
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
बिग बॉस मराठीच्या घरात रोज भांडण तर पाहायला मिळते पण या पलीकडे पाहायला मिळते ती काहींची घट्ट मैत्री. राधा पाटील आणि अनुक्षी माने या दोघींमध्ये अवघ्या काही दिवसांतच खुप चांगली मैत्री झाल्याचे प्रेक्षकांनी बघितले आहे. येणाऱ्या भागात या दोघी गार्डनर एरियामध्ये सकाळी गप्पा मारत बसल्या होत्या. यावेळी अनुश्रीसमोर राधाने तिच्या रिलेशनशिपविषयी सांगते.
राधा पाटील गेल्या काही वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहते आहे. अनुश्री सुद्धा राधाच्या बॉयफ्रेंडची फॅन आहे असं त्यावेळी तिने सांगितले. तिच्या बॉयफ्रेंडचे नेमकं नाव काय आहे हे प्रेक्षकांना समजलेलं नाही. नावाचा उल्लेख टेलिकास्ट करताना म्यूट करण्यात आला आहे.
राधा पाटील गप्पा मारताना म्हणाली,” आम्ही 2 बीएचके मध्ये राहतो, आमचा बेडरूम वेगळा आहे. बाकी मुलींसाठी रूम वेगळी आहे.आम्ही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहतो. त्याचा स्वभाव असा आहे ना मला जर कोण काही बोललं तर, तो कोणालाच ठेवणार नाही. त्याला कोणतेही व्यसन नाही. तीन वर्षात तो स्वत:च्या हाताने कधी जेवला नाही. माझ्याच हाताने जेवतो. त्यामुळे मला राहून राहून वाटतंय.. मी बिग बॉसच्या घरात आल्यावर त्याचं काय होत असेल? कसं होत असेल? मुलींची अशी एक इच्छा असते, देसी बॉय पाहिजे. अगदी तसाच आहे तो.”
ती पुढे म्हणते की, त्याची आठवण आली की मला खूप रडायला येतं’,आता शोमध्ये हे सगळे मला इतके बोलतात… तो इथे असता तर एवढ्यात मारून वगैरे निघून गेला असता.” यावर अनुश्रीू राधाला सांगते, ” आता मला पण एखादा बॉयफ्रेंड शोध”, राधाच्या बॉयफ्रेंडविषयी अनुश्री पुढे म्हणते, ”मी फॅन आहे त्याची.. म्हणजे मी तुझीही फॅन आहे. पण, मला त्याचं अमुक एक गाणं खूप आवडतं.”
Suniel Shetty VS Ahan Shetty Fees: ‘बॉर्डर’मध्ये सुनील शेट्टीची फी किती होती? ‘बॉर्डर 2’मध्ये अहान शेट्टीने घेतली एवढी रक्कम
यावर राधा पुढे सांगते, तुला माहिती का? जेव्हा आम्ही फिरायला जातो.. तेव्हा माझ्यासोबत कोणी फोटो काढत नाही पण त्याच्याबरोबर फोटो काढण्यासाठी खूप गर्दी होते.. लोक वेडे आहेत त्याच्यासाठी.. पण, तो कधीच माझा हात सोडत नाही. आता आम्हाला 3 वर्ष झाली.. असं कधीच वाटलं नाही की, आमच्यापैकी कोणाचं तरी प्रेम कमी झालं आहे. आमचं एकमेकांवर खूप प्रेम आहे.मी चिडते, ओरडते.. तरीही तो सगळं सहन करतो. आता त्याची आठवण आल्यावर मला खूप रडायला येतंय” यानंतर शेवटी राधाने अनुश्रीला तिच्या बॉयफ्रेंडचं पूर्ण नावही सांगितलं…हे नाव एपिसोड टेलिकास्ट दरम्यान म्युट करण्यात आलं आहे.
“Pushpa 3 मध्ये Salman Khanची एन्ट्री, Allu Arju च्या चित्रपटात काय असेल भाईजानचा रोल? वाचा सविस्तर