.
Dharmendra शेवटच्या क्षणी काय करत होते? Video Viral, ‘या’ अभिनेत्याने सोशल मीडियावर शेअर केली क्लिप
मालिकेतील या भागामुळे प्रेक्षकांनी सोशल मीडियावर त्यांची प्रतिक्रिया व्यक्त करत मालिकेतील पुढील घटनांबद्दल चर्चा सुरू केली आहे. मालिकेतील ट्विस्ट आणि कथानकाचा रोमांच पाहून चाहते आगामी भाग पाहण्यासाठी आतुर झाले आहेत.
Neha Kakkar ने अश्लीलतेचा गाठला कळस, सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस; म्हणतात ‘हिला आवरा आता कोणीतरी…’