Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 14 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Baramati News : नीरा नदीत पाणी सोडण्यास छत्रपती, सोमेश्वर, माळेगावचा विरोध; पृथ्वीराज जाचकांचा आंदोलनाचा इशारा

Baramati News : नीरा नदीत पाणी सोडल्यास तीन सहकारी साखर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रातील शेती धोक्यात येण्याची भीती पृथ्वीराज जाचक यांनी व्यक्त केली आहे. नदीऐवजी कालव्यातून पाणी सोडण्याची मागणी करत त्यांनी निर्णयाविरोधात आंदोलनाचा इशारा दिला आहे.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Nov 14, 2026 | 05:56 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • नीरा नदीतील पाण्यावरून शेतकऱ्यांमध्ये मतभेद
  • नदीतील पाण्याचा अपव्यय होण्याची भीती; कालव्याचा पर्याय सुचविला
  • १६ नोव्हेंबरला पुण्यात महत्त्वाची बैठक; आंदोलनाचा इशारा
Baramati News : नीरा नदीत पाणी सोडण्याच्या मागणीवरून बारामती परिसरातील शेतकऱ्यांमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत. नीरा नदीत पाणी सोडल्यास छत्रपती, सोमेश्वर आणि माळेगाव या तीन सहकारी साखर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रातील शेती धोक्यात येण्याची शक्यता असल्याचा दावा छत्रपती कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी केला आहे.

नदीऐवजी नीरा डावा कालव्याच्या माध्यमातून पाण्याचे आवर्तन सोडावे, अशी मागणी त्यांनी केली. याबाबत १६ नोव्हेंबर रोजी पुण्यात बैठक होणार असून, निर्णय विरोधात गेल्यास आंदोलन करण्याचा इशाराही जाचक यांनी दिला आहे.

नीरा नदीतील पाण्यावरून शेतकऱ्यांमध्ये मतभेद

नीरा नदीमध्ये पाणी सोडावे, या मागणीसाठी इंदापूर आणि माळशिरस तालुक्यातील शेतकऱ्यांनी सराटी येथे रास्ता रोको आंदोलन केले होते. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याच्या विश्रामगृहात शेतकऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली.

या बैठकीला सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष राजवर्धन शिंदे, माळेगाव कारखान्याचे संचालक योगेश जगताप यांच्यासह विविध पदाधिकारी आणि शेतकरी उपस्थित होते. नीरा नदीत पाणी सोडण्यास आमचा विरोध नसून, पाणी योग्य पद्धतीने संबंधित शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले पाहिजे, अशी भूमिका बैठकीत मांडण्यात आली.

Naigaon Railway Station: लोकलमधील वाद जीवावर बेतला! छेडछाडीला विरोध करणाऱ्या तरुणीला चालत्या ट्रेनमधून ढकलले; आरोपीला अटक

नदीतील पाण्याचा अपव्यय होण्याची भीती; कालव्याचा पर्याय सुचविला

पृथ्वीराज जाचक यांनी सांगितले की, सध्याच्या परिस्थितीत नीरा नदीत पाणी सोडल्यास ते शेवटच्या भागातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याची शक्यता कमी आहे. बेसुमार वाळू उपशामुळे नदीपात्रात ठिकठिकाणी मोठे खड्डे निर्माण झाले आहेत. त्यामुळे पाण्याचा मोठ्या प्रमाणावर अपव्यय होऊ शकतो. याउलट नीरा डावा कालव्याच्या माध्यमातून पाणी सोडल्यास संबंधित भागातील शेतकऱ्यांना नियोजनबद्ध पद्धतीने पाणी देता येईल.

कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत रब्बी हंगामासाठी आवर्तने सोडण्याचा निर्णय झाला होता. तिसरे आवर्तन उन्हाळ्यात सोडण्याचेही नियोजन करण्यात आले होते. गतवर्षी धरणातील पाणीसाठा १०० टक्के होता, तर यंदा तो ८७ टक्के असल्याचेही जाचक यांनी बैठकीत मांडले.

Sambhajinagar News : अनाथ मुले अन् वृद्धांच्या चेहऱ्यावर फुलवला आनंद; ३८४ जणांसोबत साजरी केली दिवाळी

१६ नोव्हेंबरला पुण्यात महत्त्वाची बैठक; आंदोलनाचा इशारा

नीरा नदीतील पाणी सोडण्याच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी १६ नोव्हेंबर रोजी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पुण्यात बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत शेतकऱ्यांच्या मागण्या मांडण्यात येणार आहेत. सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष राजवर्धन शिंदे यांनीही बैठकीत निवेदन देणार असल्याचे स्पष्ट केले.

नदीत पाणी सोडण्याऐवजी कालव्याच्या माध्यमातून पाणी देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. शासनाने नदीत पाणी सोडण्याचा निर्णय घेतल्यास वेळप्रसंगी आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल, असा स्पष्ट इशारा पृथ्वीराज जाचक यांनी दिला आहे. त्यामुळे १६ नोव्हेंबरच्या बैठकीतील निर्णयाकडे बारामती, इंदापूर आणि माळशिरस परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Baramati news nira river water prithviraj jachak protest cp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 14, 2026 | 05:56 PM

Topics:  

  • baramati news
  • Marathi News
  • Sugar Factory

संबंधित बातम्या

Nagpur News : १०० नगरसेवकांनी केली आयुक्तांची कोंडी; सत्तापक्षनेते बाल्या बोरकर संतापले
1

Nagpur News : १०० नगरसेवकांनी केली आयुक्तांची कोंडी; सत्तापक्षनेते बाल्या बोरकर संतापले

Russia Ukraine War : रशियाच्या शांततेच्या अटी कायम; युक्रेन आक्रमक,पाश्चात्य देशांचा दृष्टिकोन मात्र बदलला
2

Russia Ukraine War : रशियाच्या शांततेच्या अटी कायम; युक्रेन आक्रमक,पाश्चात्य देशांचा दृष्टिकोन मात्र बदलला

Raigad News: दिवाळीच्या सुट्ट्यांत रायगडावर पर्यटकांची तुफान गर्दी; १३ दिवस आधीच सुरू झाली रोपवे सेवा
3

Raigad News: दिवाळीच्या सुट्ट्यांत रायगडावर पर्यटकांची तुफान गर्दी; १३ दिवस आधीच सुरू झाली रोपवे सेवा

Exclusive Interview: शिवसेना का फुटली? उद्धव ठाकरेंची साथ का सोडली? अरविंद सावंत यांनी सांगितली पडद्यामागची कहाणी!
4

Exclusive Interview: शिवसेना का फुटली? उद्धव ठाकरेंची साथ का सोडली? अरविंद सावंत यांनी सांगितली पडद्यामागची कहाणी!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.