पूनम पांडेनं (poonam panday)रचलेलं मृत्यूचं कांड आता उघडकीस आलं आहे. तिचा मृत्यू झाला नसून गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाबाबत जनजागृती करण्यासाठी तिनं तिच्या मृत्यूची खोटी बातमी सगळीकडे पसरवली होती. तिच्या या प्रँकनंतर सगळीकडून तिला सुनावण्यात येत आहे. जो तो तिला ट्रोल करताना दिसत आहे. यामध्ये स्टँडअप कॉमेडियन आणि बिग बॉस 17 चा विजेता मुनव्वर फारुकीही मागे नाही. मुनावरने पूनमला सुनावलं मात्र, असं करणं त्याच्याच ट्रोलिंगला कारणीभूत ठरलं आहे. नेमंक काय म्हण्टलं त्याने बघुया.
[read_also content=”मृत्यूची खोटी बातमी देणं पूनम पांडेला पडलं महागात, ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशन उचललं पाऊल; मुंबई पोलिसांकडे कारवाईची मागणी! https://www.navarashtra.com/movies/all-indian-cine-workers-association-write-letter-to-mumbai-police-to-file-complaint-against-poonam-panday-504411.html”]
पूनम पांडेच्या मृत्यूचं सत्य बाहेर आल्यानंतर फॅन्ससह सेलेब्रिटीं सुद्धा तिला चांगल सुनावलं. मुनव्वर फारुकीने त्याच्या एक्स अंकाऊटवर ट्विटमध्ये पूनम पांडेच्या पीआर टीमला फटकारले. “पूनमच्या पीआर टीमला पाईल्स आहे, कॅन्सर नाही.” असं म्हणत त्याने पूनमला सुनावलं. मुनव्वरचे हे ट्विट लाखो लोकांनी पाहिले आणि हजारो लोकांनी कमेंट केल्या. काहींनी या ट्विटवर कमेंट करून मजा घेतली, तर काहींनी मुनव्वरला ट्रोल केलं. एका यूजरने लिहिले की, “तुम्हीही त्यात सामील आहात.”
आणखी एका युजरने लिहिले की, “तुझी मैत्रीण आहे ती तुझ्यासारखंच काम करेल.” एका युजरने तर त्याच्या करिअरबद्दलही चर्चा केली. त्यांनी लिहिले, “भाऊ, तुमचे स्टँडअप करिअर देखील कर्करोगासारखे आहे.” एकाने लिहिले, “तू पनौती आहेस. हे मला माहीत होतं.” याशिवाय, बिग बॉस 17 मधील त्याची परिस्थिती लक्षात घेऊन, एका वापरकर्त्याने लिहिले, “त्याला थोडी सहानुभूती द्या.”
Poonam ki PR team ko
cancer nahi bawasir hua hai.— munawar faruqui (@munawar0018) February 3, 2024
मृत्यूची खोटी बातमी दिली म्हणून सोशल मीडियावर लोकांनी पूनमला चांगलच ट्रोल करत आहेत. यामध्ये नेटकऱ्यांसह सेलेब्रिटिंचांही समावेश आहे. ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशन’ (all india cine workers association) नं पूनम पांडेविरुद्ध एफआयआर नोंदवण्यासाठी मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. पूनम पांडेच्या कृत्याबद्दल असोसिएशनने मुंबईच्या विक्रोळी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली आहे. यामुळे आता पूनम अडचणीत येण्याची शक्यता आहे.