सुप्री मीडिया प्रस्तुत आणि कोक्लिको पिक्चर्स निर्मित ‘तिघी’ हा हृदयस्पर्शी आणि नात्यांच्या उबदार धाग्यांनी विणलेला चित्रपट येत्या महिला दिनी म्हणजेच ६ मार्च २०२६ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आई-मुलींच्या नात्यात दडलेल्या न सांगितलेल्या भावना, आठवणी आणि काही अंतर्मुख करणाऱ्या क्षणांवर आधारित ही कथा आहे. महिला दिनाच्या निमित्ताने प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटातून स्त्रीमनाच्या प्रवासाची झलक प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
Happy Patel : आमिर खानने केली आगामी चित्रपटाची घोषणा, ‘हा’ अभिनेता दिसणार मुख्य भूमिकेत
‘तिघींच्या जगण्यातलं चौथं पान’ उलगडत असताना या तिघींमधलं नातं, त्यांचे आयुष्याकडे पाहाण्याचे दृष्टिकोन आणि बदलत्या काळातली भावनिक चढ-उतार यांचा सुंदर वेध दिग्दर्शिका जीजिविषा काळे यांनी घेतला आहे. ज्येष्ठ अभिनेत्री भारती आचरेकर यांच्यासह नेहा पेंडसे बायस आणि सोनाली कुलकर्णी या चित्रपटात दिसणार आहेत. चित्रपट पाहण्यासाठी आता चाहते खूप उत्सुक आहेत.
b
या चित्रपटाबद्दल सांगताना दिग्दर्शिका जीजिविषा काळे म्हणाली, “‘तिघी’ हा आई-मुलींच्या नात्याचा चित्रपट असून त्यांच्या आतल्या आवाजांचा प्रवास आहे. आपण ज्या भावना दैनंदिन आयुष्यात व्यक्त करू शकत नाही, त्या सगळ्या या कथेतून उलगडतात. येत्या महिला दिनाच्या निमित्ताने हा चित्रपट प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहोत तो नक्की पहा.’’ आता या चित्रपटाची कथा जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
१७ वर्षांनंतर थिएटरमध्ये येतोय बॉलीवुडचा सर्वात मोठा चित्रपट; ३ तास ३२ मिनिटांचा एक्शन-थ्रिलरचा डोस
या चित्रपटाचे निर्माते शार्दूल सिंह बायस म्हणाले, “आई-मुलीचे नाते खूप खास असते. आपण नेहमी देत असलेल्या प्रेमाच्या, त्यागाच्या आणि न बोलता केलेल्या काळजीच्या गोष्टी प्रत्येक घरात पाहायला मिळतात. ‘तिघी’ ही त्याच घराची, त्याच नात्यांची गोष्ट आहे. हा चित्रपट प्रत्येकाला स्वतःच्या कुटुंबाशी जोडून ठेवेल, याची मला खात्री आहे.’’ असे ते म्हणाले.
सुप्री मीडिया प्रस्तुत आणि कोक्लिको पिक्चर्स निर्मित ‘तिघी’ हा चित्रपट येत्या ६ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जीजिविषा काळे दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती शार्दूल सिंह बायस, नेहा पेंडसे बायस, निखिल महाजन, सुहृद गोडबोले, स्वप्निल भंगाळे यांनी केली आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने शार्दूल सिंह बायस, नेहा पेंडसे बायस, निखिल महाजन पुन्हा एकदा एकत्र आल्याने प्रेक्षकांना काहीतरी भावस्पर्शा कलाकृती पाहायला मिळणार आहे.






