Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

तब्बल 19 वर्षानंतर सिक्वल, ‘नवरा माझा नवसाचा 2′ चा मनोरंजक प्रवास 20 सप्टेंबरपासून

तब्बल 19 वर्षानंतर नवरा माझा नवसाचा चित्रपटाचा सिक्वल प्रदर्शनाची तारीख कधी आहे याची घोषणा आज करण्यात आली आहे. यंदाचा प्रवास कोकण रेल्वेतून होणार असून श्री सिद्धिविनायक मंदिर येथे चित्रपटाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली. अशोक सराफ, सचिन पिळगावकर, सुप्रिया पिळगावकर, स्वप्नील जोशी, हेमल इंगळे, सिद्धार्थ जाधव यांच्या प्रमुख भूमिका चित्रपटात असणार आहेत.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jul 20, 2024 | 03:47 PM
नवरा माझा नवसाचा चित्रपटाची तारीख

नवरा माझा नवसाचा चित्रपटाची तारीख

Follow Us
Close
Follow Us:

सचिन पिळगावकर दिग्दर्शित “नवरा माझा नवसाचा” या गाजलेल्या चित्रपटानंतर तब्बल १९ वर्षानंतर या चित्रपटाचा सिक्वल म्हणजेच “नवरा माझा नवसाचा 2” हा चित्रपट येत्या २० सप्टेंबरपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. एस टी बस प्रवासात “नवरा माझा नवसाचा” चित्रपटाची गोष्ट घडवल्यानंतर आता “नवरा माझा नवसाचा २” चित्रपटाची कथा कोकण रेल्वे प्रवासात घडणार आहे. नुकतेच मुंबई येथील श्री. सिद्धिविनायक मंदिर येथे चित्रपटाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली. याप्रसंगी चित्रपटाचे निर्माते दिग्दर्शक सचिन पिळगांवकर, अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर आणि महाराष्ट्र भूषण अशोक सराफ उपस्थित होते.

हेदेखील वाचा – तंदुरुस्त राहण्यासाठी सोनम कपूर सकाळी खाते ‘या’ गोष्टी; जाणून घ्या तिचे खास डायट

चित्रपटाची तारीख झाली जाहीर

सुश्रिया चित्र या निर्मिती संस्थेची निर्मिती असलेल्या “नवरा माझा नवसाचा 2” या चित्रपटाची निर्मिती,  कथा – पटकथा आणि दिग्दर्शन सचिन पिळगांवकर यांनी केलं आहे तर संवाद संतोष पवार यांचे आहेत. चित्रपटाच्या रिलीज डेटचा एक टीजर देखील सोशल मीडियावर लाँच करण्यात आला आहे. चित्रपटात सचिन पिळगांवकर, सुप्रिया पिळगांवकर, अशोक सराफ, स्वप्नील जोशी, हेमल इंगळे, निर्मिती सावंत वैभव मांगले आणि सिद्धार्थ जाधव यांच्या प्रमुख भूमिका आहेत. त्याशिवाय “नवरा माझा नवसाचा चित्रपटात बस कंडक्टर असलेले अशोक सराफ आता “नवरा माझा नवसाचा 2″मध्ये तिकीट चेकर अर्थात टीसी झाले आहेत. 

हेदेखील वाचा – आंध्र प्रदेशातील मुलीच्या शिक्षणाला पाठिंबा देत सोनू सूदने पुन्हा केली मदत

“नवरा माझा नवसाचा” हा चित्रपट अल्पावधीतच  कमालीचा हिट झाला होता. पहिल्या भागातला चमत्कारिक नवस फेडताना उडालेली तारांबळ अतिशय मनोरंजक ठरली होती. त्यामुळे आता “नवरा माझा नवसाचा 2” मध्ये नक्की काय घडते ज्यामुळे रेल्वे प्रवास करावा लागतो यासाठी अजुन रसिक प्रेक्षकांना थोडी वाट पहायला लागणार आहे.

पहिल्या भागाने लोकांची उत्सुकता खूपच ताणून ठेवली आहे. तर नवरा माझा नवसाच्या या पहिल्या चित्रपटाला खूपच चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे आता दुसऱ्या भागामध्ये नक्की काय असणार आणि कशा पद्धतीने यामध्ये मजा अनुभवयाला मिळणार आहे यासाठी प्रेक्षक नक्कीच उत्सुक आहेत.

Web Title: Navra maza navsacha 2 will release on 20th september after 19 years sequel for viewers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 20, 2024 | 03:46 PM

Topics:  

  • ashok saraf
  • sachin pilgaonkar

संबंधित बातम्या

Supriya Pilgaonkar Birthday: सचिनच्या आईला आवडली सुप्रिया, मुलाच्या मागे लागली; सुप्रियाला घातली ‘अशी’ मागणी!
1

Supriya Pilgaonkar Birthday: सचिनच्या आईला आवडली सुप्रिया, मुलाच्या मागे लागली; सुप्रियाला घातली ‘अशी’ मागणी!

गैरसमज की सत्य? सचिन पिळगावकरांची दत्तक मुलगी कोण? ‘किडनॅपिंगचा आरोप…’
2

गैरसमज की सत्य? सचिन पिळगावकरांची दत्तक मुलगी कोण? ‘किडनॅपिंगचा आरोप…’

Eknath Shinde Honors Ashok Saraf : मराठी सिनेसृष्टीचा गौरव!
3

Eknath Shinde Honors Ashok Saraf : मराठी सिनेसृष्टीचा गौरव!

“मी काय तुम्हाला शुभेच्छा देणार…” प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्याची ‘अशोक मामां’च्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट
4

“मी काय तुम्हाला शुभेच्छा देणार…” प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्याची ‘अशोक मामां’च्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.