(फोटो सौजन्य - Instagram)
‘क्रिमिनल जस्टिस ४’ ही मालिका नुकतीच प्रदर्शित झाली आणि या मालिकेमध्ये अभिनेता पंकज त्रिपाठी मुख्य भूमिकेत दिसत आहेत. तसेच त्यांच्या या मालिकेमुळे ते सध्या चर्चेत आहे. दरम्यान, एका मुलाखतीत त्यांनी बनावट एआय-जनरेटेड व्हिडिओंच्या वाढत्या ट्रेंडबद्दल आपले मत मांडले आणि त्यांना याबद्दल काय वाटते हे सांगितले आहे. एआय-जनरेटेड व्हिडिओंबद्दल पंकज त्रिपाठी काय म्हणाले हे आपण आता जाणून घेणार आहोत.
पंकज त्रिपाठी यांचे एआय बद्दलचे विचार
ऑनलाइन पसरणाऱ्या बनावट एआय कंटेंटबद्दल विचारले असता, पंकज त्रिपाठी यांनी झूम टीव्हीला सांगितले की, “मला माझ्या बालपणी विज्ञानाबद्दलचा एक लेख आठवतो. ‘हे वरदान आहे की शाप?’ ते काय आहे? ते दोन्ही आहे. जर ते योग्य पद्धतीने वापरले गेले तर ते एक उत्तम गोष्ट आहे. जर ते कोणत्याही कारणाशिवाय वापरले गेले तर ते हानिकारक ठरू शकते. कोणत्याही तंत्रज्ञानाचा वापर योग्य पद्धतीने केला पाहिजे.” असे अभिनेत्याने सांगितले आहे.
‘Housefull 5’ ने ॲडव्हान्स बुकिंगमध्ये केली जबरदस्त कमाई, रिलीजआधीच चित्रपटाचे निर्माते मालामाल!
मानवी भावना खूप महत्त्वाच्या आहेत
ते पुढे म्हणाले, ‘जर तंत्रज्ञान असेल तर त्याचे दोन्ही प्रकारचे उपयोग असतील. एखाद्या व्यक्तीने हे लक्षात घेतले पाहिजे की तो जे पाहत आहे ते खरे आणि मूळ आहे की नाही. तुम्ही किती पाहाल आणि किती समजून घ्याल? तुम्हाला तुमचे जीवन जगावे लागेल आणि कामही करावे लागेल. मला भीती वाटत नाही कारण तंत्रज्ञान कितीही विकसित झाले तरी मानवी भावना खूप महत्त्वाच्या आहेत आणि हे बदलणार नाही.’ असे त्यांनी म्हटले आहे.
प्रसिद्ध दिग्दर्शक Vikram Sugumaran यांचे धक्कादायक निधन, वयाच्या ४७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास!
पंकज त्रिपाठी यांचे काम
पंकज त्रिपाठी शेवटचे ‘क्रिमिनल जस्टिस ४’ मध्ये दिसले होते. त्याचा प्रीमियर २९ मे रोजी झाला. यानंतर, ते अनुराग बसू यांच्या आगामी ‘मेट्रो… इन दिनो’ चित्रपटामध्ये दिसणार आहे. या चित्रपटात आदित्य रॉय कपूर, सारा अली खान, कोंकणा सेन शर्मा, अली फजल, फातिमा सना शेख, अनुपम खेर आणि नीना गुप्ता यांसारखे कलाकार आहेत. हा चित्रपट ४ जुलै २०२५ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. जो प्रेक्षकांना लवकरच पाहता येणार आहे.