Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Marathi Serial : अखेर वडिलांचं सत्य आलं समोर, केदारच्या आयुष्यात नवं वादळ; तारिणी मालिकेचा नवा प्रोमो

केदारला दयानंद खांडेकर हे सत्य ज्या दिवशी सांगणार त्याचवेळी केदारला ते आधीच कळतं. याबाबतचा प्रोमो झी मराठीच्या सोशल मीडियावर शेअर करण्य़ात आला आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Dec 04, 2025 | 01:56 PM
Marathi Serial : अखेर वडिलांचं सत्य आलं समोर, केदारच्या आयुष्यात नवं वादळ; तारिणी मालिकेचा नवा प्रोमो
Follow Us
Close
Follow Us:
  • अखेर वडिलांचं सत्य आलं समोर,
  • केदार त्याच्या वडिलांना स्विकारणार का ?
  •  केदार पुढे काय निर्णय घेणार ?
झी मराठी वाहिनीवरील तारिणी मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरत आहे. या मालिकेने आता नवं वळण घेतलं आहे. तारिणीच्या टीम मधला आणि तिच्या सगळ्यात जवळचा मित्र म्हणजे केदार. हा केदार लहानपणापासून आई गेल्यानंतर त्याच्या वडिलांचा शोध घेत आहे असं मालिकेत दाखवण्यात आलं आहे. आता केदारचा हाच शोध अखेर संपला असून त्याच्या आयुष्यात नवं वादळ येऊ घातलंय.केदार आणि युवराजचे वडिल दयानंद खांडेकर हे कायमच कोणत्या न कोणत्या कारणांनी एकमेकांसमोर येत गेले आणि या दोघांमध्ये खूप चांगली मैत्री देखील झाली. मात्र नियतीच्य़ा मनात काही वेगळचं होतं ज्याला केदारने सर्वात जवळचा मित्र मानलं तेच दयानंद खांडेकर आपले वडिल असल्याचं सत्य केदार समोर आलं आहे.

केदारला त्याच्य़ा वडिलांचा चेहरा माहित नसला तरी, वडिलांच्या हातातल्या अंगठीवरुन तो आपल्या वडिलांच्या शोधात असतो. कधी ना कधी त्य़ाला त्याचे वडिल भेटतील आणि त्याचा शोध पूर्ण होईल अशी खात्री केदारला असते आणि आता हा शोध जरी पूर्ण झाला असला तरी, आता जे सत्य केदार समोर आलं आहे त्यामुळे केदारच्या आयुष्यात आता नवं वळण आलं आहे.

समुद्रकिनारी Abhijeet Sawant- Gautami Patilचा रोमान्स, रुपेरी वाळूत गाणं ‘या’ दिवशी होणार रिलीज

एकीकडे युवराजचे वडिल दयानंद खांडेकर यांना केदार आपलाच मुलगा असल्याचं सत्य लपवून ठेवणं दिवसेंदिवस जड जातं. कित्येक वर्ष लपवून ठेवलेलं हे सत्य केदारला सांगण्याचा निर्धार दयानंद खांडेकर करतात. मात्र घडतं काहीचरी वेगळंच. केदारला दयानंद खांडेकर हे सत्य ज्या दिवशी सांगणार त्याचवेळी केदारला ते आधीच कळतं. याबाबतचा प्रोमो झी मराठीच्या सोशल मीडियावर शेअर करण्य़ात आला आहे.

 

काय आहे प्रोमोमध्य़े ?
तारिणी आणि संपूर्ण टीम गुंडांचा पाठलाग करत असतात त्यावेळी तारिणी त्या गुंडाला पिस्तुल खाली करण्यास सांगितलं. त्याचवेळी तारिणी केदारवर प्रचंड चिडलेली असते. कारण त्या गुडांच्या ताब्यात टीमचा कमांडर असतो. तारिणी केदारला खूप ओरडते. ती केदारला म्हणते की, तुझ्या चुकीमुळे आज कमांडरचा जीव धोक्यात होता. केदारच्य़ा मनात त्यावेळी अनेक प्रश्न उभे राहिलेले असतात. केदार तारिणीला म्हणतो की, आजपर्यंत मी माझ्या वडिलांचा शोध घेत होतो ती व्यक्ती दयानंद खांडेकर आहे. तारिणीला हे सांगताना केदार खूप रागात असतो. त्याचा रागावर संयम राहत नाही. तारिणीला मिठी मारत केदार खूप रडतो. मालिकेचा हा भाग येत्या 5 डिसेंबरला प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

केदार त्याच्या वडिलांना स्विकारणार का ? खांडेकरांच्या कुटुंबात केदार राहायला जाईल का ? केदार आता पुढे काय निर्णय घेणार या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मालिकेच्या येणाऱ्या भागात समोर येणार आहेत.

महिला दिनी उलगडणार ‘तिघीं’च्या आयुष्यातलं ‘चौथं पान’, ‘तिघी’ चित्रपटाचं नवीन पोस्टर रिलीज

💡

Frequently Asked Questions

  • Que: केदारचे वडिल दयानंद खांडेकर असल्याचं कसं उघड होतं?

    Ans: दयानंद खांडेकर आणि केदारची अनोखी मैत्री मालिकेत दाखवली आहे. खांडेकर हे सत्य सांगण्याचा निर्णय घेत असतानाच केदारला एका अनपेक्षित क्षणी ते आधीच समजतं. यामुळे त्याच्यासमोर भावनिक वादळ उभं राहतं.

  • Que: केदार खांडेकरांच्या कुटुंबात राहायला जाणार का?

    Ans: हे अद्याप स्पष्ट नाही. केदारच्या भावना, राग, भूतकाळातील दुःख—या सर्वांचा त्याच्या निर्णयावर परिणाम होणार आहे. येणारे भाग याबाबतचा पुढचा टप्पा उलगडतील.

  • Que: ) केदारला हे सत्य कसं कळतं?

    Ans: टीम गुंडांचा पाठलाग करत असताना तारिणी केदारवर चिडते. त्याच भावनिक क्षणी केदार तारिणीला सांगतो की त्याच्या वडिलांचा शोध अखेर संपला आहे.

Web Title: Zee marathi tarini serial new twist in kedar life new promo share on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 04, 2025 | 01:36 PM

Topics:  

  • zee marathi

संबंधित बातम्या

‘देवमाणूस – मधला अध्याय’मध्ये आजवरचा सर्वात मोठा ट्विस्ट; लालीने ओलांडल्या सर्व मर्यादा, खळबळजनक कट उघड
1

‘देवमाणूस – मधला अध्याय’मध्ये आजवरचा सर्वात मोठा ट्विस्ट; लालीने ओलांडल्या सर्व मर्यादा, खळबळजनक कट उघड

“सावज हाती लागलं, कामिनीच्या सापळ्यात अडकली सरोज” ; ‘कमळी’ मालिकेत नवा ट्विस्ट
2

“सावज हाती लागलं, कामिनीच्या सापळ्यात अडकली सरोज” ; ‘कमळी’ मालिकेत नवा ट्विस्ट

‘शुभ श्रावणी’चा नवा प्रवास; शिक्षणमंत्र्यांनी फेटाळल्या सर्व अफवा, केली मोठी घोषणा
3

‘शुभ श्रावणी’चा नवा प्रवास; शिक्षणमंत्र्यांनी फेटाळल्या सर्व अफवा, केली मोठी घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.