Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 2 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tejas Deoskar: भय, गूढता आणि कल्पनारम्यतेचा अनोखा संगम! तेजस देऊस्करांच्या हॉरर फँटसी चित्रपटाचा श्रीगणेशा

Tejas Deoskar: दिग्दर्शक तेजस प्रभा विजय देऊस्कर यांच्या आगामी हॉरर फँटसी चित्रपटाचा मुहूर्त संपन्न झाला आहे. सोनाली कुलकर्णी, सुयोग गोऱ्हे आणि रसिका सुनील यांच्या प्रमुख भूमिका असून चित्रपटाचं नाव लवकरच जाहीर होणार आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Nov 02, 2026 | 04:00 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Tejas Deoskar: मराठी चित्रपटसृष्टीत वेगवेगळ्या विषयांवर नवनवीन प्रयोग होत असताना आता प्रेक्षकांसाठी एक नवा हॉरर फँटसी चित्रपट येणार आहे. ‘बकेट लिस्ट’ आणि ‘देवमाणूस’ या चित्रपटांतून आपल्या दिग्दर्शनाची वेगळी छाप उमटवणारे दिग्दर्शक तेजस प्रभा विजय देऊस्कर एका अनोख्या कथाविश्वासह प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाले आहेत. त्यांच्या आगामी हॉरर फँटसी चित्रपटाचा मुहूर्त नुकताच संपन्न झाला आहे. या चित्रपटात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, सुयोग गोऱ्हे आणि रसिका सुनील यांच्या प्रमुख भूमिका असणार आहेत.

हॉरर आणि फँटसी या दोन वेगळ्या जॉनरची सांगड या चित्रपटात घालण्यात आली आहे. त्यामुळे या चित्रपटातून प्रेक्षकांना नेमका कोणता अनुभव मिळणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. सध्या चित्रपटाच्या कथानकाबाबत फारशी माहिती समोर आलेली नाही. तसेच चित्रपटाचं नावही अद्याप जाहीर करण्यात आलेलं नाही. लवकरच याबाबत अधिकृत घोषणा होणार आहे.

Phulwara Teaser: घुंगरांचा नाद अन् मातीचा सुगंध! महाराष्ट्राच्या लावणीची झलक दाखवणारा ‘फुलवरा’चा टीझर प्रदर्शित

हॉरर फँटसीच्या माध्यमातून उभं राहणार अनोखं कथाविश्व

या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन तेजस प्रभा विजय देऊस्कर यांनी केलं आहे. नितीन वैद्य प्रॉडक्शन्स आणि रियान राय मोशन पिक्चर्स (यूके) यांच्या संयुक्त विद्यमाने या चित्रपटाची निर्मिती होत आहे. नितीन वैद्य आणि जितेंद्र राय हे चित्रपटाचे निर्माते आहेत.

चित्रपटाबद्दल बोलताना दिग्दर्शक तेजस प्रभा विजय देऊस्कर म्हणाले, “प्रत्येक चित्रपटातून प्रेक्षकांना काहीतरी वेगळं अनुभवायला मिळावं, हा माझा नेहमीच प्रयत्न असतो. या चित्रपटाची संकल्पना आणि त्यातून आकाराला येणारं कथाविश्व मला विशेष भावलं. हॉरर फँटसी हा जॉनर आपल्याला वास्तवाच्या पलीकडे जाऊन अनेक शक्यता तपासण्याची संधी देतो. त्यामुळे या चित्रपटातून केवळ भयाचा अनुभव न देता प्रेक्षकांना एका वेगळ्याच विश्वात घेऊन जाण्याचा आमचा प्रयत्न आहे. या कथेतली वैशिष्ट्यं प्रेक्षकांसमोर उलगडण्यासाठी मीही उत्सुक आहे.”

