नितेश तिवारीच्या बिग बजेट चित्रपटात मोहित रैनाची वर्णी, चाहत्यांना देणार पुन्हा दर्शन
नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ चित्रपटाची गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षकांमध्ये जोरदार चर्चा होताना दिसत आहे. दिवसेंदिवस चित्रपटाबद्दल प्रेक्षकांना नवनवीन अपडेट पाहायला मिळत आहे. बॉलिवूड इंडस्ट्रीतील अनेक सुप्रसिद्ध कलाकार चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
अशातच आता मिळालेल्या नव्या माहितीनुसार, अनेक टेलिव्हिजन सीरीयल्समध्ये महादेवाची भूमिका साकारून प्रसिद्धीझोतात आलेल्या टीव्ही अभिनेता मोहित रैना चित्रपटामध्ये महादेवाची भूमिका साकारणार असल्याचे वृत्त आहे. सध्या ही अधिकृत माहिती नसून अशी चाहत्यांमध्ये चर्चा सुरु आहे.
Kamal Haasan: कर्नाटकातील उच्च न्यायालयात कमल हसन यांची धाव, नेमकं प्रकरण काय ?
रणबीर कपूर आणि साई पल्लवी स्टारर ‘रामायण’ चित्रपट २०२६ च्या दिवाळीमध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटाची गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चा सुरु आहे. आता अशातच चित्रपटामध्ये महादेवाची भूमिका कोण साकारणार आहे, हे स्पष्ट आहे. रावणाची भूमिका चित्रपटामध्ये टॉलिवूड अभिनेता यश साकारणार आहे. खरंतर, रावण हा महादेवाचा फार मोठा भक्त होता, हे तर सर्वांनाच ठावूक आहे. त्यामुळे चाहत्यांना आता महादेवाच्या भूमिकेत बॉलिवूड अभिनेता मोहित रैना दिसण्याची शक्यता आहे.
अण्णा, आदित्य, बबली आणि सनी यांचा नवा घोटाळा! ‘ये रे ये रे पैसा ३’ची रिलीज डेट जाहीर
‘देवो के देव महादेव’ मालिकेच्या माध्यमातून महादेवाच्या भूमिकेमुळे प्रसिद्धीझोतात आलेल्या मोहित रैनाला चित्रपटाचा भाग बनवले असल्याचे वृत्त आहे. त्याला चित्रपटामध्ये फायनल करण्यात आल्याचं वृत्त आहे. कोणतीही कलाकृती असो तो महादेवाच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत असतो, तो त्या भूमिकेमध्ये परफेक्ट दिसतो. अद्याप निर्मात्यांकडून किंवा दिग्दर्शकांकडून याबद्दलची अधिकृत माहिती मिळालेली नाही. मात्र, पुन्हा एकदा मोहित रैनाला महादेवाच्या रुपामध्ये पाहण्यासाठी चाहते आतुर आहेत.
बनावट AI Video वर पंकज त्रिपाठीने व्यक्त केले मत, म्हणाले- ‘मानवी भावनांचे महत्व संपत आहे…’
‘रामायण’ चित्रपटाच्या दुसऱ्या भागामध्ये यश आणि रणबीर कपूर आमने सामने येणार आहेत. त्यामुळे त्यांचं शूटही सध्या वेगवेगळंच सुरु आहे. सध्या आता दोन- तीन महिने यशचं शूट सुरु असणार आहे. त्यातच आता, मोहित रैनाचं शूट नक्की केव्हा सणार आणि तो खरंच चित्रपटात दिसणार का ? अद्याप गुलदस्त्यातच आहे. नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ दोन भागांमध्ये रिलीज होणार आहे. त्याचा पहिला भाग दिवाळी २०२६ आणि दुसरा भाग दिवाळी २०२७ मध्ये रिलीज होणार आहे. रणबीर कपूर प्रभू श्रीरामाच्या भूमिकेत, साई पल्लवी माता सीतेच्या भूमिकेत, रवी दुबे लक्ष्मणाच्या भूमिकेत, सनी देओल हनुमानाच्या भूमिकेत आणि रावणाच्या भूमिकेत यश दिसणार आहे. दरम्यान, चित्रपटामध्ये इतरही बरीच स्टारकास्ट असून या चित्रपटाचं बजेट ८३५ कोटी रुपये आहे.