Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Priya Marathe : अनेकांनी अत्यंत वाईट कमेंट्स केल्या… दोन वर्ष झगडून… प्रिया मराठेच्या निधनावर प्रसिद्ध अभिनेत्रीची पोस्ट

कलाकरांना इतकं का ट्रोल केलं जातं ? ती आजाराशी झगडत असताना.... अभिनेत्री प्रिया मराठेच्या निधनानंतर प्रसिद्ध अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल..

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Aug 31, 2025 | 07:16 PM
Priya Marathe : अनेकांनी अत्यंत वाईट कमेंट्स केल्या… दोन वर्ष झगडून… प्रिया मराठेच्या निधनावर प्रसिद्ध अभिनेत्रीची पोस्ट
Follow Us
Close
Follow Us:

अभिनेत्री प्रिया मराठेच्या निधनानंतर संपूर्ण मराठी मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. पवित्र रिश्ता ते तू तिथे मी अशी लोकप्रिय मालिकेतून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची पसंती प्रियाने मिळवली होती. प्रियाच्या अशा जाण्याने अनेक कलाकारांनी आपल्या भावना सोशल मीडियावर व्यक्त केल्या आहेत. अशातच प्रसिद्ध अभिनेत्री आणि लेखिका मुग्धा गोडबोले यांची पोस्ट देखील सध्या चर्चेत आहे.

सोशल मीडियाच्या माध्यमातून कलाकारांच्या नव्या प्रोजेक्टचे सर्व अपडेट प्रेक्षकांपर्यंत पोहोचवता येतात. मात्र या सोशल मीडियामुळे अनेकदा विनाकारण कालाकारांना ट्रोल देखील केलं जातं. याच मुद्यावर मुग्धा गोडबोले यांनी खंत व्यक्त केली आहे.

काय म्हणाल्या मुग्धा गोडबोले ?

जुलै 2023 मध्ये प्रियाने इंस्टाग्राम वर एक व्हिडिओ शेअर केला होता. ‘ प्रकृतीच्या कारणामुळे सध्या सुरू असलेल्या मालिकेतून मी बाहेर पडते आहे.’ चॅनेलनेही आपल्या official page वरून तो व्हिडिओ शेअर केला. प्रियाला कॅन्सर झाला होता. तरीही ती काही काळ शूटिंग करत होती पण ती त्या ट्रीटमेंटमुळे थकत होती. त्या मालिकेत ती नकारात्मक भूमिका करत होती. त्याचा परिणाम म्हणून असेल, पण त्या व्हिडिओ खाली अनेकांनी अत्यंत वाईट कमेंट्स लिहिल्या होत्या. इथे उच्चारता येणार नाहीत अश्या. काय वाटलं असेल तिला? प्रिया गेली. दोन वर्ष झगडून थकली. त्याबद्दल अतोनात दुःख आहे. फार कमी गोष्टींनी मी इतकी अस्वस्थ होते. एरवी तशी मी टगी आहे. पण प्रिया फार गोड मुलगी होती. फार सज्जन. राहून राहून पुन्हा तोच प्रश्न. का लिहितात लोक एखाद्याबद्दल इतकं वाईट? कलाकाराच्या कामाची पावती वगैरे म्हणायला मुळात आता प्रेक्षक इतके भाबडे राहिले आहेत का? कलाकार, त्याचं काम, प्रतिमा यातला फरक न कळण्याइतके? स्वतःमधलं काहीतरी घाणेरडं बाहेर काढायचा मार्ग झालाय तो आता. एकानं सुरू केलं की सगळे सुरू होतात. विष पसरत जातं.

सोसश मीडियावर होणारं ट्रोलिंग याचा कुठे ना कुठे कलाकरांच्या मानसिकतेवर देखील परिणाम होतो. माणूसकी सोडून टीका करणं कितपत योग्य आहे असा सवाल देखील अनेकदा कलाकरांनी उपस्थित केलेला आहे. याच मुद्यावरुन मुग्धा गोडबोले यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत खंत व्यक्त केली आहे. पवित्र रिश्ता, तू तिथे मी, तुझेच मी गीत गात आहे या आणि अशा लोकप्रिय मालिकेतून प्रियाने खलनायिकेची भूमिका साकारली. अ परफेक्ट मर्डर या नाटकातील तिच्या भूमिकेला देखील प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दर्शवली होती.

 

Web Title: Why do audiences troll artists so much actress mugdha godboles post is in the news after priya marathes death

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 31, 2025 | 07:16 PM

Topics:  

  • marathi actress
  • priya marathe

संबंधित बातम्या

Priya Marathe: करियर, मैत्री आणि स्ट्रगल ते फिल्मी स्टाईल प्रपोज; ‘अशी’ आहे प्रिया शंतनूची लव्हस्टोरी
1

Priya Marathe: करियर, मैत्री आणि स्ट्रगल ते फिल्मी स्टाईल प्रपोज; ‘अशी’ आहे प्रिया शंतनूची लव्हस्टोरी

अभिनेत्री प्रिया मराठेच कॅन्सरमुळे ३८ व्या वर्षी निधन, २५ वयानंतर महिलांमध्ये दिसून येतात ही लक्षणे
2

अभिनेत्री प्रिया मराठेच कॅन्सरमुळे ३८ व्या वर्षी निधन, २५ वयानंतर महिलांमध्ये दिसून येतात ही लक्षणे

Priya Marathe: देव का असं करतो? मला काही कळत नाही…; प्रिया मराठेच्या निधनाची बातमी मिळताच उषा नाडकर्णीं यांनी फोडला हंबरडा
3

Priya Marathe: देव का असं करतो? मला काही कळत नाही…; प्रिया मराठेच्या निधनाची बातमी मिळताच उषा नाडकर्णीं यांनी फोडला हंबरडा

Priya Marathe : मालिकेच्या दरम्यान तिचा त्रास वाढला पण….; प्रिया मराठे बद्दल सुबोध भावेची भावूक पोस्ट
4

Priya Marathe : मालिकेच्या दरम्यान तिचा त्रास वाढला पण….; प्रिया मराठे बद्दल सुबोध भावेची भावूक पोस्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.