कंगना रणौतचा 'इमर्जन्सी' चित्रपट केव्हा रिलीज होणार ? मुंबई हायकोर्टाने सेन्सॉर बोर्डाला दिले महत्वाचे आदेश
Kangana Ranut Movie Release Date Extend : अभिनेत्री कंगना रणौतच्या ‘इमर्जन्सी’ चित्रपटाला प्रदर्शनाचा मुहूर्त अद्यापही लागलेला नाही. झी एंटरटेन्मेंट एंटरप्रायजेसची निर्मिती असलेल्या ह्या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाने अद्यापही प्रदर्शनाला मंजुरी दिलेली नाही. त्यामुळे प्रॉडक्शन हाऊसने मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केलेली होती. त्या याचिकेवर आज (बुधवारी) सुनावणी झालेली आहे. हाय कोर्टाने आजच्या सुनावणीमध्ये, प्रदर्शनाची पुढची तारीख दिलेली आहे.
हे देखील वाचा – ‘माझ्या चित्रपटावर इमर्जन्सी लादली गेली आहे’, प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलल्याने कंगना रणौत झाली निराश!
कंगना रणौत अभिनित, दिग्दर्शित आणि निर्मित चित्रपट येत्या शुक्रवारी अर्थात ६ सप्टेंबरला थिएटरमध्ये रिलीज होणार होता. पण सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटाच्या अनेक सीन्सवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला होता. त्यामुळे सेन्सॉर बोर्डाने चित्रपटाला सर्टिफिकेट दिलेलं नाही. म्हणून, निर्मात्यांनी सेन्सॉर बोर्डविरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली होती. त्या याचिकेवर बुधवारी (४ सप्टेंबर) न्या. बी. पी. कुलाबावाला आणि न्या. फिरदोश पूनीवाला यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली आहे.
शिरोमणी अकाली दल आणि काही शीख संघटनांनी चित्रपटाच्या प्रदर्शनावर आक्षेप नोंदवला होता. त्यांनी चित्रपटामध्ये काही घटनांचं चुकीच्या पद्धतीने शुटिंग झाल्याचे सांगितले. त्यामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. आजच्या सुनावणीमध्ये, ६ सप्टेंबरपर्यंत याचिका दाखल करणाऱ्या गटाटच्या याचिकांवर निर्णय घेण्यास सांगितले आहे. तर १८ सप्टेंबरपर्यंत चित्रपटाचं प्रमाणपत्र देण्याबद्दलचा निर्णय घ्यावा, असा निर्णय झाला आहे. तर पुढची सुनावणी १९ सप्टेंबरला होणार असून प्रदर्शनाची तारीख १९ सप्टेंबरपर्यंत लांबणीवर गेली आहे.