Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘हिंदीचे कलाकार घेऊन सिनेमा डब करून पॅन इंडिया ठरत नाही….’, प्रसिद्ध टॉलिवूड अभिनेत्रीचं वक्तव्य

'पॅन इंडियन सिनेमा माइथ ऑर मोमेंटम' या विषयावर चर्चासत्र झाले. चर्चासत्रात ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर, दाक्षिणात्य अभिनेते नागार्जुन, कारथी, अभिनेत्री खुशबू सुंदर यांनी सहभाग घेतला तर त्यांना नमन रामचंद्रन यांनी बोलते केल

  • By चेतन बोडके
Updated On: May 02, 2025 | 06:28 PM
'हिंदीचे कलाकार घेऊन सिनेमा डब करून पॅन इंडिया ठरत नाही....', प्रसिद्ध टॉलिवूड अभिनेत्रीचं वक्तव्य

'हिंदीचे कलाकार घेऊन सिनेमा डब करून पॅन इंडिया ठरत नाही....', प्रसिद्ध टॉलिवूड अभिनेत्रीचं वक्तव्य

Follow Us
Close
Follow Us:

देशात विविध भाषा, जाती, धर्माचे नागरिक राहतात. भाषा कुठलीही असो, चित्रपटात जर मानवी भाव-भावना, सहज सुंदर अभिनय आणि भारतीय संस्कृतीचे दर्शन घडले तर तो प्रेक्षकांच्या हृदयाला भिडतो. भाषा, प्रेक्षक कोणतेही असले तरी तो भारतीय सिनेमा असतो हे महत्वाचे असल्याचे मत दाक्षिणात्य अभिनेते, अभिनेत्री यांनी व्यक्त केले.

बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये आयोजित जागतिक दृकश्राव्य मनोरंजन परिषदेमध्ये आयोजित ‘पॅन इंडियन सिनेमा माइथ ऑर मोमेंटम’ या विषयावर चर्चासत्र झाले. चर्चासत्रात ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर, दाक्षिणात्य अभिनेते नागार्जुन, कारथी, अभिनेत्री खुशबू सुंदर यांनी सहभाग घेतला तर त्यांना नमन रामचंद्रन यांनी बोलते केले.

‘मूत्र अमृत आहे, मी ते स्वतः प्यायले आहे’, आता ‘या’ बॉलिवूड अभिनेत्रीने परेश रावल यांना दिला पाठिंबा, म्हणाली…

काही वेळा फक्त हिंदी कलाकार घेऊन किंवा सिनेमा डब करून तो पॅन-इंडिया ठरत नाही. कथेला सर्व भारतीय प्रेक्षकांनी समजून घ्यायला हवे, असाही सूर चर्चासत्रात उमटला.

श्रीमती खुशबू म्हणाल्या, आजच्या काळात प्रेक्षकांना भावणारी कथा वेगळी नसते तर तिची मांडणी वेगळी असते, साऊथ आणि हिंदी सिनेमात जास्त फरक नाही. विविध कलाकार साऊथमधून आले आणि हिंदी सिनेमात स्थिरच नाहीतर नावही कमावले. प्रादेशिक भाषेतील सिनेमाला वेगळे समजू नये, तोही भारतीय सिनेमा आहे.

जुन्या गाण्याला नवा स्पिन ट्वीस्ट, नव्या मैफिलीत ऐकायला मिळणार ‘चाल तुरु तुरु’ गाणं

नागार्जुन म्हणाले की, चित्रपटाची भाषा महत्वाची नसते, तर त्यामध्ये भारतीय संस्कृती आणि मानवी भावना यांचा स्पर्श असेल तर तो सिनेमा अधिक लोकप्रिय होतो. तो सिनेमा बॉलिवूड असो की टॉलिवूड फरक पडत नाही. विविध प्रादेशिक भाषेतील सिनेमांचे हिंदीमध्ये डबिंग झाले आहे, होत आहेत.

कारथी म्हणाले की, प्रामाणिकपणा हा कोणताही सिनेमा असो थोडा रंगवलेला असला तरी प्रेक्षकांपर्यंत पोहोचतो. म्हणूनच प्रत्येक दिग्दर्शक यशस्वी होतोच असं नाही. पहिला चित्रपट प्रामाणिक असतो, त्यातला अभिनय स्वतःच्या अनुभवांवर आधारित असतो. त्यानंतर कलाकार त्याच भावनेची नक्कल करत राहतो आणि तेव्हा ते खोटं वाटायला लागतं.

अनुपम खेर म्हणाले की, आता कलाकार, दिग्दर्शक आणि तंत्रज्ञ विविध भाषांमध्ये सहज काम करत आहेत. यामुळे प्रादेशिक भिंती कमी होत आहेत. मी तेलगू, तमिळमध्ये काम केले, मात्र हिंदीवर जास्त प्रेम आहे. दाक्षिणात्य सिनेमामध्ये कोविडनंतर खूप बदल पाहायला मिळतात, मात्र तो कोणत्याही भाषेतील असला तरी तो भारतीय सिनेमा म्हणून त्याकडे पाहिले पाहिजे. चित्रपट केवळ भारतापुरता मर्यादित न ठेवता जगभर पोहोचवण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

बॉलिवूड इंडस्ट्रीबद्दल आमिर आणि शाहरुखने चिंता केली व्यक्त, म्हणाले- ‘फक्त २% लोक आमचे सुपरहिट चित्रपट…’

Web Title: Nagarjuna akkineni karthi waves summit anupam kher kushboo sundar pan india filmmaking

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 02, 2025 | 06:28 PM

Topics:  

  • Tollywood Actor
  • tollywood movie

संबंधित बातम्या

ज्युनियर एनटीआरवर कोसळला दुःखाचा  डोंगर; घरातील मोठ्या व्यक्तीचे झाले निधन
1

ज्युनियर एनटीआरवर कोसळला दुःखाचा डोंगर; घरातील मोठ्या व्यक्तीचे झाले निधन

Kantara: ऋषभ शेट्टीच्या ‘कंतार चॅप्टर १’ मध्ये गुलशन देवैयाची एन्ट्री, अभिनेता दिसणार खास भूमिकेत
2

Kantara: ऋषभ शेट्टीच्या ‘कंतार चॅप्टर १’ मध्ये गुलशन देवैयाची एन्ट्री, अभिनेता दिसणार खास भूमिकेत

बॉक्स ऑफिसवर ‘Coolie’ चित्रपट ‘War 2’ वर पडला भारी? जाणून घ्या दोघांचे एकूण कलेक्शन
3

बॉक्स ऑफिसवर ‘Coolie’ चित्रपट ‘War 2’ वर पडला भारी? जाणून घ्या दोघांचे एकूण कलेक्शन

Coolie Review: रजनीकांतच्या ‘कुली’ चित्रपटाचा समोर आला पहिला रिव्ह्यू, उपमुख्यमंत्र्यांनी म्हटले ‘मास एंटरटेनर’ !
4

Coolie Review: रजनीकांतच्या ‘कुली’ चित्रपटाचा समोर आला पहिला रिव्ह्यू, उपमुख्यमंत्र्यांनी म्हटले ‘मास एंटरटेनर’ !

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.