(फोटो सौजन्य - अकाउंट)
आज जागतिक रंगभूमी दिन सर्वत्र साजरा केला जात आहे. सर्व कलाकार आज खूप आनंदी आणि हा दिवस साजरा करताना दिसत आहे. तसेच आता आपण जाणून घेणार आहोत की हा दिवस का साजरा केला जातो. अनेक वर्षांपूर्वी जागतिक रंगभूमी दिन साजरा करायला सुरूवात झाली. 1961 मध्ये ‘युनेस्को’च्या इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिट्यूटने या दिवसाची सुरुवात केली गेली पण पहिला जागतिक रंगभूमी दिन 1962 मध्ये साजरा झाला. तेव्हापासून हा दिवस खास बनला आहे. या विशेष दिवशी जगभरातील नाट्य जगतातील महत्त्वाची एक व्यक्ती संदेश देते. हा युनेस्कोच्या जागतिक रंगभूमी दिनाचा महत्त्वाचा भाग आहे. 1962 साली ज्यो कॉक्चू यांनी पहिल्यांदा हा संदेश देण्याचा पहिला मान मिळवला होता. तर 2002 मध्ये प्रसिद्ध भारतीय नाट्य कलाकार गिरीश कर्नाड यांना ही संधी मिळाली होती.
ऐश्वर्या राय बच्चनच्या कारला बसची धडक; कोणतीही जीवित हानी नाही
भारतीय रंगभूमीचा इतिहास
भारतातील रंगभूमीचा इतिहास खूप जुना मानला जातो. असे म्हटले जाते की नाट्यकलेचा पहिला विकास भारतातच झाला. ऋग्वेदातील काही सूत्रांमध्ये यम आणि यमी, पुरुरवा आणि उर्वशी इत्यादींचे काही संवाद पाहायला मिळत आहेत. हे संवाद वाचल्यावर इथूनच नाटकाची सुरुवात झाली असावी, असे अनेक अभ्यासकांचे म्हणणे आहे. भारतीय रंगभूमी कलाकार आणि प्रेक्षकांच्या प्रेमाने भरलेली आहे. आणि म्हणूनच ती अजूनही आणि पुढेही वर्षानुवर्षे सुरु राहणार आहे.
Peddi: तोंडात बिडी, डोळ्यात अंगार; पुष्पाच्या अवतारात परतला राम चरण, नव्या लूकने वेधले लक्ष!
मराठी रंगभूमी
नाटक हे मराठी माणसाच्या मनावर सर्वकाळ अधिराज्य गाजवणारं माध्यम आहे. आज आपण सिनेमा, टीव्ही, ओटीटी असं सर्व सुविधांयुक्त आयुष्य जगत असलो तरी नाटक बघणारा, त्याला पसंती देणारा एक माणूस सर्वात मोठा मानला जात आहे. आपल्या आवडत्या कलाकाराला प्रत्यक्ष अभिनय करताना बघणं आणि त्याला त्याच्या कामाची दाद देणं हे मराठी प्रेक्षकांना मनापासून आवडणार काम आहे. म्हणून हे माध्यम अधिकाधिक पारदर्शक आणि चाहत्यांच्या जवळचे आहे. विष्णुदास भावे यांच्या ‘सीता स्वयंवर’ हे पहिलं नाटक हे सादर केले गेले आणि मराठी रंगभूमीला स्वत:ची ओळख मिळाली. 1843 मध्ये सांगलीत मराठीतल्या या पहिल्या संवाद आणि संगीत नाटकाचा प्रयोग सादर झाला होता.