Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘मुसाफिरा’ ठरला स्कॉटिश हायलँड्सवर शूटिंग झालेला पहिला भारतीय चित्रपट, वर्षाअखेरीस येणार प्रेक्षकांच्या भेटीला

‘मुसाफिरा’ हा चित्रपट मैत्रीवर बेतलेला असून मैत्रीची नवीन परिभाषा यात अनुभवायला मिळणार आहे. या बिग बजेट मराठी चित्रपटाची खासियत म्हणजे स्कॉटिश हायलँड्सच्या आयल ऑफ स्कायवर चित्रित केलेला हा पहिला भारतीय चित्रपट ठरणार आहे.

  • By साधना
Updated On: Jun 29, 2023 | 11:57 AM
musafira movie team

musafira movie team

Follow Us
Close
Follow Us:

आनंद पंडित मोशन पिक्चर्स आणि पुष्कर जोग यांच्या ‘व्हिक्टोरिया’ या भयपटाने प्रेक्षकांना सुंदर स्कॉटलँडची सफर घडवल्यानंतर आता पुन्हा ही जोडी प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे. आनंद पंडित मोशन पिक्चर्स, गूझबम्प्स एंटरटेन्मेंट आणि नितीन वैद्य प्रॉडक्शनच्या ‘मुसाफिरा’ (Musafira) या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. अभिनेता आणि निर्माता म्हणून काम केल्यानंतर आता पुष्कर जोग (Pushkar Jog) ‘मुसाफिरा’च्या माध्यमातून पुन्हा एकदा दिग्दर्शकाची जबाबदारी सांभाळणार आहे. या चित्रपटात पुष्कर जोग, पूजा सावंत, पुष्कराज चिरपुटकर, भोजपुरी स्टार स्मृती सिन्हा, दिशा परदेशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. (Marathi Movie)

मैत्रीवर आधारित आहे ‘मुसाफिरा’
‘मुसाफिरा’ हा चित्रपट मैत्रीवर बेतलेला असून मैत्रीची नवीन परिभाषा यात अनुभवायला मिळणार आहे. या बिग बजेट मराठी चित्रपटाची खासियत म्हणजे स्कॉटिश हायलँड्सच्या आयल ऑफ स्कायवर चित्रित केलेला हा पहिला भारतीय चित्रपट ठरणार आहे.

‘मुसाफिरा’चं चित्रीकरण पूर्ण
‘मुसाफिरा’बद्दल दिग्दर्शक पुष्कर जोग म्हणतात, “ मराठी चित्रपटांनी चित्रीकरणासाठी भारताची सीमा ओलांडली आहे. त्यामुळे मराठी चित्रपटाचे परदेशात चित्रीकरण करणं नवीन नाही. मात्र एक पाऊल पुढे टाकत ‘मुसाफिरा’ने मराठी सिनेसृष्टीत एक नवीन विक्रम केलाय. निसर्गरम्य अशा स्कॉटिश हायलँड्सची सफर प्रेक्षकांची करमणूक द्विगुणित करेल. हा तरुणाईला आवडणारा विषय असला तरी हा एक कौटुंबिक आणि हृदयस्पर्शी चित्रपट आहे. ‘मुसाफिरा’चं चित्रीकरण पूर्ण झालं असून या वर्षाच्या अखेरीस ‘मुसाफिरा’ चित्रपटगृहात प्रदर्शित होईल.”

आनंद पंडित, रूपा पंडित, पुष्कर जोग, नितीन वैद्य आणि सहनिर्मिती असलेल्या या बिग बजेट चित्रपटाची निर्मिती वैशाली शहा, राहुल व्ही. दुबे आणि डॉ. कादंबरी जेठवानी यांनी केली आहे.

Web Title: Musafira is the first movie to reach at scotish haghlands for shooting nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 29, 2023 | 11:37 AM

Topics:  

  • entertainment
  • pushkar jog

संबंधित बातम्या

राधिकाच्या ‘अंधाधुन’, ‘पॅडमॅन’ सारख्या चित्रपटांनी जिंकले मन; जाणून घ्या अभिनेत्रीचा संपूर्ण प्रवास
1

राधिकाच्या ‘अंधाधुन’, ‘पॅडमॅन’ सारख्या चित्रपटांनी जिंकले मन; जाणून घ्या अभिनेत्रीचा संपूर्ण प्रवास

अभिनयानंतर आता जगासमोर आलं आमिर खानचं हिडन टॅलेन्ट, Viral Video पाहून व्हाल चकीत
2

अभिनयानंतर आता जगासमोर आलं आमिर खानचं हिडन टॅलेन्ट, Viral Video पाहून व्हाल चकीत

Bigg Boss 19: ‘बिग बॉस’च्या घरात कोण आहे ‘साप’? तान्या मित्तलने केला ‘या’ सदस्याचा पर्दाफाश
3

Bigg Boss 19: ‘बिग बॉस’च्या घरात कोण आहे ‘साप’? तान्या मित्तलने केला ‘या’ सदस्याचा पर्दाफाश

‘माझ्या धर्मात परवानगी नाही…’, गणपती बाप्पा मोरया न बोलल्यामुळे अली गोनी ट्रोल; स्वतःच दिले स्पष्टीकरण
4

‘माझ्या धर्मात परवानगी नाही…’, गणपती बाप्पा मोरया न बोलल्यामुळे अली गोनी ट्रोल; स्वतःच दिले स्पष्टीकरण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.