(फोटो सौजन्य - Instagram)
विनोदी कलाकार कपिल शर्माने अलीकडेच नवजोत सिंग सिद्धूच्या शोमध्ये परतण्याची घोषणा करून चाहत्यांना आनंद दिला. त्यांच्या ताज्या व्हीलॉगमध्ये, सिद्धू यांनी या पुनरागमनाला “घरी परतलो” असं म्हटले आणि १३ वर्षांपूर्वी कपिलला त्याचा शो सुरू करण्यास मदत केल्याचे उघड केल आहे. तसेच त्यांनी या व्हीलॉगमध्ये अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. तसेच ते नक्की काय काय म्हणाले हे आपण जाणून घेणार आहोत.
कपिलचा ‘कॉमेडी सर्कस’ मध्ये घेतला फायदा
सिद्धू यांनी आठवण करून दिली की ते ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ मध्ये जज करत होते, जिथे कपिलला ओळख मिळाली. त्यानंतर कपिल ‘कॉमेडी सर्कस’ मध्ये गेला, जिथे सिद्धूच्या मते, “त्याच्याकडून खूप काम करून घेतले जात होते आणि तो स्वतःची ओळख निर्माण करू शकत नव्हता.” म्हणून सिद्धू पाजी यांनी त्याला खूप मदत केली असे त्यांनी म्हटले आहे.
दिलजीत दोसांझच्या ‘Sardaar Ji 3’ वरून उडाला गोंधळ? चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी
सिद्धू यांनी असेही सांगितले की त्यांनी ‘बिग बॉस’ फक्त एका महिन्यासाठी केला जेणेकरून त्याला अमृतसरमध्ये घर खरेदी करण्यासाठी पैसे मिळतील. जेव्हा ते शोमधून बाहेर पडला तेव्हा त्यावेळचे कलर्स वाहिनीचे प्रमुख राज नायक म्हणाले की, सिद्धू त्याच्यासोबत आला तरच कपिलला त्याचा स्वतःचा शो मिळेल. त्यानंतर कपिलने ‘कॉमेडी नाईट्स विथ कपिल’ सुरू केला ज्यामध्ये पहिले पाहुणे धर्मेंद्र होते. हा शो खूप हिट झाला, परंतु सिद्धूने सांगितले की राजकारणामुळे त्याला शो सोडावा लागला.
‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ मध्ये परत येण्याबद्दल सिद्धूची प्रतिक्रिया
सिद्धू पाजी म्हणाले की, “मी जिथे जिथे गेलो तिथे लोक मला विचारायचे की मी कपिलच्या शोमध्ये परत का येत नाही. नंतर कठोर परिश्रम आणि नशिबाने मला साथ दिली आणि मी पुन्हा शोमध्ये परत आलो. ज्या एपिसोडमध्ये मी दिसलो त्या एपिसोडसाठी मला जितके प्रेम मिळाले, ते पाहून असे वाटले की मी पुन्हा घरी परतलो आहे.” तसेच ते अर्चना पूरण सिंगबद्दल म्हणाले की, “मी अर्चना जी बद्दल देखील बोललो. मी माँ दुर्गेचा भक्त आहे, म्हणून मी कोणाला दुखावून कसे परत येऊ शकतो. मी तिच्याशी बोललो, तिनेही होकार दिला आणि आता ती देखील माझ्यासोबत शोमध्ये आहे. सर्वांचे प्रेम आणि आदर मिळाल्याने मला खूप आनंद होत आहे.” असे त्याने म्हटले.
‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ बद्दल
या शोचा पहिला सीझन २०२४ मध्ये नेटफ्लिक्सवर रिलीज झाला. दोन सीझनच्या यशानंतर आता तिसरा सीझन २१ जून रोजी सुरू होणार आहे. अर्चना पूरण सिंग, कृष्णा अभिषेक, सुनील ग्रोव्हर आणि किकू शारदा सारखे कलाकार त्यात दिसणार आहेत. यावेळी खास गोष्ट म्हणजे प्रत्येक भागात प्रेक्षकांना रंगमंचावर त्यांची प्रतिभा दाखवण्याची संधी देखील मिळेल.