महाकुंभातली मोनालिसा ट्रॅपमध्ये फसली ? प्रसिद्ध सिनेनिर्मात्यांनी दिग्दर्शकांच्या आरोपाचे थेट पाढेच वाचले; नेमकं प्रकरण काय ?
१२ वर्षांतून एकदा प्रयागराज येथे कुंभमेळा होतो. तर १४४ वर्षांतून एकदा महाकुंभ होतो. जगभरातून कोट्यवधी भाविक या महाकुंभमध्ये सहभागी झाले आहेत. १३ जानेवारी पासून सुरु झालेला कुंभमेळा येत्या २६ फेब्रुवारीला म्हणजेच, (महाशिवरात्री)च्या दिवशी संपणार आहे. या महाकुंभामध्ये सर्वाधिक चर्चा झाली ती, फुटपाथवर बसून रुद्राक्ष आणि फुलं विकणाऱ्या मोनालिसा भोसले नावाच्या सुंदर तरुणीची. सोशल मीडियाच्या जमान्यात तुफान व्हायरल झालेल्या ह्या तरुणीवर तिचे लक्षवेधी डोळे पाहून आणि निखळ सौंदर्य पाहून अनेकजणं तिच्यावर फिदा झाले. या लक्षवेधी महिलेला महाकुंभात चित्रपटाची ऑफरही मिळाली आहे. एका प्रसिद्ध निर्मात्यांनी तिला फसवल्याचा आरोप दिग्दर्शक सनोज मिश्रा यांच्यावर केला आहे.
Fussclass Dabhade Movie: ‘फसक्लास दाभाडे’ चित्रपटाची सातासमुद्रापारही क्रेझ कायम, एकूण कमाई किती
महाकुंभामध्ये मिळालेल्या लोकप्रियतेनंतर मोनालिसा हिला एका प्रसिद्ध चित्रपट निर्मात्यांनी तिला चित्रपटाची ऑफर दिली आहे. ती सनोज मिश्रा दिग्दर्शित ‘द डायरी ऑफ मणिपुर’चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. दरम्यान, एका मुलाखतीत निर्माते जितेंद्र नारायण यांनी सनोज यांच्यावर मोनालिसाला फसवल्याचा आरोप केला आहे. जितेंद्र नारायण सिंह उर्फ वसीम रिजवी यांनी टॉप सीक्रेटला नुकतीच मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी सनोज यांच्यावर एका गरीब कुटुंबातून आलेल्या मुलीचा फायदा घेतल्याचे सांगितले आहे. तसेच सनोज हे साध्याभोळ्या मुलींना सिनेमात काम देण्याचे आमिष दाखवतात आणि त्यांच्यासोबत गैरव्यवहार करतात असे जितेंद्र यांनी म्हटले.
मुलाखतीत जितेंद्र नारायण यांनी सांगितले की, ” ‘महाकुंभ’ची व्हायरल गर्ल मोनालिसा एका ट्रॅपमध्ये अडकली आहे. मला मोनालिसाबद्दल आणि तिच्या कुटुंबाबद्दल खूप वाईट वाटते, ते फार साधे लोकं होते. मी त्यांचे महाकुंभातील व्हायरल झालेले काही फोटो पाहिले होते, पण सनोज मिश्रा सारखा दिग्दर्शक त्यांच्या घरी पोहोचला आणि मोनालिसाला आणि कुटुंबाला त्याच्याबद्दल काहीही कळले नाही. त्यांनी त्यांच्या मुलीला त्याच्या स्वाधीन केले. संनोज मिश्राकडे फायनान्सर नाही. त्याच्याकडे पैसे नाहीत, मग तो चित्रपट कसा बनवतोय? ‘द डायरी ऑफ मणिपुर’ चित्रपट कधीच बनणार नाही, तो फक्त त्या मुलीच्या निरागसतेचा फायदा घेत तिच्यासोबत फिरत आहे.”
स्वप्नील जोशी आणि प्रसाद ओकचा ‘जिलबी’ आता हिंदीत येणार, कधी आणि कुठे होणार रिलीज ?
चित्रपट निर्मात्याने सांगितले की, त्याच्यामुळे आमचे फार मोठे नुकसान झाले आहे. त्याने अनेक निर्मात्यांची फसवणूक केली आहे. वसीम रिझवींनी पुढे सांगितले की, “जर मोनालिसाच्या कुटुंबाला दिग्दर्शकाबद्दल माहिती असते तर त्यांनी त्यांच्या मुलीला कधीही त्याच्या चित्रपटात पाठवले नसते. चित्रपट बनवण्यासाठी पैसे लागतात. आता कोणीही सनोज मिश्रावर पैसे गुंतवण्यास तयार नाही. ज्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे त्याचे शुटिंग कुठे होत आहे? त्याचे बजेट कुठे आहे? त्याने इंडस्ट्रीतल्या अनेक लोकांकडून पैसे उधार घेऊन पळून गेला आहे. त्यावर दोन पैसेही गुंतवण्यास तयार असलेला आज तुम्हाला कोणी सापडणार नाही.”
जितेंद्र आणि सनोज यांच्यामध्ये वाद सुरू असताना मोनालिसाला पहिल्याच चित्रपटासाठी किती पैसे मिळाले याचीही जोरदार चर्चा सुरू आहे. मोनालिसाला पहिल्या चित्रपटासाठी २१ लाख रुपये मिळणार असल्याच्या चर्चा आहेत. त्यामधील १ लाख रुपये ॲडवान्स देण्यात आल्याचे म्हटले जात आहे.