Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

एक बहुआयामी व्यक्तीमत्व; चित्रपती डॉ. व्ही. शांताराम यांच्या 125 व्या जयंती वर्षानिमित्त महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन

१२५व्या जयंतीवर्षाच्या निमित्ताने डॉ. व्ही. शांताराम यांची कारकीर्द जिथे बहरली त्या कोल्हापूर, पुणे आणि मुंबई या शहरांमध्ये वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Nov 17, 2025 | 07:20 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

अयोध्येचा राजा, माणूस, कुंकू, झनक झनक पायल बाजे, डॉ. कोटनीस की अमर कहानी, दो आँखे बारा हाथ, नवरंग, पिंजरा’ यांसारखे अजरामर चित्रपट निर्माण करणाऱ्या चित्रपती डॉ. व्ही. शांताराम ज्यांनी मराठी आणि हिंदीमधील ९२ चित्रपटांची निर्मिती, ५५ चित्रपटांचे दिग्दर्शन आणि २५ चित्रपटांमध्ये कलाकार म्हणून काम केले आहे यांचे १२५वे जयंती वर्ष येत्या १८ नोव्हेंबर २०२५ रोजी सुरु होत आहे.

१२५व्या जयंतीवर्षाच्या निमित्ताने डॉ. व्ही. शांताराम यांची कारकीर्द जिथे बहरली त्या कोल्हापूर, पुणे आणि मुंबई या शहरांमध्ये वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. जानेवारी मध्ये मुंबई व ठाणे येथे होणाऱ्या आशियाई चित्रपट महोत्सवात डॉ. व्ही. शांताराम यांच्या चित्रपटांचा विशेष विभाग असणार आहे तसेच प्रभात चित्र मंडळ आणि फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटीज ऑफ इंडिया या संस्था डॉ. व्ही. शांताराम यांच्या चित्रपटांचे विशेष शो आयोजित करणार आहेत.

The Family Man 3: मनोज बाजपेयीची बहुप्रतिक्षित सिरीज कधी आणि कुठे प्रदर्शित होईल, जाणून घ्या त्याची स्टोरी काय आहे?

तसेच या १२५व्या जयंती वर्षानिमित्त गोव्यात आयोजित केल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात डॉ. व्ही. शांताराम निर्मित ‘डॉक्टर कोटनीस की अमर कहानी (१९४६)’ हा चित्रपट दाखवण्यात येणार आहे आणि महोत्सवाच्या सांगता समारंभात डॉ. व्ही. शांतारामांचे चित्र असलेल्या पोस्ट स्टॅम्पचे अनावरण करण्यात येणार आहे.

फिरसत्या देवाचा कोप अन् रहस्यमयी, गूढ कहाणी; ‘असुरवन’ चित्रपटाचा शहारे आणणारा ट्रेलर प्रदर्शित, सोशल मीडियावर चर्चा

भारतीय सिनेमाच्या घडणीत मोलाचा वाटा उचलणारे डॉ. व्ही. शांताराम हे दिग्दर्शक, निर्माता आणि अभिनेते अशा तिन्ही भूमिकांमध्ये तितकेच समर्थ होते. त्यांनी चित्रपट हे केवळ मनोरंजनाचे माध्यम नसून समाजपरिवर्तनाचे प्रभावी साधन आहे, ही संकल्पना भारतीय प्रेक्षकांच्या मनात दृढ केली. त्यांच्या चित्रपटांमध्ये स्त्री सक्षमीकरण, सामाजिक विषमता, शिक्षण, न्यायव्यवस्था आणि मानवी मूल्ये यांसारखे विषय नेहमी अग्रस्थानी राहिले.

Web Title: Various programs organized in maharashtra to mark the 125th birth anniversary of filmmaker dr v shantaram

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 17, 2025 | 07:20 PM

Topics:  

  • Jayanti
  • marathi movie
  • Marathi News

संबंधित बातम्या

Pune Corporation Elections : ” पालिकेवर घडी फडकणार ” अमोल बालवडकरांचा दावा
1

Pune Corporation Elections : ” पालिकेवर घडी फडकणार ” अमोल बालवडकरांचा दावा

Krantijyoti Vidyalaya Marathi Madhyam: सिनेमाच्या टिमकडून पुण्यातील सिग्नल स्कूलमधील विद्यार्थ्यांसाठी विशेष चित्रपट शो
2

Krantijyoti Vidyalaya Marathi Madhyam: सिनेमाच्या टिमकडून पुण्यातील सिग्नल स्कूलमधील विद्यार्थ्यांसाठी विशेष चित्रपट शो

Ahilyanagar News: अखेर संयम सुटला! नगर–मनमाड रस्त्यासाठी सामान्य नागरिकाकडून 600 कोटी रुपयांची कर्ज मागणी
3

Ahilyanagar News: अखेर संयम सुटला! नगर–मनमाड रस्त्यासाठी सामान्य नागरिकाकडून 600 कोटी रुपयांची कर्ज मागणी

Karjat News : शेतीसाठी सोडण्यात येणाऱ्या पाण्याला दिरंगाई, गावकऱ्यांनी व्यक्त केली नाराजी
4

Karjat News : शेतीसाठी सोडण्यात येणाऱ्या पाण्याला दिरंगाई, गावकऱ्यांनी व्यक्त केली नाराजी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.