(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
नील भट्ट आणि ऐश्वर्या शर्मा हे टेलिव्हिजनमधील सर्वात लोकप्रिय जोडप्यांपैकी एक मानले जातात. मात्र, गेल्या काही काळापासून त्यांच्या नात्याबाबत अनेक चर्चा सुरू आहेत. असे म्हटले जात आहे की, ते आता एकत्र राहत नाहीत आणि लवकरच वेगळे होणार आहेत. या अफवांवर ऐश्वर्याने प्रतिक्रिया दिली असून, त्या अफवा खोट्या असल्याचं स्पष्ट केलं आहे. पण नीलने यावर अद्याप मौन पाळलं आहे. नील भटचा एक व्हिडीओ समोर आला आहे.नील भट्ट मुंबईच्या रस्त्यावर एका ‘मिस्ट्री गर्ल’ सोबत दिसल्याने पुन्हा एकदा तो चर्चेत आला आहे. जेव्हा मीडियाच्या कॅमेऱ्यांनी त्याला घेरलं, तेव्हा नील हसत होता आणि त्याच्या सोबतची मैत्रीण पुढे निघून गेली.
या व्हिडिओनंतर सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे. “ही तर कोण आहे?”, “हीच का त्यांच्या नात्यात दुरावा आणणारी मैत्रीण?” अशी विचारणा अनेकांनी केली. काही चाहत्यांनी नीलचं समर्थन केलं, तर काहींनी टीका केली. काही रिपोर्ट्सनुसार, ही मुलगी ऐश्वर्या आणि नीलची कॉमन फ्रेंड असल्याचंही म्हटलं जात आहे.
कमेंट सेक्शन पूर्णपणे याच चर्चेने भरलेलं आहे. ही मुलगी नक्की कोण आहे, याचा अंदाज बांधण्यातच लोक गुंतले आहेत.काही लोकांनी नीलवर आरोप करत त्याने ऐश्वर्याला धोका दिल्याची टीका केली आहे.
दरम्यान, २७ ऑगस्ट रोजी ऐश्वर्या शर्माने आपल्या इंस्टाग्राम हँडलवर गणेश चतुर्थीनिमित्त बाप्पांना घरी आणतानाच्या काही सुंदर फोटो शेअर केले. या फोटोमध्ये मात्र नील भट्ट कुठेच दिसला नाही, आणि ऐश्वर्या एकटीनेच बाप्पांसोबत फोटो काढलेले दिसली.खरं तर, तिने स्टोरीमध्ये बाप्पांना घरी आणतानाचा एक छोटासा व्हिडीओही शेअर केला होता, आणि स्पष्ट केलं की तिने बाप्पांना नीलसोबत नाही, तर आपल्या मैत्रिणीच्या सोबतीने घरी आणलं.
या गोष्टीवरून अनेकांना हे वाटू लागलं आहे की, नील आणि ऐश्वर्या सध्या वेगवेगळे राहत आहेत आणि त्यांचं नातं पूर्वीसारखं चांगलं राहिलेलं नाही.. ‘गुम है किसी के प्यार मे’ मालिकेच्या सेटवर नील आणि ऐश्वर्याची गट्टी जमली होती. त्यानंतर २०२१ मध्ये त्यांनी पारंपरिक पद्धतीने लग्नाच्या बेडीत अडकत आयुष्यभर एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. ‘स्मार्ट जोडी’, ‘बिग बॉस १७’ या रिएलिटी शोमध्येही ते दिसले होते.