Chaal Turu Turu Song
‘इंडियन आयडॉल’च्या पहिल्या सीझनमधून महाराष्ट्रातल्या घराघरांत प्रसिद्धीझोतात आलेल्या गायक अभिजित सावंतने चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले. गेल्या काही दिवसांपासून ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनमुळे प्रकाशझोतात आलेला अभिजित सावंत सध्या त्याच्या नव्या गाण्यामुळे चर्चेत आला आहे. अभिजित सावंत त्या शोचा उपविजेता ठरला होता. तर विजेता, सुरज चव्हाण ठरला होता. कायमच आपल्या गाण्याच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या घराघरांत चर्चेत राहिलेला अभिजित त्याच्या नव्या गाण्यामुळे चर्चेत आला आहे. गायक जयवंत कुलकर्णी यांचं असलेलं ‘चाल तुरु तुरु’ हे गाणं नव्या व्हर्जनमध्ये रिलीज झालं आहे.
नुकतंच अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर गाण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर ‘चाल तुरु तुरु’ नवीन व्हर्जनचं गाणं सोशल मीडियावर रिलीज झालं आहे. बिग बॉस नंतर अभिजीत काय नवीन करणार याची उत्सुकता सगळ्यांना होती आणि अश्यातच अभिजीत “चाल तुरु तुरु” हे गाणं घेऊन आला आहे. गाण्याच्या टीझरला चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला असून आता हे बहुचर्चित गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. गाण्याची गंमत म्हणजे अगदी थोऱ्या मोठ्यांपासून अगदी तरुणांपर्यंत प्रत्येक वयोगटातल्यांना आवडीचं गाणं असलेलं “चाल तुरु तुरु”चं रेक्रिएट व्हर्जन अभिजीतने गायलं आहे. गाण्याच्या रिक्रिएट व्हर्जनने पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे.
विजय देवेराकोंडा अडकला अडचणीत, अभिनेत्यावर लेखी तक्रार दाखल; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
दरम्यान, या वर्षी अभिजीत सावंत संगीतविश्वात २० वर्षे पूर्ण करतोय आणि याच निमत्ताने अभिजीतने चाहत्यांना हे गाणं भेट दिलं असं म्हणणं वावग ठरणार नाही! कायम प्रेक्षकांच्या मनात अधिराज्य गाजवणारा अभिजीत आता नवीन गाण्यानं वेगळीच वाईब करेन यात शंका नाही. गाण्याविषयी बोलताना अभिजीतने सांगितले की, “इंडियन आयडॉलनंतर आज 20 वर्ष या इंडस्ट्रीत पूर्ण होतात आणि हा प्रवास प्रेक्षकांच्या प्रेमामुळे शक्य झाला त्यांच प्रेम आज मला इथवर घेऊन आल आहे. गायक म्हणून कायम वेगवेगळ्या प्रोजेक्ट्स साठी काम करण्याची संधी येत असते आणि म्हणूनच “चाल तुरु तुरु” सारख्या एव्हरग्रीन गाण्याचं रिक्रिएट व्हर्जन करण्याचं ठरवलं. जुन्या गाण्याला दिलेला नवा ट्विस्ट प्रेक्षकांच्या नक्कीच पसंतीस पडेल यात शंका नाही.”
“20 वर्षाचा हा प्रवास एखाद्या रोलरकोस्टर राईड सारखा होता एक मराठी मुलगा म्हणून आपल्या महाराष्ट्रात प्रेक्षकांना आणि मराठी इंडस्ट्रीला कायम काहीतरी वेगळं देण्याची इच्छा होती आणि आज या गाण्यामुळे ती पूर्ण होत आहे. बिग बॉस केल्यानंतर मला अनेकांनी विचारलं आता नवीन काय? आणि त्यावर हे उत्तर म्हणजे हे नवीन गाणं ! चाल तुरु तुरु सारख्या जुन्या गाण्याला नवा स्पिन ट्विस्ट देणं हे आव्हानात्मक होत पण तेवढंच मजेशीर देखील होत. या गाण्यासाठी मी देखील खूप उत्सुक होतो आणि आज हे गाणं रिलीज होतंय याचा खूप आनंद आहे” असं अभिजितने गाण्याबद्दल सांगितलंय. जुन्या गाण्याला नवीन स्वरूप देऊन ते गाणं नव्या रूपात रसिकांसाठी घेऊन येणं ही तारेवरची कसरत करत अभिजीतने पुन्हा एकदा प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. अभिजीतने आजवर त्याच्या गाण्यातून रसिकांना मंत्रमुग्ध तर केलं पण येणाऱ्या काळात देखील तो अनेक कमालीची गाणी घेऊन येणार असल्याचं कळतंय!