(फोटो सौजन्य - Instagram)
मराठी चित्रपट ‘आता थांबायचं नाय’ सध्या चर्चेत आहे. चित्रपटगृहातमध्ये धुमाकूळ घालून झाल्यानंतर या चित्रपटाचे आता जून महिन्यात ZEE5 या डिजिटल प्रीमियर जाहीर केले आहे. ‘आता थांबायचं नाय’ या सिनेमात मुंबईतल्या स्वच्छता कामगारांना सलाम करण्यात आला असून या हृदयस्पर्शी सिनेमात शहर चालतं ठेवणाऱ्या, परंतु स्वतः पडद्याआड राहाणाऱ्या हिरोंची गोष्ट पाहायला मिळाली आहे. प्रादेशिक कंटेंटप्रती बांधील राहात ZEE5 सादर करत असलेला आता थांबायचं नाय हा एक जबरदस्त सिनेमा आहे.
नवोदित शिवराज वायचळ यांनी दिग्दर्शित केलेल्या या सिनेमात भरत जाधव, सिद्धार्थ जाधव आणि प्रसिद्ध सिनेमा दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांच्या प्रमुख भूमिका प्रेक्षकांना पाहायला मिळालेल्या आहेत. आता थांबायचं नाय हा सिनेमा खऱ्या घटनेवर आधारित असून त्यात भावना आणि आशेच अनोख दर्शन घडत आहे. थिएटरमधे प्रदर्शित झाल्यापासून हा सिनेमा सांस्कृतिक स्तरावर गाजत आहे. कौतुकास्पद अभिप्राय मिळवत बॉक्स ऑफिसवर विक्रम तोडणाऱ्या या चित्रपटाने आयएमडीबीवर 8.8 चे जबरदस्त रेटिंग मिळवलं आहे. मोठ्या पडद्यावर मिळालेल्या या भरघोस यशानंतर याचं बहुप्रतीक्षीत डिजिटल प्रीमियर केवळ ZEE5 वर 28 जून रोजी होणार आहे.
Housefull 5: रोज चित्रपटाच्या नावावर नवा रेकॉर्ड; आता अक्षयने स्वतःच्याच ‘या’ चित्रपटाला टाकले मागे!
दिग्दर्शक शिवराज वायचळ या चित्रपटाबद्दल म्हणाले, ‘सुरुवातीपासूनच आता थांबायचं नाय हा फक्त सिनेमा नाही, तर त्यापलीकडे जाणारी भावना, आदरांजली आणि प्रामाणिकपणे सांगण्यासारखी गोष्ट, विनोद आणि हृदयस्पशीपणाचा अनुभव असेल याची मला जाणीव होती. दिग्दर्शनाची पहिलीच वेळ असल्यामुळे माझ्यासाठी हा सिनेमा जास्त महत्त्वाचा होता. माझं स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी ध्यासासोबत आणखीही काहीतरी गरजेचं होतं आणि ते म्हणजे या सिनेमाच्या कथेवर माझ्याइतकाच विश्वास ठेवणारी एक दमदार टीम. टीमनं माझ्यावर ठेवलेला विश्वास आणि त्यांची उर्जा यामुळे हा प्रवास आणखी अविस्मरणीय ठरला आहे.’ असे ते म्हणाले आहे.
‘The Great Indian Kapil Show’ मध्ये पुन्हा का परतले सिद्धूपाजी? अर्चना पूरण सिंगबद्दल केला खुलासा!
तसेच ते पुढे म्हणाले की, थिएटरमध्ये मिळालेला प्रतिसाद माझ्या कल्पनेपलीकडचा होता. आणि आता देशभरातील प्रेक्षकांना ZEE5 वर हा सिनेमा पाहायला मिळणार असल्याचा मला आनंद वाटतो. मला विश्वास आहे, की हा सिनेमा त्यांना आशा देईल, त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवेल आणि कुठेतरी त्यांनाही हातात पेन घेऊन नवा अध्याय सुरू करण्याची प्रेरणा देईल.’ तसेच ‘आता थांबायचं नाय’ हा मराठी ब्लॉकबस्टर चित्रपट थिएटरमध्ये पाहायचा राहून गेला असेल, तर 28 जून रोजी ZEE5 वर प्रेक्षकांना पाहता येणार आहे.