सोनाली कुलकर्णी, सुयोग गोऱ्हे आणि रसिका सुनील यांची प्रमुख भूमिका

निर्माते नितीन प्रकाश वैद्य यांनीही या चित्रपटाबद्दल उत्सुकता व्यक्त केली. ते म्हणाले, “मराठी चित्रपटसृष्टीत आशयपूर्ण कथांसोबतच वेगळ्या जॉनरवरही प्रयोग होत आहेत आणि प्रेक्षकांकडून त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाकडे पाहण्याचा तेजस देऊस्कर यांचा अनोखा दृष्टिकोन आम्हाला खूप भावला. हॉरर फँटसीसारख्या वेगळ्या जॉनरमधील हा चित्रपट प्रेक्षकांना नवा अनुभव देईल, असा आम्हाला विश्वास आहे.”

निर्माते जितेंद्र राय म्हणाले, “या चित्रपटाच्या माध्यमातून एक वेगळं कथाविश्व प्रेक्षकांसमोर आणण्याची संधी मिळत आहे, याचा आम्हाला आनंद आहे. सोनाली कुलकर्णी, सुयोग गोऱ्हे आणि रसिका सुनील यांसारख्या प्रतिभावान कलाकारांचा सहभाग या प्रकल्पासाठी महत्त्वाचा आहे. उत्तम कलाकार आणि तंत्रज्ञांच्या साथीने साकारत असलेला हा चित्रपट प्रेक्षकांसाठी नक्कीच काहीतरी वेगळं घेऊन येईल, अशी आशा आहे.”

मुहूर्त सोहळ्याने या नव्या चित्रपटाच्या प्रवासाला सुरुवात झाली आहे. चित्रपटाचं नाव, कथानक आणि इतर कलाकारांविषयीची माहिती लवकरच जाहीर होणार आहे. त्यामुळे तेजस देऊस्कर यांच्या या आगामी हॉरर फँटसी चित्रपटाबद्दल प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे.

Ranbir Kapoor : ‘भारताने हे ५ हजार वर्षांपूर्वीच’, एलन मस्कच्या फ्लाइंग कारची पुष्पक विमानाशी तुलना; रणबीरच्या वक्तव्याची चर्चा

Web Title: Tejas deoskar upcoming marathi horror fantasy movie sonalee kulkarni main role

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 02, 2026 | 04:00 PM

Topics:  

  • entertainment
  • marathi movie
  • sonali kulkarni

संबंधित बातम्या

lokshahir Vitthal Umap: लोककलेचा स्वर, आठवण लोकशाहीरांची! विठ्ठल उमप यांच्या १६व्या स्मृती संगीत समारोहाचे आयोजन
1

lokshahir Vitthal Umap: लोककलेचा स्वर, आठवण लोकशाहीरांची! विठ्ठल उमप यांच्या १६व्या स्मृती संगीत समारोहाचे आयोजन

Dia Mirza: दिया मिर्झा आणि अमित साटम यांच्यात शाब्दिक वाद, दिवाळीच्या व्हिडीओवरून नेमकं काय घडलं?
2

Dia Mirza: दिया मिर्झा आणि अमित साटम यांच्यात शाब्दिक वाद, दिवाळीच्या व्हिडीओवरून नेमकं काय घडलं?

Ila Bhate: अजरामर व्यक्तिरेखा आणि अभिनयाचा समृद्ध वारसा! इला भाटेंचा झी मराठीकडून जीवनगौरव पुरस्काराने सन्मान
3

Ila Bhate: अजरामर व्यक्तिरेखा आणि अभिनयाचा समृद्ध वारसा! इला भाटेंचा झी मराठीकडून जीवनगौरव पुरस्काराने सन्मान

Ranbir Kapoor :‘भारताने हे ५ हजार वर्षांपूर्वीच’, एलन मस्कच्या फ्लाइंग कारची पुष्पक विमानाशी तुलना; रणबीरच्या वक्तव्याची चर्चा
4

Ranbir Kapoor :‘भारताने हे ५ हजार वर्षांपूर्वीच’, एलन मस्कच्या फ्लाइंग कारची पुष्पक विमानाशी तुलना; रणबीरच्या वक्तव्याची चर्चा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.