फोटो सौजन्य: सोशल मीडिया
हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘फसक्लास दाभाडे’ चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर संमिश्र प्रतिसाद मिळताना दिसत आहे. पण असं असलं तरीही चित्रपटाला परदेशात दमदार प्रतिसाद मिळत आहे. २४ जानेवारी २०२५ ला रिलीज झालेल्या ‘फसक्लास दाभाडे’ चित्रपटाने फक्त महाराष्ट्रातच नाही तर सातासमुद्रापार देखील आपली जादू दाखवली आहे. इंग्लंड ,युएई जीसीसी या देशांनंतर आता ‘फसक्लास दाभाडे’ ने बार्सिलोना आणि स्पेनमध्ये आपली छाप पाडून रसिकांच्या मनावर राज्य केले आहे. रसिकांनी तिकडेही चित्रपटाला भरभरून प्रेम दिले असून महाराष्ट्राबाहेरही ‘फसक्लास दाभाडे’ ने आपली जादू दाखवत प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केलंय.
स्वप्नील जोशी आणि प्रसाद ओकचा ‘जिलबी’ आता हिंदीत येणार, कधी आणि कुठे होणार रिलीज ?
सॅकल्निकने दिलेल्या वृत्तानुसार, ‘फसक्लास दाभाडे’ चित्रपटाने आतापर्यंत ३.५१ कोटींची कमाई केलेली आहे. फक्त भारतातच नाही तर आता परदेशातही चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळताना दिसत आहे. इंग्लंड ,युएई जीसीसी या देशांनंतर आता ‘फसक्लास दाभाडे’ ने बार्सिलोना आणि स्पेनमध्ये आपली छाप पाडून रसिकांच्या मनावर राज्य केले आहे. मराठी चित्रपटांना परदेशातल्या नागरिकांनीही भरभरून प्रेम दिले असून महाराष्ट्राबाहेरही ‘फसक्लास दाभाडे’ने आपली जादू दाखवत प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केलंय.
परदेशामध्ये दमदार कामगिरी करणारा ‘फसक्लास दाभाडे’ चित्रपट आता प्रेक्षकांना घरबसल्या ओटीटीवरही पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट आता प्रेक्षकांना ‘ॲमेझॉन प्राईम व्हिडिओ’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर घरबसल्या पाहायला मिळेल. २४ जानेवारीला थिएटरमध्ये रिलीज झालेला हा चित्रपट एका महिन्याच्या आत ओटीटीवर आला आहे. पण तो पाहण्यासाठी तुम्हाला पैसे मोजावे लागतील. ‘फसक्लास दाभाडे’ रेंटवर प्राईम व्हिडीओवर उपलब्ध आहे. तो मोफत पाहण्यासाठी तुम्हाला अजून जवळपास १० ते १२ दिवस वाट पाहावी लागणार आहे.
‘छावा’ व्यतिरिक्त ‘हे’ ऐतिहासिक चित्रपटही सापडले होते वादात, तरीही बॉक्स ऑफिसवर मालामाल
‘फसक्लास दाभाडे’ चित्रपटात क्षिती जोग, सिद्धार्थ चांदेकर, अमेय वाघ, निवेदिता सराफ, हरिष दुधाडे, राजन भिसे, राजसी भावे, तृप्ती शेडगे, मिताली मयेकरसह अनेक कलाकारांची प्रमुख भूमिका आहे. हेमंत ढोमे लिखित, दिग्दर्शित या चित्रपटाचे निर्माते भूषण कुमार, कृष्ण कुमार, आनंद एल राय आणि क्षिती जोग आहेत. चित्रपटाचे वितरण पॅनोरमा स्टुडिओजने केले आहे.